Harriet Tubman : वाट दाखवणारी बाई!

२० एप्रिल २०१६ रोजी अमेरिकेत एक ऐतिहासिक घटना घडली होती. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलर या अमेरिकेच्या चलनी नोटेवर एका महिलेचे चित्र छापले जाणार होते.
Harriet Tubman
Harriet Tubman Agrowon

२० एप्रिल २०१६ रोजी अमेरिकेत एक ऐतिहासिक घटना घडली होती. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलर या अमेरिकेच्या चलनी नोटेवर एका महिलेचे चित्र छापले जाणार होते. अमेरिकेचे तत्कालीन अर्थमंत्री जेकब ल्यू यांनी ही घोषणा केली, की हॅरिएट टबमन यांचं चित्र वीस डॉलरच्या नोटेवर छापले जाणार म्हणून! कोण होत्या या हॅरिएट टबमन? हॅरिएट टबमन एक कृष्णवर्णीय गुलाम स्त्री होत्या. दक्षिण अमेरिकेतील मेरीलँड परिसरातील एका गोऱ्या शेतकऱ्याकडे त्या गुलाम म्हणून काम करत असत. वास्तविक त्यांच्या आईने मालकाकडून घेतलेली उचल ही आपल्या कामातून चुकती केलेली होती. त्यामुळे त्यांची मुलगी म्हणजेच हॅरिएट ही कायदेशीररीत्या गुलामीतून मुक्त होती. असं असलं तरीही दक्षिणेतील शेतकरी हे गुलामांना असं सहजासहजी सोडत नसत. उत्तर अमेरिकेत जरी गुलामगिरीवर कायद्याने बंदी आणली गेली असली तरी दक्षिणेतील लोक त्या कायद्यांची अंमलबजावणी मात्र करत नसत.

Harriet Tubman
मशागत की शून्य मशागत?

हॅरिएट यांनी आपल्या गोऱ्या मालकाच्या विरुद्ध बंद करण्याचं ठरवलं. एका रात्री त्या त्यांच्या गोऱ्या मालकाच्या तावडीतून सटकल्या. त्या मालकाने हॅरिएट यांना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले, पण या काही त्याच्या हाती लागल्या नाही. त्यांनी गुप्तपणे पलायन केले व त्या थेट पोहोचल्या फिलाडेल्फिया राज्यात! जे उत्तर अमेरिकेत होतं. म्हणजे हॅरिएट गुलाम होत्या त्या मेरीलँडच्या शेतापासून सातशे मैल लांब त्या गुपचूप चालत गेल्या. तिकडे एका संघटनेशी त्यांचा संपर्क झाला. ही संघटना दक्षिणेतील गुलामांना गुलामगिरीतून सोडविण्यासाठी मदत करत असे. हॅरिएट या एकट्याच पळून आलेल्या होत्या. '

काही दिवसांनी त्यांना त्यांचे मन खाऊ लागले की आपला नवरा, वडील, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना तसेच गुलामगिरीत खितपत सोडून आपण एकटेच मुक्त झालो आहोत. म्हणून पुन्हा वेषांतर करून त्या काम करत होत्या त्या मेरीलँडला आल्या आणि त्यांनी तब्बल सातशे गुलामांची मुक्तता केली. अमेरिकन गृहयुद्ध सुरू असताना उत्तर अमेरिकेसाठी त्यांनी गुप्तहेर म्हणूनही कामगिरी पार पाडली होती. हॅरिएट यांना काळ्या लोकांची मोझेस असं आदराने म्हटलं जातं. त्यांनी काळ्या गुलाम लोकांची फक्त मुक्तताच केली नाही तर त्यांना फिलाडेल्फियाला घेऊन गेल्यानंतर रोजगार मिळवून देण्यात मदतसुद्धा केली. जिवावर उदार होऊन गुलामगिरीतील लोकांना मुक्त करून त्यांना वाट दाखवणारी ही बाई धैर्य आणि स्वातंत्र्याचे एक मूर्तिमंत प्रतीकच होय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com