Fish Disease : माशांमधील आजाराची कारणे अन् उपचार

तलावातील माशांना परजीवी, जिवाणू आणि बुरशींच्या प्रादुर्भावामुळे विविध आजार (Fish Disease) होतात. आजाराचे लक्षणे ओळखून वेळेवर उपचार (Fish Disease Treatment) करणे आवश्‍यक आहे.
Fish Disease
Fish DiseaseAgrowon

किरण वाघमारे

परजीवीमुळे होणारे आजार

वेगळ्या पद्धतीने वागणाऱ्या माशांकडे काळजीपूर्वक पाहावे.

त्वचेकडे, गिल्सच्या आत आणि शरीराच्या आत पाहावे.

तुम्हाला शरीरावर काही चिकटलेले किंवा फिरताना किड्यासारखे किंवा खेकड्यासारखे काही दिसत आहे का? माशांवर खूप चिखल आहे का? त्वचेवर अल्सर आहेत का? हे तपासावे.

फिश लॉस

शरीराला चिकटतो किंवा त्वचेवर फिरतो.

डोळ्याला दिसतात.

तलावांमध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थांसह अनेक समस्या निर्माण करतात.

हे माशाचे रक्त पितात. मोठे अल्सर होतात. मासे शरीरावर भरपूर चिकट स्राव तयार करतात.

मासे आळशी होतात. खाद्य खात नाहीत.

अँकर वर्म

कल्ले आणि शरीराशी चिकटतो.

माशाच्या अंगावर प्रमाणात गडद, धाग्यासारख्या शेपट्या दिसतात.

कटला माशासाठी मोठी समस्या आहे.

मासे कमजोर होतात.

उपचार

फिश लाऊस आणि अँकर वर्मसाठी माशांना आठवड्यातून एकदा १ मिनीट मॅलेथिऑन (०.२५ मिलि प्रति लिटर पाणी)मध्ये तीन आठवडे अंघोळ घालावी. हे कीटकनाशक असल्याने वापरण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभाग अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे. तलाव स्वच्छ करावा.

Fish Disease
Fish Farming : मत्स्यपालनातील नवे तंत्रज्ञान

फ्लूक्स

हे कल्ले आणि त्वचेला चिटकतात.

त्वचेवर रक्त आणि पांढरे ठिपके दिसतात.

सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध तलावांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.

मत्स्यबीज संवर्धन तलावात बरेच मासे मारतात.

माशांवर इतर परजीवी प्रादुर्भाव करतात.

उपचार

माशांना २० ते २५ मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फॉर्मेलिनने अंघोळ घालावी. फार्मेलिन विषारी असल्याने याचा वापर करण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभाग अधिकारी किंवा मत्स्यतज्ज्ञांचा सल्ला द्यावा. तलाव स्वच्छ ठेवावा.

परजीवींचा प्रादुर्भाव

हे परजीवी डोळ्यांनी दिसत नाहीत. परंतु आपल्याला त्याची लक्षणे दिसतात.

शरीरावर पांढरे डाग दिसतात. माशांवर मीठ शिंपडल्यासारखे दिसते.

हे लहान मत्स्यबीज आणि बोटुकलीवर प्रादुर्भाव करतात.

माशांच्या शरीरावर वाढतात. नंतर शरीर सोडून तलावाच्या तळाशी जातात. यांची लहान पिले जन्माला येतात आणि मासळीला नुकसान करतात.

काही परजीवी कल्ले आणि त्वचेचे नुकसान करतात. त्वचेवर रक्त किंवा पांढरे ठिपके दिसतात.

मासे बारीक दिसतात. काहींना श्‍वास घेण्यास त्रास होतो. मत्स्यबीज आणि बोटुकलींना मारतात.

Fish Disease
Fish Farming : घरगुती मत्स्यबीज निर्मिती तंत्र ठरते फायदेशीर

उपचार

माशांना मिठाच्या द्रावणात १ मिनिटांसाठी अंघोळ द्यावी (बाथटबमध्ये प्रति लिटर पाण्यात २० ग्रॅम मीठ मिसळावे).

जिवाणूमुळे होणारे आजार

दररोज मासे मरत असतील तर जिवाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे, असे समजावे.

कॉटन वूल

डोके, ओठ आणि पंखांवर कापसांसारखे पांढरे डाग दिसतात. नंतर संपूर्ण शरीर झाकतात.

उपचार

पोटॅशिअम परमॅंगनेट २० मिलिग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून या द्रावणात माशांना १५ मिनिटे अंघोळ घालावी.

Fish Disease
Fish Farming : माशांना होणाऱ्या आजारांवर उपचार

शेपूट आणि पंख सडणे

पिलांपासून ते मोठ्या मासळीपर्यंतच्या सर्व अवस्थांवर परिणाम होतो.

शेपूट आणि पंख हळूहळू नष्ट होतात.

उपचार

प्रादुर्भावीत भागावर कॉपर सल्फेट (५०० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात उपचार करावेत.)

अल्सर

शरीरावर पांढऱ्या गुच्छासारखे चट्टे दिसतात, ज्यामुळे त्वचेला इजा होते आणि गोलाकार, गडद लाल व्रण निघतात.

तीव्र आजाराने मासे मरतात.

उपचार

तलावाची स्वच्छता करावी. ठरावीक अंतराने चुना वापरावा.

सात दिवस खाद्यामध्ये ऑक्सीटेट्रासाइक्लिन (२५ मिग्रॅ/किलो) मिसळावे. हे एक प्रतिजैविक आहे.

