कृषी सहायक पदभरतीत उत्तरपत्रिका ठेवल्या कोऱ्या

राज्याच्या कृषी सचिवांकडे तीन सदस्यांची तक्रार
Agriculture University
Agriculture UniversityAgrowon

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) अंतर्गत घेतलेल्या कृषी सहायक पदाच्या भरती परीक्षेत (recruitment examination for the post of Agricultural Assistant) काही ठराविक परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवल्याचे निदर्शनास आल्याची बाब परीक्षेला बसलेल्यांनीच लक्षात आणून दिली. याप्रकरणी विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या तीन सदस्यांनी राज्याच्या कृषी सचिवांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत कृषी परिषदेचे सहसंचालक (प्रशासन) सुभाष बोरकर यांनी तातडीने विद्यापीठाच्या (University) कुलसचिवांकडून अहवाल मागितला आहे. दरम्यान या संदर्भात विद्यापीठाच्या कुलसचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Agriculture University
अकोला :कृषी सहायक पदभरती पुढे ढकलली 

याबाबत विद्यापीठाला दिलेल्या पत्रात म्हटले की, विधान परिषद सदस्य विप्लव बाजोरीया यांनी १० एप्रिलला झालेल्या कृषी सहायक पदाच्या भरती बाबत तक्रार नोंदवली (Complained about recruitment for the post of Agricultural Assistant) आहे. त्यामध्ये काही परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवल्याचे त्यांनी म्हटले. तसेच तपासणीवेळी उत्तरे भरून गैरप्रकार व अनियमितता झाल्याचे दिसून येत असल्याबाबत म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाचा स्वयंस्पष्ट व वस्तुनिष्ठ अहवाल कृषी परिषदेकडे दोन दिवसांत पाठवावा, असे बोरकर यांनी म्हटले आहे.

तीन सदस्यांच्या स्वाक्षरीने तक्रार
अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कृषी सहायक पदभरतीची परीक्षा नुकतीच घेण्यात (Agricultural Assistant Recruitment Exam recently) आली. या परीक्षेत परीक्षार्थ्यांना दिलेल्या उत्तरपत्रिका काही ठराविक परीक्षार्थ्यांनी कोऱ्या ठेवल्या होत्या. त्यांना त्या कोऱ्या ठेवण्याच्या सूचना होत्या, असे बऱ्याच परीक्षार्थ्यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी कार्यकारी परिषदेच्या सदस्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यामुळे या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची विनंती कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. विप्लव बाजोरीया, मोरेश्र्वर वानखडे, विठ्ठल सरप पाटील यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली.

या परीक्षेला बसलेल्या काही परीक्षार्थ्यांनी कार्यकारी परिषदेच्या सदस्यांकडे तक्रार केली की, त्यांच्या आजूबाजूच्या काही परीक्षार्थ्यांनी उत्तर पत्रिकांवर काहीच लिहिले नव्हते. उत्तरपत्रिका कोऱ्या सोडल्या. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची तक्रार आ. बाजोरीया व सदस्यांनी केली. त्यावर चौकशी अहवाल मागवण्यात आला आहे. परीक्षेबाबत आता अनेक जण फोनद्वारे तक्रारी करीत आहेत.

मोरेश्वर वानखडे, कार्यकारी परिषद सदस्य, पंदेकृवि, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com