वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये अडथळा निर्माण होऊन फळगळ वाढते. फळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ. घटकांचा समावेश असतो. संत्रा फळपिकामध्ये आंबिया बहार नैसर्गिकरीत्या येतो. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांचा कल हा आंबिया बहार घेण्याकडे असला तरी फळांची वाढ विषम परिस्थितीत होत असते. उदा. थंडीमध्ये फुलांचे फळात रूपांतर होते, त्यानंतर वाढीच्या अवस्थेत कडक उन्हाळा त्यानंतर पावसाळा अशा विपरीत अवस्थेतून फळे झाडावर आकार घेतात. वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये अडथळा निर्माण होऊन फळगळ वाढते. फळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ. घटकांचा समावेश असतो. बुरशीजन्य रोगामुळे होणाऱ्या फळगळसाठी उपाययोजना
ग्रीनिंग रोगामुळे होणारी फळगळ ग्रीनिंग रोग हा जिवाणूजन्य असून या रोगाचा प्रसार ''सिट्रस सायला'' किडीद्वारे होतो. प्रथम लक्षणे पानांवर दिसून येतात. पानाचा शिरांमधील भाग पिवळा होण्यास सुरुवात होते. हा पिवळेपणासुद्धा मध्य शिरेच्या दोन्ही बाजूस सारखा नसतो. शेवटी संपूर्णपणे पाने पिवळी होतात. रोगट पाने आकाराने लहान राहून ती फांद्यावर उभट सरळ होतात. फळे आकाराने लहान राहून त्यांची वाढ असमतोल होते. फळातील बिया काळ्या पडून सुरकुतलेल्या चपट्या राहतात. फळातील रसाची चव कडू होते. रोगग्रस्त झाडावरील फळांचा उन्हाकडील भाग पिवळा व सावलीतील किंवा पानात झाकलेला भाग गडद हिरवा राहतो. अर्धी पिवळी, अर्धी हिरवी असलेली ही फळे गळून पडतात. ग्रीनिंग रोगामुळे होणारी फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना
बुरशीजन्य फळगळ संत्रा फळझाडांमध्ये फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रीकम, डिप्लोडिआ, फायटोप्थोरा व अल्टरनेरिया या बुरशींमुळे होते. पावसाळ्यात या बुरशींचे संक्रमण फळांच्या देठांस विशेषतः फळांची साल व देठ यांचे जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात. तो भाग कुजून फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींची बीजफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात, परिणामी आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते. फायटोप्थोरा फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कूज लक्षणे जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी किंवा करडे डाग पडतात. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. फळाच्या हिरव्या कातडीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी-काळ्या रंगाचे होते. फळे सडून गळतात. फळ सडीच्या अवस्थेस ''ब्राऊन रॉट'' किंवा तपकिरी रॉट असे संबोधतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड या कारणांमुळे हा रोग अधिक प्रमाणात फोफावतो. कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो. पुढे त्याचे प्रमाण वाढत जाऊन संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे, वाळणे ही या रोगाची सुरुवातीचे लक्षण आहे. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी व कडक होतात. दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात. डिप्लोडिआ फळावरील कूज डिप्लोडिआ बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ हलक्या पिवळ्या रंगाचा चट्टा पडतो. चट्ट्याचा भागावर दाब दिला असता तो मऊ जाणवतो. पिवळा असलेला भाग नंतर करड्या किंवा तपकिरी रंगाचा होतो. कोरड्या उष्ण वातावरणात व झाडावर सल असलेल्या बागेत या बुरशीचा प्रकोप अधिक होतो. या वर्षी बऱ्याच ठिकाणी होणारी फळगळ डिप्लोडिआ बुरशीमुळे होत असल्याचे दिसते. अपुऱ्या पोषणामुळे होणारी फळगळ
(नोंद: * संशोधनावर आधारित ॲग्रेस्को शिफारस; लेबल क्लेम नाही.] संपर्क- डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७ डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.