इडा पिडा जावो...

आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कष्टाचे आणि हक्काचे फळ समप्रमाणात विभागून देणारा न्यायी उदार महासम्राट म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील शेतकऱ्यांचा महानायक राजा बळी.
Diwali
DiwaliAgrowon

शंकर बहिरट

आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कष्टाचे आणि हक्काचे फळ समप्रमाणात विभागून देणारा न्यायी उदार महासम्राट म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील शेतकऱ्यांचा महानायक राजा बळी. (Bali Raja) दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदा (Diwali, Padwa, BaliPratipada) असते. शेतकरी कुटुंबातल्या माता भगिनी या दिवशी ‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो’ असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात.

आपल्याकडे शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, बळी राजाचा वंश. बळीराजा प्रमाणेच शेतकऱ्यांचे अंतःकरण उदार आणि विशाल असते. अस्मानी आणि सुलतानी संकटांना धीरोदात्तपणे तोंड देत आपला शेतकरी दरवर्षी हसत मुखाने दिवाळी साजरी करत असतो. प्राचीन काळापासून शेती करता करता गायी, म्हशींचा सांभाळ करणाऱ्या शेतकरी कुटुंबातल्या माता भगिनी घरातील पुरुषांचे औक्षण करताना ‘दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी’ असे म्हणतात.

Diwali
Crop Insurance : विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ

या दिवशी गायी म्हशींची पूजा करण्यामागे त्या पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञतेचा भाव असतो. असा कृतज्ञतेचा भाव असणे म्हणजेच विशाल अंतःकरणाचा प्रत्यय असतो. रब्बी हंगामाच्या सुगीच्या दिवसांत दिवस रात्र कष्ट करणारा शेतकरी दिवाळीत थोडा निवांत होतो. दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याची संधी घेऊन येतो. आनंद, उत्साहासोबत गोड फराळाचा आस्वाद घेत, एकमेकांना शुभेच्छा देत आपली नाती अधिक दृढ होत असतात.

दिवाळीचा सण हा मांगल्याचा, प्रकाशाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण. आपल्या शेतीप्रधान देशात साजरे केले जाणारे सण हे शेती संस्कृतीशी निगडित आहेत. यंदा शेतकऱ्यांचे पावसामुळे आतोनात नुकसान झाले. आम्ही लढवय्या बळीराजाचे वंशज आहोत. कितीही संकटे आली किंवा आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत लढा देऊ.

हा लढा देण्यासाठी अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दिवा लावायला हवा. दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे जुने दुःख विसरून तिमिराकडून तेजाकडे नव्या उमेदीने पुन्हा आयुष्याकडे बघायला हवे. दिवाळी म्हणजे अवास्तव खरेदी साठी खर्च, बाजारू मिठाया आणि फटाक्यांचे प्रदूषण असे जणू समीकरण बनले आहे.

जे शहरातून ग्रामीण भागात पसरत आहे. पूर्वापार चालत आलेली आपली शेती संस्कृतीची दिवाळी निर्भेळ आनंद देणारा सण आहे. या दिवाळीचे मांगल्य जपले पाहिजे. प्रत्येक शहरवासीयाला दिवाळी साजरी करताना प्रथम शेतकऱ्याची आठवण व्हायला हवी. बळीचे राज्य येण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे. ‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com