Onion Damage : तरुण शेतकऱ्यांने केला कांद्याचा अंत्यविधी

Unseasonal Rain Damage : मागील काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
Onion Damage
Onion Damage Agrowon

Nashik News : मागील काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर (onion Rate) कोसळले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच आता निसर्गाच्या फेऱ्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

राज्यात होणाऱ्या वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. डांगसौंदाणा (जि. नाशिक) येथील कांदा उत्पादक शेतकरी योगेश सोनवणे यांनी पावसात भिजलेल्या कांद्यावर अंत्यसंस्कार करण्याचे पाऊल उचलले. त्याची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Onion Damage
Onion Seed Production : धाराशिवच्या डाळे कुटुंबाने कांदा बीजोत्पादन तंत्राने वाढवला खात्रीशीर नफा

सध्या कांद्याला उत्पादन खर्च वसूल होत नाही. त्यामुळे कांद्याचे उत्पादन परवडत नाही. बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. साधा वाहतूक खर्च वसूल होत नाही. त्यामुळे सोनावणे यांनी कांद्यावर रोटाव्हेटर मारत कांदे मातीत मिसळले. तसेच संताप व्यक्त करत कांद्याचा अंत्यविधी केला.

योगेश सोनावणे यांनी शेतात काढणी करून कांदा साठवला होता. परंतु भाव मिळत नसल्याने निराश होऊन सोनावणे यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने कांदा पसरवला. तसेच अंत्यविधी करून कांदा नष्ट केला.

कांद्याचे भाव पडलेले असताना सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, सक्तीची विजबिल व कर्जवसूली तातडीने थांबवावी. तसेच वादळी पावसाने अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना मदत करण्याची मागणी सोनवणे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस वादळी वारे आणि गारपीटीने पिकांचे नुकसान वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसतोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com