योग्य वेळी करा कडधान्य पेरणी

योग्य वेळी करा कडधान्य पेरणी
योग्य वेळी करा कडधान्य पेरणी

मूग, उडीद :

  •     मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी, क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमिन टाळावी. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजे जूनच्या दुसरा पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणीला जसजसा उशीर होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते.
  •     मुगामध्ये वैभव व बी.पी.एम आर.-१४५ या दोन जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. उडीदामध्ये टीपीयू-४ व टीपीयू-१ या जाती चांगले उत्पादन देतात. प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम व २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  •     मुग व उडीद ही पिके अतिशय कमी कालावधीची (७० ते ८०) असल्यामुळे सलग अथवा आंतरपीक म्हणून घेतले जाते. या दोन्ही पिकाचे दोन ओळीत ३० सें.मी. व दोन रोपांमधील अंतर १० सें.मी. राहील या बेताने पेरणी करावी. पेरणीकरिता १५-२० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे.
  •     दोन्ही पिकांना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.या पिकामध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळीनंतर एक ओळ तुरीची पेरावी.  
  • चवळी ः

  •     मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी. पेरणीकरिता १५ ते २० किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
  •     पेरणीकरिता सीना, माण व फुले सकस या जातींची निवड करावी. पेरणी ४५ x १० सें.मी. अंतरावर करावी. प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम  व २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  •     पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खतांची मात्र द्यावी. यासाठी १२५ किलो डीएपी प्रति हेक्टरप्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.
  • हुलगा, मटकी :

  •     हलकी ते मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
  •     हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पेरणीकरिता वापरावे. पेरणी ३० बाय १० से.मी अंतरावर करावी.  प्रती किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम  व २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  •     पेरणीच्या वेळेस १२-१५ किलो नत्र आणि २५-३० किलो स्फुरद याप्रमाणे रासायनिक खतांची मात्र द्यावी, म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रति हेक्टरप्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.
  •  : डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com