Milk Industry : ऑनलाइन जनावर विक्रीसाठी 'अमूल'ने तयार केलं मोबाईल ॲप

दसरा दिवाळीचा सीझन म्हणजे ऑनलाइन शॉपिंगचा सीझन. बिग बिलियन डे वगैरे ऑफरचा मोह आपल्यापैकी कोणाला सुटलाय ? कपडेलत्ते टीव्ही फ्रीज मोबाइल बॅगा शूज. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काय मिळत नाही ते विचारा ?
Amul
Amul Agrowon

दसरा दिवाळीचा सीझन म्हणजे ऑनलाइन शॉपिंगचा सीझन. बिग बिलियन डे (Big Billion Day) वगैरे ऑफरचा मोह आपल्यापैकी कोणाला सुटलाय? कपडेलत्ते टीव्ही फ्रीज मोबाइल बॅगा शूज. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (Online Platforms) काय मिळत नाही ते विचारा ? कोणी कितीही टीका करो पण अगदी मोठ्या कंपन्यांपासून ते छोट्यात छोट्या सेलर पर्यंत प्रत्येकाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचं काम या ऑनलाइन शॉपिंग साईटसनी (Online Shopping Sites) केलंय. विक्रेता आणि ग्राहक दोघांसाठी विन विन सिच्युएशन असणाऱ्या या प्लॅटफॉर्म पासून आपल्या देशातील एक मोठा वर्ग मात्र अजूनही वंचित राहिलाय. तो म्हणजे शेतकरीवर्ग.

शेतकऱ्यांनी त्यांचे प्रॉडक्ट ऑनलाइन विकले किंवा त्यांना उपयुक्त असणाऱ्या वस्तु ऑनलाईन मिळू लागल्या तर ? अस्मानी आणि सुलतानी संकटाने त्रस्त असणारा बळिराजा याबाबतीतही दुर्लक्षितच राहिलाय हे मात्र खरं. पण हळूहळू परिस्थिती बदलत आहे. हे घडतंय गुजरातमध्ये.

गोमतीबेन पटेल, गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एक साध्या दूधउत्पादक शेतकरी. त्यांना त्यांची म्हैस विकायची होती. एरव्ही म्हैस विकणे म्हणजे बाजारात घेऊन जाणे तिथे दिवसभर वाट पाहणे, होणारा मोठा खर्च वगैरे बरीच उरस्फोड. त्यातही खूप गिऱ्हाईक मिळतील याची शाश्वती नाही, येणारे गिर्हाइक भाव पाडून मागत असते, वरून दलालांचा ताप असतो तो वेगळाच. यातून मनासारखी रक्कम मिळतच नाही.

गोमतीबेन सारख्या महिलांना तर जेवढे कष्ट होतात तेव्हढा या व्यवहारातून फायदा काही उरतच नाही. अशावेळी पुढे आलंय भारतात दूधक्रांती घडवणारं आणि गुजरातची लाईफलाईन म्हणून ओळखले जाणारे 'अमूल'. त्यांनी सुरू केलाय पशुधन ॲप.

Amul
PM Kisan : अमरावती जिल्ह्यातील २३ हजारांवर शेतकरी अपात्र

गोमतीबेन यांनी त्यांची चार वर्षांची म्हैस अमुलच्या पशुधन ॲपवर १.१० लाख किंमतीने विक्रीसाठी ठेवली. यासाठी त्यांनी फक्त आपल्या म्हैशीचे तीन फोटोग्राफ आपल्या अँन्ड्रॉईडचा वापर करून पशुधन ॲपवर टाकले. सोबत लोकेशन, एका दिवसात दूध किती देते (१४ लीटर), म्हशीची जात कोणती अशी माहिती शेअर केली.

चक्क १६० शेतकऱ्यांनी त्यांची पोस्ट पाहिली, चारजण खरेदी करण्यास उत्सुक देखील होते.‘पशुधन’ हा अमूलदूधसंस्थेचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यात त्यांनी आपल्या दुग्धउत्पादकांसाठी मोफत ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे. हा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना आपले स्थान, अपेक्षित किंमत, जनावराची उत्पादकता,जाती, वय, फोटो / व्हिडिओ इत्यादी तपशिलांसह "सेल ऑफर" ठेवण्याची सोय उपलब्ध करतो.

