Dudhi Bhopala : दुधी भोपळ्याच्या या पदार्थांना आहे चांगली मागणी

भारतीय आहारामध्ये विविध प्रकारे दुधी भोपळ्याचा वापर केला जातो. दुधी भोपळ्यापासून प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती केल्यास शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये चांगली प्राप्ती होऊ शकते.
Dudhi Bhopala
Dudhi BhopalaAgrowon

भारतीय आहारामध्ये विविध प्रकारे दुधी भोपळ्याचा वापर केला जातो. दुधी भोपळ्यापासून प्रक्रिया (Bottle Gourd) उत्पादनांची निर्मिती केल्यास शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये चांगली प्राप्ती होऊ शकते.

अत्यंत कमी वेळामध्ये शिजणाऱ्या पाककृतीमध्ये गोड हलव्यासोबत भाजी, टूटी फ्रुटी, गोड लोणचे, तिखट लोणचे, कोफ्ता करी यांचा समावेश आहे. भोपळ्याच्या लांब चकत्यांचा वापर शाकाहारी सुशीमध्ये केला जातो.

अगदी सोपा प्रकार म्हणजे दुधी भोपळ्याचा रस. भोपळ्याच्या बिया तशाच किंवा भाजून खाल्ल्या जातात. दुधी भोपळ्याची भुकटी (Powder), गर आणि रस अनेक व्याधीवर उपयुक्त आहे. त्यामुळे या पदार्थांना आयुर्वेदात चांगली मागणी आहे. 

Dudhi Bhopala
Red Pumpkin : लाल भोपळ्याच्या दर्जेदार उत्पादनात सातत्य

भुकटी

ताजे फिकट हिरव्या रंगाचे व्यवस्थित पक्व झालेले समान आकाराचे व रंगाचे दुधी भोपळे चांगल्या प्रकारे धुऊन घ्यावेत. त्याच्या उभ्या अक्षावर दोन भागामध्ये कापून घ्यावेत. त्यातील अखाद्य भाग चमच्याच्या साह्याने काढून घ्यावा.

त्यानंतर भोपळ्याचे ३ मि.मी. आकाराचे तुकडे करून घ्यावेत. गोलाकार भोपळे असल्यास त्याच्या पट्ट्या काढाव्यात. वायर बास्केटमध्ये घेऊन घट्ट झाकण असलेल्या खोलगट भांड्यामध्ये ठेवून वाफेच्या साह्याने ब्लांचिंग (बुडवून लगेच काढणे) करावे.

हे तुकडे २५ सेंमी खोल मोकळ्या बास्केटमध्ये ठेवावेत. त्यातून पाणी पूर्ण निथळून जाऊ द्यावे. पाण्याशी पुन्हा त्याचा संपर्क येऊ देऊ नये.

पुन्हा सहा मिनिटांसाठी ब्लांचिग करावे. ब्लांचिग केलेले तुकटे कॅबिनेट ड्रायरमध्ये किंवा सोलर ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये वाळवावेत. किंवा सरळ सूर्यप्रकाशातही वाळवता येतात.

चांगले वाळल्यानंतर मिक्सर किंवा स्थानिक गिरणीमधून बारीक करून घ्यावेत.  या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा ऑनलाईन चांगली मागणी आहे.       

दुधी भोपळ्याचा गर    

ताज्या फिक्कट हिरव्या समान रंगाचे, योग्य पक्वतेचे दुधी भोपळे घ्यावेत. त्याचे उभ्या अक्षावर कापून दोन तुकडे करावेत.

त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. त्यातील बिया हाताने काढून टाकाव्यात. तुकडे दोन मिनिटांसाठी ९० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ब्लांचिंग करून घ्यावे.

त्यानंतर पल्परमध्ये बारीक करून गर करावा. त्यात सोडियम बेन्झोएट ०.०५ ते ०.१ टक्के मिसळावे.

हा गर डब्यांमध्ये भरून ८२ अंश सेल्सिअम तापमानामध्ये ५ मिनिटे ठेवून काढावेत. ही प्रक्रिया केल्यामुळे गर ९० दिवसांपर्यंत सुरक्षितपणे साठवता येतात.   

रस 

ब्लांचिग केलेल्या दुधी भोपळ्याच्या तुकड्यापासून सेंट्रीफ्युगल ज्यबसरच्या साह्याने पाण्याशिवाय रस काढता येतो.

किंवा त्यात दोन भाग भोपळ्याच्या तुकड्यासाठी एक भाग पाणी मिसळूनही रस काढता येतो.    

Dudhi Bhopala
Food Processing : मोह फुलांच्या प्रक्रियेमध्ये चांगली संधी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com