
कार्बनच्या प्रमाणावर कोळशाचे औष्णिक मूल्य ठरते. कार्बनायझेशनसाठी सर्वसाधारणपणे वापरले जाणारे तापमान आणि त्यातून मिळणारे औष्णिक मूल्य याची माहिती असणे आवश्यक आहे. इंधन, रसायन आणि वायूचे शुद्धीकरण करण्यासाठी कोळशाचा प्रामुख्याने वापर केला जातो. प्रगतिशील देशांमध्ये घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी अजूनही कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने कार्बन असतो. हा उष्ण रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केला जातो. या प्रक्रियेमध्ये, जैवभारामधील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे उत्पादनातील कार्बनचे प्रमाण वाढते. यास कार्बनायझेशन असे म्हणतात. कार्बनायझेशन मध्ये हवेचा प्रतिबंधितीत प्रवाह सोडून लाकूड तापवले जाते.
अशी होते प्रक्रिया :
कोळशाचा वापर :
कार्बनायझेशनसाठी वापरले जाणारे तापमान आणि त्यातून मिळणारे औष्णिक मूल्य
तापमान (अंश सेल्सिअस) | कार्बन (टक्के) | औष्णिक मूल्य (MJ- kg) |
३०० | ३० | २३ |
४०० | ७० | ३० |
६०० | ८८ | ३३ |
कोळसा आणि त्यातील घटक घटक | प्रमाण (टक्के) |
व्होलाटाईल | २० ते ३० |
स्थीर कार्बन | ७८ ते ९० |
राख | १.५ ते ५ |
ओलावा | ५ ते ८ |
घनता | १३० किलो प्रति घन मीटर |
संपर्क : डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (कृषी अभियांत्रिकी विभाग,महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.