दालचिनी, लवंग लागवड

दालचिनी, लवंग लागवड
लवंगाचे झाड

दालचिनी लागवड

दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी. सलग लागवड करायची झाल्यास १.२५ x १.२५ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्डे चांगली माती, एक घमेले शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.

लवंग लागवड

लवंग लागवड ही नारळाच्या बागेत करायची झाल्यास नारळाच्या चार झाडांच्या मध्यभागी (चौफुलीवर) दीड ते दोन वर्षांचे रोप लावावे. लागवडीसाठी ७५ x ७५ x ७५ सें.मी. आकाराचे खड्डे खणून, त्यामध्ये दोन टोपली शेणखत, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून खड्डे भरून रोप लावावे. लवंग झाडांना मातीमधील ओलावा मानवतो; परंतु दलदल किंवा कोरडी जमीन ठेवू नये. झाडांना आवश्‍यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी.

 - ०२३५८- २८०५५८ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.