अशी करा अडुळसा लागवड

अडुळसा
अडुळसा

अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने हिरवी, लांबट, वर्तुळाकार, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात.

झुडपाचे मध्यम आकाराचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला फांद्या समोरासमोर येतात. पेर फुगलेली असतात. फुले पांढरी असतात. फळे टोकाला लागतात. या वनस्पतीची लागवड ही छाट कलमाद्वारा किंवा बिया लावूनही करता येते. मुख्यतः पावसाळ्यात लागवड केली जाते. कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर एक x एक मीटर अंतरावर याची लागवड करावी. मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी छाट कलमांचा वापर करून प्लॅस्टिक पिशवीमध्ये रोपे तयार करावीत. या वनस्पतीवर रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. पावसाळ्यात याची लागवड करावी. जूनच्या शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड केल्यास पिकाची वाढ चांगली होते. पानांची किंवा फुलांची काढणी गरजेनुसार झाडाच्या पानाच्या प्रमाणानुसार करावी. साधारणतः तिसऱ्या महिन्यापासून पाने काढणीसाठी तयार होतात. त्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या अंतराने छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर पाने, फांद्या, फुले ही सावलीत वाळवावीत. संपूर्ण वाळल्यानंतर त्याची पावडर करावी. आयुर्वेदिक औषधात अडुळशाचा वापर केला जातो.

संपर्क ः ०२४२६- २४३२९२ औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com