Womens Farmer Producer Company : महिला शेतकरी कंपनीने रुजविला आत्मविश्‍वास

महिलांनी निर्मलमाई शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली.
Womens Farmer Producer Company
Womens Farmer Producer CompanyAgrowon

मिळून साऱ्या जणींचा आदर्श सांगत कळमना (जि. नागपूर) येथे १२ डिसेंबर २०२० रोजी महिलांनी निर्मलमाई शेतकरी उत्पादक कंपनीची (Womens Farmer Producer Company) स्थापना केली. स्टार्टअप स्वरूपातील या कंपनीने अल्पावधीतच ‘नाफेड’साठी शेतीमाल खरेदीत चांगली कामगिरी केली आहे.

Womens Farmer Producer Company
Farmer Producer Company : बीजोत्पादन, स्वच्छता, प्रतवारीत ‘फाळेश्‍वर’ची यशस्वी घोडदौड

येत्या काळात शेतीमाल खरेदी सोबतच बीजोत्पादन क्षेत्रात काम करण्याचा संकल्प संचालकांनी व्यक्त केला आहे. कंपनी संचालक म्हणून नामोल्लेख असलेल्या या महिला गृहिणी म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळायच्या. मात्र या सर्व महिलांनी शेतीमध्ये वेगळे काहीतरी करण्याच्या उद्देशाने महिलांची निर्मलमाई शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

सध्या संचालक मंडळात रंजना रेवतकर (अध्यक्ष), शमा बेले (उपाध्यक्ष), नीलिमा रेवतकर (सचिव), वर्षा बावनकुळे (मुख्य कार्यकारी अधिकारी), स्नेहा कारमोरे, मेघा नौकरकर, हेमलता पोटदुखे, प्रभा बेले यांचा समावेश आहे. सध्या कंपनीचे भागधारक ४०० वर पोहोचले आहेत. कंपनीच्या एका शेअर्सची किंमत १०० रुपये आहे. या माध्यमातून १० लाख रुपयांचे भांडवल कंपनीने गोळा केले आहे. उमरेड बायपासवर कंपनीचे कार्यालय आहे.

मसाला निर्मितीला सुरुवात

कंपनीच्या कामकाजाबाबत रंजना रेवतकर म्हणाल्या, की पहिल्यांदा कंपनी स्थापन करून मसाले उद्योग उभारण्याचे प्रस्तावीत होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मसाले उत्पादनाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने सावजी मसाला, गोडा मसाला, ग्रेव्ही मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, बिर्याणी मसाला निर्मितीवर कंपनीने भर दिला.

Womens Farmer Producer Company
Crop damage : शिरोळ तालुक्यात पंचनामे पूर्ण

त्याकरिता लागणाऱ्या सगळ्या साहित्याची खरेदी नागपूर शहरातील इतवारी भागातील बाजारपेठेतून केली जाते. विविध घटकांवर प्रक्रिया दर्जेदार मसाला निर्मितीवर भर देण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील चौरास शेतकरी उत्पादक कंपनीच्या तांदळाचा पुरवठा मुंबईमधील एका मॉलमध्ये होत होता.

याची माहिती मिळाल्यानंतर या कंपनीचे अध्यक्ष अनिल नौकरकार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या माध्यमातून तांदळासोबतच महिलांच्या कंपनीने आपले मसाले पाठविण्यास सुरवात केली. परंतु पहिल्या टप्यांत मुंबई बाजारपेठेत अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही, कारण कंपनीचे मसाला पॅकिंग, ब्रॅण्डिंग साधे असल्याने हे घडले होते.

त्यामुळे स्थानिक स्तरावरच प्रदर्शनाच्या माध्यमातून मसाले विक्रीचा निर्णय महिला सदस्यांनी घेतला. सध्या नागपूर शहरात आयोजित विविध प्रदर्शनांमधून मसाला विक्री केली जाते. शहरी ग्राहकांकडून उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पॅकिंग स्टीकरवर संपर्क क्रमांक असल्याने ग्राहकांकडून दररोज मागणीदेखील येत आहे. सध्या दर महिन्याला वीस हजारांची उलाढाल मसाला विक्रीतून होते.

नाफेडसाठी खरेदी

उलाढाल वाढविण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाकडून महाएफपीसी मार्फत ‘नाफेड'करिता हरभरा खरेदीचा निर्णय घेण्यात आला.उमरेडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले कळमना हे रंजनाताईंचे मूळगाव. याच गावशिवारात त्यांची कौटुंबिक शेती असून, ती कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.