जवळपास दोनमहिन्यांपूर्वी हे ॲप्लीकेशन लाँच करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसात ते शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेमस झालंय. आता पाहिलं तर सुमारे ₹5 कोटी किमतीची गुरे विकण्यासाठी 900 हून अधिक पोस्ट कटण्यात आल्यात. या मध्ये बन्नी, जाफ्राबादी, मेहसाणा, मुर्राह, सुरती आणि आदी जातीच्या 256 मादी म्हशींचा समावेश आहे. हॉलस्टीन फ्रिजियन्स, गीर, साहिवाल, कांकरेज आणि डांगी अशा सुमारे 330 गायींच्या जातीही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय दोन डझन बैल आणि रेडे ही या ॲप वर विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. गुरांसाठीच्या किंमती 32,000 ते 2,00,000 च्या दरम्यान आहेत. या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणारी पारदर्शकता अमूल ब्रॅंडची मालकी असणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे अध्यक्ष शामलभाई पटेल सांगतात, "शेतकऱ्यांना या ॲपची माहिती कळाली तर ते याच्या प्रेमातच पडतात.

गुरांच्या खरेदीविक्रीसाठीच्या पारदर्शक व्यवहारासाठी पशुधन ॲप हे अद्भुत साधन ठरत आहे. पूर्वी या गोष्टी तोंडी माहिती, कमिशन एजंटस यांच्यावर अवलंबून असायच्या. आता त्याची गरज उरली नाही. ग्राहक आणि विक्रेता यांना थेट जोडून शेतकऱ्यांचा कमिशनवर होणारा खर्च वाचला आहे. फसवाफसवीची शक्यता संपली आहे. शेतकरी दिवसेंदिवस डिजिटल होत चालले आहेत. पशुधन ॲपवर त्यांच्या सर्व गरजा भागतील.

येत्या काळात हे ॲप फेमस होईल यात काही शंका नाही." बारा महीने २४ तास उपलब्ध असणाऱ्या या पशुधन ॲपबद्दल माहिती देताना अमूलचे सीईओ जयेन मेहता सांगतात, ही गुरांसाठी 24x7 बाजारपेठ आहे. इथे शेतकरी किंमतीसाठी वाटाघाटी करू शकतात आणि त्यांच्या पसंतीनुसार अंतर, जाती, गुरांचा प्रकार, उत्पादकता, किंमत श्रेणी, स्थानइत्यादींच्या आधारे फिल्टर करून हवे ते जनावर शोधू शकतात.

अमूल डेटाबेसनुसार, गुजरातमधील खेड्यापाड्यातील विविध दूध सहकारी संस्थांमध्ये ३६ लाख दूध उत्पादक नोंदणीकृत आहेत. त्यांच्याकडे सुमारे २५ लाख देशीगायी, ३५ लाखांहून अधिक संकरित गायी आणि ७० लाखांहून अधिक म्हशी आहेत. दुग्धव्यवसाय तज्ञांचा असा विश्वास आहे की हे व्यासपीठ पुढे जाऊन दुग्धव्यवसाय न करता केवळ जनावरांचे संगोपन आणि विक्री करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी पर्यायी व्यवसाय तयार करू शकेल.

आज लंपीसारख्या साथीच्या रोगामुळे जनावर बाजार बंद पडलेला आहे. फक्त गुजरातच नाही तर गोमतीबेन पटेलांच्या सारखे देशभरातील अनेक शेतकरी साथीच्या रोगांपासून आपल्या जनावरांचे रक्षण करून घरच्या घरी गुरांची सुरक्षितपणे खरेदी विक्री करू शकतील ते फक्त डिजिटल प्लॅटफॉर्म वापरुनच. यासाठी पशुधन ॲप बळीराजासाठी वरदानच ठरेल हे नक्की.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com