Chana Cultivation : हरभरा उत्पादन वाढीसाठी या गोष्टी आवश्यक

खरिपातील कमी कालावधीच्या पिकांची काढणी झाल्यानंतर कोरडवाहू परिस्थितीत अथवा संरक्षित ओलिताची सोय असल्यास ओलिताखाली हरभऱ्याची लागवड केली जाते.
 Chana Cultivation
Chana CultivationAgrowon

हरभरा रब्बी हंगामातील (Rabbi Season) महत्त्वाचे कडधान्य पीक (Pulse Crop) आहे. खरिपातील कमी कालावधीच्या पिकांची काढणी झाल्यानंतर कोरडवाहू परिस्थितीत (Rainfed Codition) अथवा संरक्षित ओलिताची सोय असल्यास ओलिताखाली हरभऱ्याची लागवड (Chana Sowing) केली जाते. या हंगामात सातत्याने आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या लांबल्या आहेत. सध्या मुबलक ओलावा असल्यामुळे कोरडवाहू स्थितीतही हरभरा पिकाची पेरणी करता येते. चांगल्या उत्पादनासाठी हरभऱ्याची पेरणी करताना काय काळजी घ्यावी याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हरभरा पैदासकार डॉ. अर्चना थोरात यांनी पुढील माहिती दिली आहे.  

 Chana Cultivation
Chana Production : हरभरा उत्पादनवाढीची सूत्रे ...

बरेच शेतकरी पेरणीपुर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया करत नाहीत. याशिवाय पिकाची फेरपालटही करत नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट येते. ज्याठिकाणी यापुर्वी हरभऱ्याची लागवड केली होती त्याठिकाणी परत हरभऱ्याची लागवड करु नये. 

हेक्टरी रोपांची संख्या ३ लाख ३३ हजार राखली जाईल याची काळजी घ्यावी. देशी जातीची लागवड ३० बाय १० सेंमी अंतरावर तर काबुली हरभऱ्याची लागवड ४५ बाय १० सेंमी अंतरावर करावी. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळवता येईल. 

ट्रॅक्टरद्वारे हरभरा पेरणी केली तर बियाणे कमी, जास्त खोलीवर पेरले जाते. बियाणे उथळ पडल्यास वरच्या थरातील कमी ओलीमुळे अर्धवट अंकुरण होऊन कमी उगवणीचा धोका असतो. त्यामुळे पेरणीची खोली ६ ते ८ सें.मी. राखावी. टोकण पद्धतीने पेरणी करायची असेल तर बियाणे व्यवस्थित झाकले जाईल याची काळजी घ्यावी. 

पेरलेले बियाणे पक्षी खाण्याची शक्यता असते त्यासाठी पेरणीनंतर स्प्रिंकलरने हलके पाणी द्यावे.  

 Chana Cultivation
Chana Rate : हरभरा दराचा पेरणीवर परिणाम होणार

पेरणीपुर्वी रोगांपासून बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. रायझोबियम व स्फुरद उपलब्ध करणारी जीवाणू संवर्धने प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावी.

जमिनीची कमीत कमी मशागत करावी. त्यामुळे जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल.

देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर ३० सें.मी., तर दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे. बियाण्यांची पेरणी जास्त खोलवर करु नये.  काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे.

ओलिताखालील हरभऱ्याची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करावी. पेरणीच्यावेळी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com