परभणी, हिंगोली जिल्ह्यांत१५१ टन रेशीम कोष उत्पादन

गतवर्षीच्या तुलनेत कोष उत्पादनात २० टनाची घट
Silk
Silk Agrowon

परभणी : २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) १२१ टन आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३० टन रेशीम कोष मिळून एकूण १५१ टन रेशीम कोष उत्पादन घेतले. या दोन जिल्ह्यांतील तुतीचे क्षेत्र कमी झाल्यामुळे २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये कोष उत्पादनात २०.२० टनांची घट झाली आहे.
परभणी जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये १२६.८० टन आणि हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) ४४.४१ टन असे एकूण १७१.२१ टन रेशीम कोष उत्पादन झाले होते. २०१९-२० मध्ये परभणी जिल्ह्यात १६७.५० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ७५ टन रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले होते.
रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पन्नाची शाश्वती आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) (Pokra) अंतर्गत रेशीम शेतीसाठी अनुदान दिले जाते. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा कल रेशीम शेतीकडे वाढत आहे.

Silk
मराठवाड्यात ३२७ टनांनी वाढले रेशीम कोष उत्पादन

परभणी जिल्ह्यात एकर मिळून एकूण ७९१ एकरवर तुती लागवड आहे. गतवर्षीच्या तुलनेत तुतीचे क्षेत्र १४६ एकरने कमी झाले आहे. २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांनी १ लाख ९१ हजार ३०० अंडीपुंजांपासून १२१ टन कोष उत्पादन घेतले. गतवर्षीच्या तुलनेत कोष उत्पादनात ५.८ टनांची घट झाली, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात जुनी, नवीन मिळून एकूण ४०५ एकरांवर तुती लागवड आहे. २०२१-२२ शेतकऱ्यांनी ६३ हजार ९०० अंडीपुंजांपासून ३० टन उत्पादन घेतले. गतवर्षीच्या तुलनेत कोष उत्पादनात १४.१४ टनांची घट झाली. २०२२-२३ महारेशीम अभियानांतर्गत तुती लागवडीसाठी ३२७ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, पर्यवेक्षक अशोक वडवाले यांनी दिली.

लॉकडाउनमध्ये रेशीम कोष मार्केट (Silk Fund Market) बंद राहिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कोष उत्पादन घेतले नाही. कोषाचे दर कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तुती मोडून टाकली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोष उत्पादनात घट आली आहे. सध्या रेशीम कोषाच्या दरात तेजी आहे. त्यामुळे तुती लागवडीसाठी शेतकरी नोंदणी वाढली. तुतीचे क्षेत्र वाढल्यास चालू आर्थिक वर्षात रेशीम कोष उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com