Shirur APMC : पाबळ उपबाजारात वर्षभरात २२.५० कोटींची उलाढाल

पहिल्याच वर्षी सव्वा लाख शेतकऱ्यांनी विकला शेतीमाल; सुमारे २५ लाखांचे उत्पन्न
Shirur APMC
Shirur APMCAgrowon

शिक्रापूर, जि. पुणे ः शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pabal Shirur APMC)पाबळ (ता. शिरूर) येथील उपबाजाराने पहिल्याच वर्षात तब्बल २२ कोटी ५० लाखांची उलाढाल केली. विशेष म्हणजे या वर्षभराच्या काळात सव्वा लाखांवर शेतकऱ्यांनी आपला कृषिमाल (Agricultural Goods) इथे विकल्याने बाजार समितीला या वर्षात सुमारे २५ लाखांचे उत्पन्न मिळाले.

Shirur APMC
Weed Management : तण व्यवस्थापनामधील काही नवीन विचार

याच भरीव कामगिरीबद्दल शेतकऱ्यांनी हा उपबाजार उभारणी केलेल्या माजी सभापती शंकर जांभळकर व उपसचिव अनिल ढमढेरे यांना आवर्जून सन्मानित केले. शिरूर बाजार समितीच्या इतिहासात तळेगाव-ढमढेरे, पिंपळे-जगताप, जांबूत, वडगाव-रासई आणि शिरूर येथे मुख्य बाजार चांगल्या उलाढालीत गेले. मात्र दुर्लक्षित राहिलेल्या व तब्बल ५७ वर्षे पडिक राहिलेल्या पाबळ येथील साडेआठ एकरांच्या माळरानावर दीड वर्षांपूर्वी तत्कालीन सभापती शंकर जांभळकर यांच्या पुढाकाराने उपबाजार उभा झाला व सुरूही झाला.

अत्यंत दूरदृष्टीच्या या निर्णयाचा आढावा पहिल्या वर्षपूर्तीनंतर घेतला असता वर्षभरात तब्बल १ लाख २२ हजार ८४० एवढ्या शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल इथे विक्री केला. पर्यायाने सुमारे २१ कोटी ५० लाख एवढ्या उलाढालीमुळे बाजार समितीला निव्वळ नफाही सुमारे २५ लाख २० हजार १२५ एवढा झाला. हीच बाब काही शेतकऱ्यांनी अधोरेखित करीत दिवाळीचे औचित्य साधून माजी सभापती शंकर जांभळकर, सहसचिव अनिल ढमढेरे, विभागप्रमुख मनोज क्षिरसागर, कर्मचारी वैष्णव मेटे आणि लहू गायकवाड यांचे मिठाई, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

श्रेय वळसे-पवारांना!

पिंपळे-जगताप उपबाजाराची उभारणी बारा वर्षांपूर्वी तत्कालीन सभापती प्रकाश पवार यांच्या दूरदृष्टीने झाली. अत्यंत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या केंदूर-पाबळ परिसरासाठी पिंपळे उपबाजार जसा कृषिमाल विक्रीसाठी लाभाचा ठरला तसाच पाबळ उपबाजार शंकर जांभळकरांच्या दूरदृष्टीने उभा राहिला अन्‌ पहिल्याच वर्षी २२ कोटींची उलाढाल करू शकला. या संपूर्ण यशाचे श्रेय जांभळकर यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आमदार अशोक पवार यांना दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com