Animal Care : आहार नियोजनातून वाढवा जनावरांची रोगप्रतिकारशक्ती

जनावरांचे आरोग्य आणि नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी लसीकरण, आहारातील विशेष घटक, गोठ्याचे व्यवस्थापन, वासरांची योग्य काळजी याकडे लक्ष द्यावे.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. पराग घोगळे - जनावरांचे आरोग्य आणि नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता (Animal Health And Natural Immunity) टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी लसीकरण, (Animal Vaccination) आहारातील विशेष घटक, गोठ्याचे व्यवस्थापन, वासरांची योग्य काळजी याकडे लक्ष द्यावे. कारण विषाणूजन्य आजारांमुळे रोगप्रतिकारक्षमता कमी होते. यासाठी संतुलित आहार (Animal Balanced Diet) आणि आरोग्य व्यवस्थापन (Health Management) महत्त्वाचे आहे.

Animal Care
Animal Care : जनावरांमध्ये आहे स्वतःची उपचार पद्धती

लम्पी स्कीन आजार तसेच इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव जनावरांसाठी पर्यायाने दूध उत्पादनासाठी अडचणीचा आहे. हे विषाणू आपले प्रारूप सातत्याने बदलून जनावरांच्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता कमी करतात. एकदा का जनावरांमध्ये विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाला, की त्यानंतर दूध उत्पादनात झालेली घट लवकर भरून येत नाही.

Animal Care
Dairy Animal : दुभत्या जनावरांसाठी चीक धोकादायक का आहे?

म्हणूनच लम्पी स्कीन, लाळ्या खुरकूत, तसेच इतर विषाणूंद्वारे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्या गाई म्हशींची रोगप्रतिकार क्षमता विविध वातावरणातील बदलांत टिकवून ठेवणे आवश्यक ठरते. विषाणूजन्य आजार हे वासरांच्या मृत्यूसही कारणीभूत ठरतात. गाय, म्हैस विण्याअगोदर ३ आठवडे आणि व्यायल्यानंतर ३ आठवडे असा एकूण ६ आठवड्यांच्या संक्रमण काळात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरते.

Animal Care
Animal Care : जनावरांना कसा होतो किटोसिस आजार?

यासाठी जनावरांचे आरोग्य आणि नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता टिकवून ठेवणे, लसीकरण करणे, आहारातील विशेष घटक, गोठ्याचे व्यवस्थापन, वासरांची योग्य काळजी याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. कारण विषाणूजन्य आजारांमुळे रोगप्रतिकारक्षमता कमी होऊन इतर जिवाणूजन्य आजार जसे की मस्टायटीस, श्‍वसन संस्थेचे आजार, पोटाचे आजार होण्याचा धोका दरवर्षी संभवतो. म्हणूनच जनावरांच्या आहार नियोजनाने रोगप्रतिकार प्रणाली अधिकाधिक मजबूत करणे क्रमप्राप्त ठरते.

रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना ः

संतुलित आहार :

- गाय किंवा म्हशीला तिच्या वजनाच्या ३ टक्के इतका कोरडा चारा एका दिवसात दिला पाहिजे. हा चारा कमी पडल्यास जनावरांचे वजन कमी होत जाऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. म्हणजेच ४०० किलो वजन असलेल्या आणि १० लिटर दूध देणाऱ्या गायीला एकूण १२ किलो पाणी विरहित चारा खाद्य, तसेच इतर घटक दिले गेले पाहिजे.

वजनानुसार गाई-म्हशींना खाद्य व चारा देण्याचे प्रमाण :

जनावराचे वजन (किलो)---एकूण शुष्क पदार्थ (वजनाच्या ३ टक्के)---पशुखाद्य (किलो)---कोरडा चारा (किलो) ---हिरवा चारा (किलो)

४०० ---१२ किलो---५.५ ---४ ---१८ ---४५० ---१३.५ ---६ ---४.५ ---१६

५०० ---१५ किलो---६.५ ---५ ---२२

५५० ---१६.५ किलो ---७ ---५.५ ---२५

टीप ः

* पशुखाद्य, कोरडा व हिरवा चारा यांचे प्रमाण आर्द्रतेसह गृहीत धरले आहे.

* वरील प्रमाण हे २४ तासांचे असून, दोन वेळेस विभागून जनावरांना देण्यात यावे.

* कोरडा चारा उपलब्ध नसल्यास हिरवा चारा वाढवून द्यावा.

* याव्यतिरिक्त दुभत्या गाई-म्हशींना बायपास फॅट, पाचक घटक व खनिज मिश्रण द्यावे.

चांगल्या प्रतीची प्रथिने :

- प्रथिने ही अमिनो आम्लांची बनलेली असतात. शरीरात पांढऱ्या रक्त पेशी व प्रतिपिंडांचे (अँटिबॉडी) उत्पादन सुरळीत होण्यासाठी प्रथिनांची गरज असते. चांगल्या प्रतीची प्रथिने गायी, म्हशींना तेलवर्गीय बियांपासून निघालेल्या तेलविरहित पेंडीमधून मिळू शकतात, जसे की मोहरी, सोयाबीन, शेंगदाणा, कपाशी तसेच लसूणघास (अल्फा अल्फा), बरसीम, अझोला यामध्येही चांगली प्रथिने असतात.

