Rain : या जिल्ह्यांत पावसाचा `येलो अलर्ट`

राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर ओसरला. तर कोकणात काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची उघडीप कायम होती.
'Yellow alert' of rain in these districts
'Yellow alert' of rain in these districtsAgrowon

पुणेः राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर (Rain) ओसरला. तर कोकणात (Konkan) काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची उघडीप कायम होती. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

'Yellow alert' of rain in these districts
Soybean Disease: सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव कसा टाळाल ? | ॲग्रोवन

कोकणात काही भागांत जोरदार पाऊस झाला. मात्र इतरत्र पावसाचा जोर ओसरला. तर काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, तालसरी या मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर इतर भागांत हलका पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील म्हसला येथे १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कर्जत, पेन, आणि रोहा या मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी होता. येथील वकवली, राजापूर, दापोली आदी मंडळांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाऊस कमी झालाय. वैभववाडी मंडळ वगळता इतर भागांत हलका पाऊस झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा येथे ८७ मिलिमीटर पाऊस झाला. तर राधानगरी, शाहूवाडी आणि आजरा या भागांत हलक्या सरी पडल्या. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे १३१ मिलिमीटर पाऊस पडला. तर पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप कायम होती. सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातही पावसाची विश्रांती कायम होती.

'Yellow alert' of rain in these districts
Cotton : जगभरातील कापूस पीक नैसर्गिक आपत्तीने संकटात

मध्य महाराष्ट्रातही ठिकाठिकाणी जोरदार सर पडल्या. नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी झाल्या. धुळे जिल्ह्यात पावसाची उघडीप होती. तर जळगाव जिल्ह्यातही पावसानं विश्रांती घेतली होती. नंदूरबार जिल्ह्यातही पाऊस पडला नाही. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे १७१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. तर हर्सूल, पेठ, ओझरखेडा, त्र्यंबकेश्वर भागातही जोरदार पडला. इतर ठिकाणी पावसाची मात्र उघडीप होती.

मराठवाड्यातही बहुतेक भागांत पावसाची उघडीप होती. औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र जोरदार पाऊस झाला नाही. तर विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात कडक ऊन पडले होते. तर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पडल्या. मात्र पावसाचा जोर कमी होता. बुलडाणा, गडचिरोली, भंडारा, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला. मात्र पूर्व विदर्भात नद्यांना आलेल्या पुरामुळे काही भागांत पाणी कायम आहे. नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं रायगड, ठाणे, पालघर, पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. तर राज्यातील इतर भागांत काही ठिकाणी विजांसही हलक्या सरी पडतील, असा अंदाज व्यक्त केलाय. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राईब करायला विसरू नका.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com