Kusti Competition : अमरावती शहरात रंगणार कुस्तीची दंगल

दोन गटांत ही स्पर्धा होणार असून विदर्भ तसेच महाराष्ट्र केसरी गटात स्वतंत्र चांदीची गदा व रोख पुरस्कार दिले जाणार आहे.
Kusti Competition
Kusti CompetitionAgrowon

Amravati News : नमो युवक संस्था तसेच श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी रोजी अंबापेठ क्रीडा मंडळाच्या मैदानावर कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत विदर्भ तसेच राज्यातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. जवळपास दोन लाख रुपयांची बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत.

आयोजना संदर्भात कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे व प्रा. संजय तिरथकर यांनी सांगितले, ‘‘तरुणांमध्ये कुस्ती आणि शरीर सौष्ठवाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आली आहे.

’’ शिवकेसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.१८) दुपारी चार वाजता माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, रतन डेंडुले, क्रीडा उपसंचालक विजय संतान, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, मनीष जोशी, डॉ. राजेश जयपूरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Kusti Competition
Crop Insurance : अमरावती जिल्ह्यात विमा परताव्यास अखेर सुरुवात

दोन गटांत ही स्पर्धा होणार असून विदर्भ तसेच महाराष्ट्र केसरी गटात स्वतंत्र चांदीची गदा व रोख पुरस्कार दिले जाणार आहे. रविवारी (ता.१९) कुस्ती स्पर्धेचा समारोप माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार डॉ. अनिल बोंडे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

केसरी गटातील विजयी पैलवानाला ५१ हजार रुपये रोख व चांदीची गदा, शिवकेसरी गटातील पैलवानाला ५१ हजार रुपये व चांदीची गदा तसेच उपविजेत्यांना सुद्धा रोख पुरस्कार दिले जाणार आहे. पत्रपरिषदेला अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, प्रा. संजय तिरथकर, करण डेंडवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अत्याधुनिक कुस्ती मॅटचे होणार लोकार्पण

शिवकेसरी स्पर्धेचे उद्घाटन १८ ला दुपारी चार वाजता होणार आहे, त्यापूर्वी आमदार रवी राणा यांच्या हस्ते सहा लाख रुपये किंमतीची कुस्ती मॅट भातकुली कुस्ती संकुलाला लोकार्पित केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com