Aquatic Plants : शोभिवंत मत्स्यालयातील जलीय वनस्पती

नैसर्गिकरित्या नदी किनारी किंवा नदीच्या पात्रात उगविणाऱ्या वनस्पतींना ‘जलीय वनस्पती’ असे म्हणतात. शोभिवंत मत्स्यालय सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी तसेच नैसर्गिक वातावरण निर्मिती करण्यासाठी जलीय वनस्पती लावल्या जातात.
Aquatic Plants : शोभिवंत मत्स्यालयातील जलीय वनस्पती

श्रीतेज यादव, जयंता टिपले

नैसर्गिकरित्या नदी किनारी किंवा नदीच्या पात्रात उगविणाऱ्या वनस्पतींना ‘जलीय वनस्पती’ (Aquatic Plants) असे म्हणतात. शोभिवंत मत्स्यालय (Aquarium) सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी तसेच नैसर्गिक वातावरण निर्मिती करण्यासाठी जलीय वनस्पती लावल्या जातात.

मत्स्यालयात या वनस्पती लावल्यामुळे माशांसाठी (Aquarium Fish) नैसर्गिक वातावरण निर्मिती तयार होते. या वनस्पती माशांसाठी एक प्रकारे निवारा म्हणून काम करतात. मासे या वनस्पतींवर अंडी घालतात. लहान मासे याचा खाद्य म्हणून वापर करतात.

Aquatic Plants : शोभिवंत मत्स्यालयातील जलीय वनस्पती
Fish Culture : उजनी जलाशयात ५० हजार मत्स्यबीज सोडले

जलीय वनस्पतींचे प्रकार ः

१) मत्स्यालयातील पाण्यात पूर्णतः बुडालेल्या वनस्पती.

२) अर्ध्या बुडालेल्या वनस्पती.

३) पाण्याच्या पृष्ठभागावर असणाऱ्या वनस्पती.

१) मत्स्यालयातील पाण्यात पूर्णतः बुडालेल्या वनस्पती.

- या वनस्पती मत्स्यालयात मागील बाजूस लावल्या जातात. तसेच काही लहान आकाराच्या वनस्पती मधल्या बाजूला लावल्या जातात.

- या वनस्पती शोभिवंत मत्स्यालयात कोणत्या बाजूला लावल्या जातात, त्यावरून काही प्रकार पडतात.

अ) पुढच्या बाजूला लावल्या जाणाऱ्या वनस्पती ः

- या वनस्पतींची उंची बागेतील गवताप्रमाणे लहान असते. या पसरत जातात.

ब) बाजूने लावल्या जाणाऱ्या वनस्पती ः

या वनस्पती बारीक खोडाच्या आणि लहान झुडुपासारख्या असतात. उदा.हायड्रोकॉटील ट्रायपटा (hydrocotyle tripata)

Aquatic Plants : शोभिवंत मत्स्यालयातील जलीय वनस्पती
Fighter Betta Fish : फायटर (बेट्टा) माशाचे प्रजनन तंत्रज्ञान

क) मागील बाजूस लावणारे जलीय वनस्पती ः

या वनस्पती लांब पानाच्या आणि मोठ्या खोडाच्या असतात. त्यामुळे या वनस्पती मत्स्यालयाच्या मागील बाजूस शोभून दिसतात.

उदा. जायन्ट व्हॅलिस्नेरिया, रोटला इ.

ड) इतर जलीय वनस्पती ः

काही वनस्पतींना फक्त पाने आणि मुळे असतात. पाण्यामध्ये दगडावर किंवा कुजलेल्या लाकडावर उगवलेल्या आढळून येतात.

उदा. जावा फरन, जावा मॉस इ.

२) पाण्यात अर्ध्या बुडालेले वनस्पती ः

- या वनस्पती मत्स्यालयामध्ये विकसित झाल्यानंतर पाण्याच्या बाहेर येतात. उदा. ॲलिगेटर गवत इ.

३) पाण्याच्या पृष्ठभागावर असणाऱ्या वनस्पती ः

या वनस्पतींची पाने आणि फुले हे मत्स्यालयामधील पाण्याच्या पृष्ठभागावर असतात. या वनस्पतींची मुळे पाण्यातील विषारी पदार्थ शोषून मत्स्यालयाचे आरोग्य चांगले ठेवतात. लहान मासे या वनस्पतींना खातात.

मत्स्यालयाची घ्यावयाची काळजी ः

- जलीय वनस्पतींची वाढ करण्यासाठी नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), पोटॅशिअम (K) या पोषकतत्त्वांची गरज असते. ती पाण्याच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध आहेत ही पहिले काही काळ टाका वी लागतात ज्यामुळे वनस्पतीची वाढ होते.

- काही जातीचे मासे जलीय वनस्पती खातात. अशा माशांना मत्स्यालयामध्ये सोडू नये.

- मत्स्यालयाचे पाणी नियमितपणे दर सात दिवसांनी बदलावे. जेणेकरून मत्स्य टाकीमध्ये निरोगी वातावरण राहील.

- मत्स्यालयाच्या आकारानुसार मासे आणि वनस्पतींची निवड करावी. तसेच संख्या मत्स्यालयाच्या आकारमानानुसार ठरवावी. जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही. वनस्पती आणि माश्यांचा सर्वांगीण विकास होईल.

- मत्स्यालयात जलीय वनस्पतींची वाढ होण्याकरिता कृत्रिमरीत्या प्रकाशाची उपलब्धता करावी. त्यासाठी टाकीच्या वरील बाजूस दिवे लावावेत. हे दिवे दिवसातील किमान १२ ते १८ तास चालू ठेवावेत.

- श्रीतेज यादव, ८८०६३३३७६०

- जयंता टिपले, ८७९३४७२९९४.

(मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com