एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” (Bird Flue) हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो.
हा रोग ‘एच ५ एन १’ (H5N1) या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग पसरत असल्याने कुक्कुटपालकांमध्ये (Poultry) चिंता वाढली आहे.
कोणत्याही भागात बर्ड फ्लू चा संसर्ग झाल्यास इतर पक्षांना संसर्ग होऊ नये यासाठी एक किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील पक्षी नष्ट केले जातात.
भारतात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे दरवर्षी लाखो पक्षी दगावतात. भारतात सर्वाधिक बदके आणि कोंबड्यांना या संसर्गाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पेरुंगुझी जंक्शन वॉर्डमध्ये घबर्ड फ्लूच्या संसर्गामुळे २०० बदकांचा मृत्यू झाला आहे.
यानंतर येथील प्रशासनाने १ किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या ३० पक्ष्यांना नष्ट करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे इतर पोल्ट्री उत्पादकांची चिंता वाढली आहे.
बर्ड फ्लूचा संसर्ग पसरल्यावर केवळ पक्षीच नव्हे, तर या पक्ष्यांपासून मिळणारे अंडी, मांस, चारा आणि कोंबडी खतही नष्ट करावे लागते.
हे सर्व काम शासनाच्या आदेशान्वये व पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीखाली केले जाते.
सध्या केरळमधील किझुविल्लम, कडककवूर, कीझहतिंगल, चिरायिंकिझू, मंगलपुरम, अंदुरकोनम आणि पोथेनकोड पंचायतींना एव्हियन इन्फ्लूएन्झा पाळत ठेवणारे क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत केवळ कोंबड्या, बदक, गीज, बटेर, टर्की आणि इतर पाळीव पक्ष्यांमध्येच बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे,
मात्र केरळ आरोग्य विभागाने या पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना विशेषतः तरुणांनी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पक्षांच्या संपर्कात येणाऱ्या कुक्कुटपालकांनी तोंडावर मास्क आणि हातात हातमोजे घालावेत. पोल्ट्री धारकांनी शेडमध्ये जंतूनाशकाची फावरणी करावी.
हात पाय साबणाने स्वच्छ धुवावेत. बर्ड फ्लू नियंत्रित जैव-सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडकपणे पालन करावे.
पक्षी संक्रमित नसले तरी सर्व कुक्कुटपालकांनी आपल्या फार्मवर प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.