रक्त विषबाधा

तोंड आणि कल्यावर, गुदद्वाराभोवती आणि पंखांच्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. त्यामुळे लहान मासे मरतात.

उपचार

दहा दिवसांकरिता खाद्यामध्ये ऑक्सीटेट्रासाइक्लिन (५० ते ७० मिग्रॅ/किलो) द्यावे.

प्रत्येक आठवड्यात तलावाच्या पाण्यात मिथिलीन ब्लू (४ मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी) टाकावे.

एडवर्ड्स आजार

१ ते ३ दिवसांत तुमचे सर्व मत्स्यजिरे नष्ट होतात.

कार्प माशामध्ये हा आजार दिसतो.

मासे फिकट गुलाबी आणि पातळ होतात.

काही वेळा शरीरावर पिनहेडच्या आकाराचे लालसर ठिपके असतात.

उपचार

आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पाण्याची गुणवत्ता सुधारावी.

बुरशीजन्य आजार

कापूस लोकर आजार

अंडी, मत्स्यबीज, बोटुकली आणि मोठे मासे हाताळतेवेळी आणि जाळ्यामुळे झालेल्या जखमांमुळे किंवा त्वचेच्या इतर समस्यांमुळे आजार होतो.

उपचार

संक्रमित अंडी किंवा मासे एक मिलिग्रॅम मॅलाचिट ग्रीन प्रति लिटर पाण्यात मिसळून एक तासापर्यंत अंघोळ घालावी.

मत्स्यबीजाला २ टक्के मिठाची अंघोळ दिल्यास त्यांच्या कल्यामधून बुरशी बाहेर पडण्यास मदत होते.

ईयूएस आजार

आजार पावसाळ्यानंतर किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीस होते.

शरीरावर लाल अल्सर होतात. जे संक्रमित होतात.

उपचार

संक्रमित माशांवर तातडीने उपचार करावेत. सात दिवसांच्या आत स्थिती सुधारते.

आजार होऊ नयेत यासाठी मार्गदर्शक सूचना

हे करावे हे करू नये

१. संवर्धनामध्ये उत्तम पाणी वापरावे व पाण्याची गुणवत्ता राखावी शेवाळयुक्त व काळे पाणी वापरू नये

२. योग्य प्रमाणात व नियमित अंतराने चुन्याचे द्रावण व शेणखताचे द्रावण तलावात शिपांवे गढूळ आणि वासरहित पाणी वापरू नये.

३. तलाव जंतुनाशक करण्यासाठी अतिरिक्त प्रमाणात चुन्याचा वापर करावा. पाण कोंबडा तलावात येऊ देऊ नये

४. इष्टतम प्रमाणात मत्स्यबीज सोडावे प्रमाणाबाहेर मत्स्यबीज तलावात सोडू नये.

५. संतुलित आहाराचा वापर करावा झाड पाला, पक्षी कोंबडी इ. भाग तलावात टाकू नये.

६. २-३ महिन्यांतून एकदा तलावातील माशांची तपासणी करावी. आजारी मासे खाऊ नयेत.

७. सॅम्पलिंगच्या वेळी संक्रमित, आजारी मासे आढळल्यास बाहेर काढावेत. मत्स्यतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. संक्रमित मासे परत तलावात सोडू नयेत. बांधावर टाकू नयेत.

८. सॅम्पलिंगकरिता वाळलेले व निर्जंतुकीकरण केलेले जाळे वापरावे संक्रमित तलावात वापरलेले जाळे वापरू नये

९. तलावातील पाण्यात दुर्गंधी होऊन वास येईल असे काही करू नये. खत व खाद्य जास्त प्रमाणात टाकू नये.

१०. नको असलेले गवत काडी कचरा, पाण वनस्पती, गोगलगायी, बेडूक इ. काढावे, त्यांचा नायनाट करावा. तलावांच्या बांधावर मृत मासे किंवा इ. कीटक टाकू नयेत.

११. एक पीक घेतल्यानंतर जमीन सुकवून तलावाचे निर्जंतुकीकरण (चुना मारणे) करावे पक्षी, कुत्री, मांजर, मासे खाणाऱ्या प्राण्यांचा तलावाच्या ठिकाणी प्रवेश टाळावा.

१२. मत्स्यबीज खरेदी शासनाकडून प्रमाणिकरण झालेल्या मत्स्यबीज केंद्रातून करावी. गुणवत्ता प्रमाणित बीज खरेदी करावे. नको असलेले व प्रतिबंधित मासे तलावात सोडू नयेत.

१३. जेव्हा पाण्याची गुणवत्ता चांगली असेल आणि तलावात पुरेसे नैसर्गिक खाद्य (प्लवंग) उपलब्ध असेल तेव्हाच बीज सोडावे. बिल्चिंग वापरलेले पाणी वापरू नये.

१४. प्रति महिना पाण्याची तपासणी करावी. कीटकनाशके वापरलेल्या गोष्टी तलावात धुऊ नयेत.

महत्त्वाची सूचना

कोणत्याही आजाराच्या लक्षणाची खात्री झाल्याशिवाय उपचार करू नयेत. आजाराची लक्षणे आणि उपचाराकरिता मत्स्य व्यवसाय विभाग अधिकारी किंवा मत्स्यतज्ज्ञाशी संपर्क साधावा.

- किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(सहायक मत्स्य व्यवसाय विकास

अधिकारी, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com