तंत्र मटकी, हुलगा लागवडीचे

मटकी लागवडीसाठी हलकी मुरमाड जमीन उपयुक्त ठरते.
मटकी लागवडीसाठी हलकी मुरमाड जमीन उपयुक्त ठरते.

मटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले उत्पादन देतात. १५ जून ते ७ जुलैपर्यंत पेरणी करावी.ही पिके प्रामुख्याने अांतरपीक म्हणून घेतली जातात.त्यासाठी या पिकांची मुख्य पिकासोबत ४:१ या पद्धतीने पेरणी करावी. मटकी व हुलगा ही पिके पाण्याचा ताण सहन करू शकतात. विशेषत: कमी पाऊसमान असलेल्या भागात ही पिके चांगली येतात.                                        मटकी  पौष्टिकता प्रति १०० ग्रॅम

प्रथिने     २३ ग्रॅम (२२-२४ टक्के)
ऊर्जा     ३४३ कॅलरी
कर्बोदके   ६२ ग्रॅम
स्निग्ध पदार्थ      १.६ ग्रॅम
जीवनसत्त्व बी १  ०.६ मिलिग्रॅम
जीवनसत्त्व बी २   ०.१ मिलिग्रॅम
जीवनसत्त्व बी ३     २.८ मिलिग्रॅम
जीवनसत्त्व बी ५     ०.५ मिलिग्रॅम
जीवनसत्त्व बी ६    ०.४ मिलिग्रॅम
जीवनसत्त्व क    ७.० मिलिग्रॅम
कॅल्शियम      १५० मिलिग्रॅम
लोह      १०.८ मिलिग्रॅम
मॅग्नेशियम      ३८१ मिलिग्रॅम
मॅग्नीज     १.८ मिलिग्रॅम
फॉस्फरस      ४८९ मिलिग्रॅम
सोडियम      ३० मिलिग्रॅम
झिंक    १.९ मिलिग्रॅम

                                 हुलगा पौष्टिकता (प्रति १०० ग्रॅम)

प्रथिने    २० ग्रॅम
कर्बोदके   ५७.२ ग्रॅम
तंतुमय पदार्थ   ५.३ ग्रॅम
स्निग्ध पदार्थ     ०.५० ग्रॅम
कॅल्यिशम    २८७ मिलिग्रॅम
फॉस्फरस    ३११ मिलिग्रॅम
लोह    ६.७७ मिलिग्रॅम

जमीन : मटकी व हुलगा ही पिके सर्वप्रकारच्या जमिनीत घेता येतात. जमिनीचा सामू ३.५ ते ८.५ दरम्यान असावा. मटकी पिकासाठी मध्यम मुरमाड जमीन फायद्याची ठरते.

हवामान : मटकी पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी २४- ३२ अंश सेल्सिअस तापमान व वार्षिक ५०० ते ७५० मिमी. पर्जन्यमानाची आवश्‍यकता असते. हे पीक २०० ते ३०० मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाच्या प्रदेशातही तग धरू शकते. हुलगा हे पीक उष्ण आणि समशितोष्ण प्रदेशामध्ये जिरायती क्षेत्रावर प्रामुख्याने घेतले जाते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ३०० ते ६०० मि.मी. आणि २५ अंश ते ३२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये हे पीक चांगले उत्पादन देते. हे पीक ४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये तग धरू शकते; मात्र २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान चालत नाही.

बियाणे प्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे कार्बेन्डाझिम  : २ ग्रॅम   पेरणी : १५ जून ते ७ जुलैपर्यंत पेरणी करावी. महाराष्ट्रामध्ये ही पिके प्रामुख्याने अांतरपीक म्हणून घेतली जातात. त्यासाठी या पिकांची मुख्य पिकासोबत ४:१ या पद्धतीने पेरणी करावी. सलग किंवा निखोळी पेरणी केल्याने या पिकांचे अपेक्षित उत्पादन घेता येणे शक्य आहे.

लागवड तंत्रज्ञान :

पीक      जात   बियाणे प्रमाण (किलो/ हेक्टर )  पेरणीचे अंतर  खत (नत्र,स्फुरद) 
मटकी      

टाईप-१, जी-१ मसूबहार    बालेश्र्वर-१२ क्रेझीमॉथ         

१२-१५    

४५x१५ सें.मी.   २०ः४०ः००
हुलगा किंवा कुळथी   मधु, एचएच-१, एचपीके२, सिओ-२, बी.आर-१०, व्हीझेडएम-१     ४०     ३०x१० सें.मी.     २०ः४०ः००

संपर्क : डॉ. यु. एन. आळसे, ९४२१३९२१९३ (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com