Women Empowerment : महिलांना स्वयंसिद्ध करणारी चळवळ

कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा या संस्थेने थोड्याथोडक्या नव्हे तर सहा हजारांहून अधिक महिला उद्योजक घडवल्या आहेत.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon

कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा या संस्थेने (Swayam Siddha Sanstha) थोड्याथोडक्या नव्हे तर सहा हजारांहून अधिक महिला उद्योजक घडवल्या (Women Entrepreneur) आहेत. या स्त्रियांपैकी कोणी परिस्थितीने गांजलेल्या, तर कुणाचा आत्मविश्‍वासच डळमळीत झालेला, तर कोणी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे खचलेल्या. आयुष्याने त्यांची कोंडी केली होती. नाउमेद झालेल्या या महिलांना स्वयंसिद्धाच्या रूपाने परिसस्पर्श झाला आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. १९९२ पासून सुरू झालेला हा व्रतस्थ प्रवास आजही तितक्याच खंबीरपणे सुरू आहे.

Women Empowerment
Indian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

स्वयंसिद्धाच्या माध्यमातून हजारो महिलांचं आयुष्य बदलून गेलं. यात अडल्या- नडल्या गोरगरीब स्त्रिया आहेत, ग्रामीण कष्टकरी महिला आहेत, परंपरेच्या चौकटीचा उंबरठा कधीच न ओलांडणाऱ्या गृहिणी आहेत, शाळा सोडून घरी बसलेल्या मुली आहेत आणि निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा या चिंतेत असणाऱ्या प्रौढाही आहेत.

आपण आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, हा विश्‍वास या महिलांना मिळाला. कांचनताई परुळेकर यांच्या कणखर नेतृत्वाखाली स्वयंसिद्धाची वाटचाल सुरू आहे. संस्थेचं काम प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यात असलं तरी प्रशिक्षणकार्याच्या माध्यमातून संस्था शेजारच्या राज्यांतही पोहोचली आहे.

कोल्हापुरातील ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान देणारे खासदार डॉ. व्ही. टी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सरोजिनी देवी यांच्या त्यागातून सरोजिनी देवी विश्‍वस्त मंडळाचा प्रकल्प म्हणून स्वयंसिद्धाची स्थापना झाली. स्त्रियांना अर्थकारणातून बळकटी देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश होता.

बंडखोर विचाराच्या कांचनताई परुळेकर यांच्याकडे संस्थापक व्ही. टी. पाटील यांचे लक्ष गेले. कांचनताईंमधील नेतृत्वगुण त्यांनी हेरले. त्यांचे काम, निष्ठा आणि चिकाटी पाहून त्यांच्याकडे स्वयंसिद्धाची धुरा सोपवली. पाटील यांची मानसकन्या म्हणूनच त्यांना ओळखले जाते. कांचनताईंनी संस्थेच्या माध्यमातून दहा हजार शहरी, तर तीस हजार ग्रामीण महिलांचं संघटन उभं केलं...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com