कॅल्शिअम :

- शरीरातील अनेक जैवरासायनिक क्रिया सुरू ठेवण्यासाठी, स्नायूंचे काम त्यांचे आकुंचन-प्रसरण, संप्रेरकांचे काम, पेशींमधून आत जाणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या घटकांवर इतर अन्न घटकांच्या साह्याने नियंत्रण ठेवणे, विकर (एन्झाइम्स) कार्यक्षमता वाढविणे इत्यादी कामे कॅल्शिअममुळे सुरळीत होतात. या सर्व क्रिया जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यामुळे जनावरांच्या आहारात पूरक कॅल्शिअम द्यावे.

- शेवगा पाला, खनिज मिश्रण यामध्येही चांगल्या प्रमाणात कॅल्शिअम उपलब्ध होते.

जीवनसत्त्व अ ः

- शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली सांभाळणाऱ्या पेशींना उद्दीपित करून प्रतीपिंडाद्वारे विविध विषाणू व जिवाणूंना निष्प्रभ करते.

- शरीरात प्रथिनांचे कार्य सुधारते. जनावरांच्या शरीरातील पेशींमध्ये जी टाकाऊ द्रव्ये असतात ती बाहेर न पडल्यामुळे एक प्रकारचा ताण (ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस) जनावरांवर येतो. तो जीवनसत्त्व -अ दिल्यामुळे कमी होण्यास मदत होते.

- ताज्या हिरवा चाऱ्यामध्ये मुबलक बीटा कॅरोटीनचे रूपांतर जनावरे जीवनसत्त्व-अ मध्ये करतात. तसेच हे जीवनसत्त्व पूरक स्वरूपातही दिले जाऊ शकते.

लोह व फोलिक आम्ल :

- लोह किंवा आयर्न हे एक खनिज आहे. फोलिक आम्ल हे ब वर्गीय जीवनसत्त्व आहे. शरीरातील हिमोग्लोबिन व पांढऱ्या पेशींचे कार्य सुरू ठेवण्यासाठी यांची आवश्यकता असते.

- लोह हे खनिज मिश्रण स्वरूपात व फोलिक आम्ल हे ताज्या हिरव्या चाऱ्याच्या माध्यमातून तसेच पूरक स्वरूपात दिले जाते.

झिंक (जस्त) आणि जीवनसत्त्व एच :

- हे शरीरात परस्परपूरक स्वरूपात कार्य करतात. जनावरांच्या शरीरावर बाहेरून होणारी जिवाणू व विषाणूंची आक्रमणे थांबवण्याचे काम यांद्वारे होत असते.

- शरीरातील विविध चयापचय प्रक्रिया पार पडण्यासाठी झिंक किंवा जस्त अतिशय उपयुक्त असते. तसेच कासेचा दाहसाठी कारणीभूत असलेल्या जिवाणूंपासून जनावरांचे संरक्षण करते.

सेलेनियम व जीवनसत्त्व ई :

- गायी, म्हशींना वाढत्या वयानुसार रोगप्रतिकार क्षमतेत जी घट होते ती भरून काढण्याचे कार्य हे दोन्ही घटक करतात. अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतात.

- हे दोन्ही घटक सोबत व परस्परपूरक पद्धतीने शरीरात कार्य करतात. सुलभ प्रसूती, दुधातील दैहिक पेशी कमी करणे, वासरांचे मृत्यू कमी करणे यामध्ये सेलेनियम व जीवनसत्त्व ई उपयुक्त ठरतात.

जैवसक्रिय केलेली स्निग्धाम्ले (बायोअॅक्टिव्हेटेड फॅटी अॅसिड्स) :

- या तंत्रज्ञानाद्वारे लघू व मध्यम साखळीयुक्त स्निग्धाम्ले जसे की प्रोपिओनिक, ॲसिटिक आणि लौरिक आम्ल यातील अशुद्धता काढून त्याचे इस्टर स्वरूपात रूपांतर केले जाते.ज्यामुळे ही आम्ले जनावरांच्या आतड्यातून शरीरात जाऊन विविध प्रकारचे विषाणू व जिवाणूंना प्रतिबंध करण्यास शरीर नैसर्गिकरीत्या सक्षम होते.

अशा प्रकारचे अन्नघटक जनावरांच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास अतिशय उपयुक्त ठरतात तसेच जनावर संक्रमित झाल्यास आजारातून बरे होऊन बाहेर येण्यासाठीही तसेच दूध उत्पादन व वाढ पूर्ववत होण्यासाठीही वरील घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पशुवैद्यकाच्या किंवा पशुआहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वरील आहारघटकांचा वापर गरजेनुसार करावा.

संपर्क ः डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९

(लेखक पशुआहार तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com