Crop Loan : थकित कर्जरक्कम तडजोडीअंती भरण्यास तयार

Agriculture Loan : नापिकी, कोविडमुळे पिकांचे नुकसान झाल्याने कर्जे थकली. त्यानंतर बँकेने नूतनीकरण केलेले कर्ज हे कागदावरच करण्यात आले.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Nashik Crop Damage : नापिकी, कोविडमुळे पिकांचे नुकसान झाल्याने कर्जे थकली. त्यानंतर बँकेने नूतनीकरण केलेले कर्ज हे कागदावरच करण्यात आले. सध्या ते थकित असल्याने योग्य व सर्व संमत तडजोड होऊन जी रक्कम ठरेल, ती भरावयास तयार आहोत, असा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय किसान संघाने बँक प्रशासनापुढे ठेवला आहे.

जिल्हा बँकेकडून थकीत कर्जाच्या वसुलीपोटी कायदेशीर कारवाईचा अवलंब करून वसुली प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे बँक अडचणीत असल्याने वसुलीशिवाय पर्याय नाही. मात्र, शेतकरी अडचणीत असल्याने वसुली थकली आहे.

त्यामुळे प्रभावशाली थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी या बँकेच्या नावे हस्तांतरित करण्यासंदर्भात कायदेशीर कारवाई केली जात आहे. याप्रश्‍नी भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांसह जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांची सोमवारी (ता. ८) भेट घेतली.

Crop Loan
Crop Damage Survey In Akola : अकोला जिल्ह्यात नुकसानीच्या कामांना वेग

संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, जिल्हा मंत्री सूरज कोकणे, माजी अध्यक्ष सुभाष तिडके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धन खिरकारे, शंकरराव दवंगे, बालाजी गायधनी आदी उपस्थित होते. दिंडोरी तालुक्यातील थकबाकीदार शेतकरी उपस्थित होते.

संघाने दिलेल्या निवेदनानुसार, ‘बँकेकडून घेतलेले कर्ज थकल्यानंतर बँकेने ते वेळोवेळी कागदोपत्री नूतनीकरण करून दिलेले आहे. व्याजाची रक्कम मुदलात मिळून कर्जे एकत्र केले, ही रक्कम जवळपास १० ते १५ पटीने वाढली आहे. प्रत्यक्षात कर्ज रक्कम अदा केली आहे.

त्यानंतर त्याचे फक्त नूतनीकरण झाले आहे. त्यामुळे व्याजावर व्याज मिळत जाऊन कर्ज रक्कम फुगली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९०चे कलम ४४ ‘अ’ तरतुदीनुसार शेतीसाठी दिलेल्या कर्जावर त्या रकमइतकेच व्याज घेता येते. त्याहून जास्त व्याज घेता येत नाही.’

शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगू द्या

बँकेने शेतकऱ्यांच्या जमीनी बँकेच्या नावावर करून त्याचा ताबा घेतल्यास कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल. यासह शेतकरी भूमिहीन होईल. शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी द्यावी.

बँक थकबाकीदार शेतकऱ्यांना अल्प व दीर्घ मुदतीचे कर्ज या प्रकारातील कर्ज घेतले, ते थकित झाले आहे. योग्य व सर्वसंमत तडजोड होऊन जी रक्कम ठरेल ती रक्कम भरावयास तयार आहोत, अशी माहिती संघासह शेतकऱ्यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com