Sanskruti Savardhan Mandal : गाढवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रकल्प राबवणारी संस्था

शेतकऱ्यापासून ते गाढवापर्यंत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या संस्कृती संवर्धन मंडळाचे कार्य बहुपेडी आहे.
Sanskruti Savardhan Mandal
Sanskruti Savardhan MandalAgrowon

आज ६३ वर्षांनंतर या रोपट्याचं रुपांतर वटवृक्षामध्ये झालं आहे. ही संस्था शिक्षणासह कृषी, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास या पाच क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. सर्वांत कष्टाळू परंतु दुर्लक्षित प्राणी असलेल्या गाढवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या २२ वर्षांपासून धर्मा डॉकी सँक्च्युअरी हा प्रकल्प राबवला जात आहे.

Sanskruti Savardhan Mandal
Water Conservation : लोकसहभागातून ४,५७० बंधारे बांधणार

१९७२ च्या दुष्काळात नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अनेक वाड्या, तांडे होरपळून निघाली. त्या वेळी कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांजवळ असलेले पशुधन सगरोळी (ता. बिलोली) येथे सोडण्याचे आवाहन केले होते. शेकडो शेतकऱ्यांनी आपली जनावरं सगरोळीला सोडली. बाबासाहेबांनी चारा आणि पाण्याची व्यवस्था केल्याने जनावरांचे प्राण वाचले. दुष्काळानंतर अनेकांनी आपली जनावरं परत नेली; परंतु कायमचे स्थलांतरित झालेले शेतकरी आजतागायत गावाकडे फिरकलेच नाहीत.

Sanskruti Savardhan Mandal
Soil And Water : माती आणि पाणी अजून मौल्यवान होणार

त्यांची जनावरं मात्र सगरोळी येथेच संस्थेत राहिली. त्याच वर्षी खऱ्या अर्थाने संस्कृती संवर्धन मंडळामध्ये सेंद्रिय शेतीची बीजे रोवली गेली. शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सन १९७२ साली सुरू झालेला हा प्रवास अविरतपणे चालू आहे.

तत्पूर्वी सन १९५५ मध्ये बाबासाहेबांची थोरली मुलगी सुलोचना चौथी उत्तीर्ण झाली. मुलीच्या पुढील शिक्षणासाठी बाबासाहेब पुणे येथील हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत गेले असता, संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची भेट झाली. कर्वे यांचे व्यक्तिमत्त्व व साधी राहणीमान, मुलींच्या शिक्षणाला वाहिलेले जीवन पाहून बाबासाहेब प्रभावित झाले.

शिक्षणाचे महत्त्व काय असते, याची जाणीव असल्याने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी सगरोळीसारख्या खेड्यातून पाचशे किमी अंतरावर पुणे येथे आपण पोहोचलो; परंतु बहुजन समाजातील इतर मुलींचे काय, असा प्रश्‍न त्या वेळी बाबासाहेबांना पडला. त्यांची झोप उडाली. सतत परिसरातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये घोंघावत होता. अखेर आपणही या भागात कर्वेंसारखी शिक्षणाची व्यवस्था उभी करायचे हे निश्‍चित केले.

महाराष्ट्रभर फिरून अनेक नामवंत शिक्षण संस्थांना भेटी दिल्या. माहिती घेतली, अभ्यास केला. १९५९ मध्ये स्वतःची दीडशे एकर जमीन दान देऊन समविचारी, ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने सगरोळी येथेच संस्कृती संवर्धन मंडळ नावाचे रोपटे रोवले. आज ६३ वर्षांनंतर या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालं आहे. ही संस्था शिक्षणासह कृषी, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास या पाच क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com