फळबागांमध्ये कंदपिकांचे आंतरपीक

फळपिकामध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड तसेच कमी कालावधीच्या जातीची निवड करणे आवश्यक आहे. कंदपिकासाठी वेगळे खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही.
tuber crop cultivation in Mango plantation.
tuber crop cultivation in Mango plantation.

फळपिकामध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड तसेच कमी कालावधीच्या जातीची निवड करणे आवश्यक आहे. कंदपिकासाठी वेगळे खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही. कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारीमध्ये आंतरपीक म्हणून काही कंदवर्गीय पिकांची लागवड फायदेशीर ठरू शकतात. कोकण व्यतिरिक्त राज्यातील इतर विभागातही नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये कंदपिकांचा समावेश आंतरपीक म्हणून करावा. आंतरपिकांचे नियोजन करताना 

  • कंदपिकाची आंतरपीक म्हणून लागवड करताना मुख्य फळपिकांच्या कामामध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • फळपिकामध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड तसेच कमी कालावधीच्या जातीची निवड करणे आवश्यक आहे.
  • मुख्य पिकाशी अनद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी मूलभूत गोष्टीशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  • कंदपिकासाठी वेगळे खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही.
  • आंतरपिकाची लागवड करताना मुख्य पिकाचे वय, लागवडीचे अंतर, झाडाचा विस्तार, झाडाची ठेवण, मुळाचा विस्तार, मधल्या जागेतील सूर्यप्रकाशाची उपलब्धता, सिंचन सुविधा, जमिनीचा प्रकार, पिकाची कालावधी इत्यादी बाबींचा विचार करावा.
  • मुख्य फळपिकामध्ये लागवडीच्या सुरुवातीच्या कालावधीत पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध असल्यामुळे कंदपिकांची सलग लागवडीप्रमाणे लागवड करण्यास हरकत नाही. मात्र जसजसे फळपिकाचे वय व विस्तार वाढेल तसतसे पीकनिहाय कंदपिकाची नेहमीच्या लागवड पद्धतीमध्ये योग्य ते बदल करून घ्यावेत.
  • आंतरपिकासाठी लागवड पद्धती

  • आंबा व काजूमध्ये कंदपिकांची लागवड करताना खरीप हंगामात बागेतील मधल्या जागेत कणगर, करांदा, घोरकंद यासाठी ९० सें.मी. अंतरावर लागवड करावी. रताळी पिकासाठी ६० सेंमी अंतरावर सऱ्या करून लागवड करावी.
  • अति पावसाच्या प्रदेशात कंदपिकांची लागवड जमिनीचा उतार लक्षात घेऊन करावी. रताळ्यासारख्या पिकामुळे जमिनीवर अच्छादन तयार होऊन जमिनीची धूप कमी होते. तसेच पाणी व मृदा संधारणाचे काम होते. 
  • नारळ बागेतील आंतरपिके 

  • योग्य अंतर ठेवलेल्या बागेमध्ये सूर्यप्रकाशाची उपलब्धता आंतरपिकासाठी होऊ शकते. नारळाच्या बुंध्यापासून २ मीटर अंतर सोडून मधल्या जागेत आंतरपिके घ्यावीत. सुरणाची लागवड ६० सें.मी. बाय ६० सें.मी. अंतरावर तसेच शेवरकंदाची लागवड ९० सें.मी. अंतरावर सऱ्या करून करावी. वडीचा अळूसाठी नेहमीच्या ७५ सें.मी. बाय ७५ सें.मी. अंतरापेक्षा जवळ लागवड करावी. 
  • घोरकंद लागवड करताना २०० ते २५० ग्रॅम वजनाचे बेणे नारळ झाडाच्या सभोवती २ मीटर अंतरावर आळे करून त्यांच्या वरंबावर लागवड करावी. घोरकंदाच्या वेली नारळाच्या सर्व बाजूंनी दोरीच्या साह्याने आधार देत चढवाव्यात.
  • सुरण, आरारूट, भाजीचा अळू नारळ बागेमधल्या मोकळ्या निचऱ्याच्या जागेत खड्डे करून लागवड करावी. यानंतर या खड्ड्यात मातीची भर द्यावी.
  •  सुपारी बागेत आंतरपीक    झाडाच्या मधल्या उपलब्ध जागेत सुरण, आरारूट व वडीचा अळू या पिकाची लागवड करता येते. तर घोरकंदाच्या वेली सुपारीवर चौकट करून त्यावर चढविता येणे शक्य आहे.

    मुख्य पीक - आंतरपीक आंबा  -  कणगर, घोरकंद, करांदा, रताळी काजू   - कणगर, घोरकंद, करांदा, रताळी नारळ   - सुरण, वडीचा अळू, अरारूट, घोरकंद, शेवरकंद,  अळू  सुपारी   वडीचा अळू, घोरकंद, सुरण

    आंतरपीक -   सुधारित जात सुरण   - गजेंद्र  कणगर   - कोकण कांचन, श्री लता  घोरकंद   - कोकण घोरकंद, श्री कार्तिकी  करांदा   - कोकण कालिका  रताळी    -कोकण आश्‍विनी, कमल सुंदरी वडीचा अळू  -  कोकण हरितपर्णी शेवरकंद  -  श्री जया, श्री विजया   

    - डॉ. प्रज्ञा गुडधे,  ९४२०१२८६०३, (सहायक उद्यानविद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित कंदपिके संशोधन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली,जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com