या ठिकाणी १५० टन क्षमतेचे गोदाम उभारण्यात आले आहे. कंपनीने स्वनिधीतून याची उभारणी केली. बाळासाहेब ठाकरे ग्राम विकास व कृषी परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातून दोन हजार टन क्षमतेचे गोदाम कंपनीला मंजूर झाले आहे. त्यासोबतच सोयाबीन, हरभरा बीजोत्पादनाचा प्रकल्प मंजूर झाला आहे. चार कोटी रुपयांची तरतूद या प्रकल्पाकरिता असून, प्राथमिक स्तरावर त्याला मंजुरी मिळाल्याचे रंजना रेवतकर यांनी सांगितले.

पहिल्या वर्षी महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनीने १५,२६९ क्विंटल हरभरा नाफेडकरीता खरेदी केला. या खरेदीचे सात कोटी रुपयांचे चुकारे वाटप करण्यात आले. यातून कंपनीला २५ लाख रुपयांचे कमिशन मिळणार आहे. त्यातील ८ लाख रुपये कंपनीच्या खात्यात जमा झाले आहेत. अशाप्रकारे विविध माध्यमातून कंपनीची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांवर पोहोचली आहे. शेतकऱ्यांचा देखील या खरेदीला प्रतिसाद मिळाला.

Womens Farmer Producer Company
Crop Damage : सुधारित पैसेवारी पन्नास पैशांखाली

या अनुभवातून दुसऱ्या वर्षी आणखी जास्त आवक आमच्या केंद्रावर होईल, असा विश्‍वास आहे. ‘नाफेड' करिता हरभरा खरेदीचे कंपनीचे हे पहिलेच वर्ष होते. त्याचवेळी काही शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यास विलंब झाला होता. परंतु त्यानंतर चुकारे मिळाल्यानंतर मात्र त्यांचे समाधान झाले. परिणामी तक्रारी आणि त्यामुळे होणाऱ्या वादापायी काहीसा उत्साह कमी झाला होता. आता मात्र व्यवस्थापनात्मक बाबी लक्षात आल्याने यापुढील काळात त्यावर मात कशी करायची हे तंत्र उमगल्याचे रंजना रेवतकर यांनी सांगितले.

- रंजना रेवतकर ८००७५६३४६३

विनोद इंगोले

शेती ते बाजारपेठ असे आश्‍वासक पाऊल टाकण्यासाठी कळमना (जि.नागपूर) येथे एकत्रित आलेल्या महिलांनी निर्मलमाई शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. पहिल्यांदा मसाला प्रक्रिया उद्योगातून कंपनीने कामकाज सुरू केले. आता कंपनीने ‘नाफेड’साठी शेतीमाल खरेदीला सुरुवात केली आहे. याचबरोबरीने परराज्यांतील उद्योग समूहांच्या बरोबरीने कंपनीने सहकार्य करार करत कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.

कृषी विभागाचे सहकार्य

विदर्भातील महिलांची ही पहिली शेतकरी उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे या महिलांना कृषी विभागाकडून सातत्याने प्रोत्साहन मिळते. विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, उमरेड तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे, चंद्रशेखर कोल्हे यांचे चांगले मार्गदर्शन कंपनीला मिळाले आहे. शेतीमाल खरेदीमध्ये राबविलेल्या उपक्रमाची दखल घेऊन या महिला कंपनीला नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महाएफपीसीकडे असलेल्या ७०० शेतकरी कंपन्यांपैकी चार कंपन्यांची पुरस्काराकरिता निवड केली होती. त्यामध्ये विदर्भातून निर्मलमाई शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश होता. त्यासोबतच महिलादिनाच्या दिवशी वसंतराव नाईक कृषी विस्तार व प्रशिक्षण (वनामती) संस्थेच्या वतीने कंपनीच्या सदस्यांना गौरविण्यात आले आहे.

परराज्यांत कंपनीचा विस्तार

राजनांदगाव (छत्तीसगड) येथील इंडियन ब्रॉयलर आणि पतांजली या दोन्ही कंपन्यांनी सोयाबीन पुरवठ्यासाठी निर्मलमाई शेतकरी उत्पादक कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करून त्याचा पुरवठा या दोन्ही कंपन्यांना केला जाईल. या माध्यमातून देखील कंपनीचे उत्पन्न वाढणार आहे.

सोयाबीन खरेदीसाठी ग्रेडरची नियुक्ती करण्याचे प्रस्तावीत आहे. येत्या काळात अशाच प्रकारच्या सामंजस्य करारासाठी पुढाकार घेतला जाणार असल्याचे कंपनीच्या अध्यक्षा रंजना रेवतकर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com