Child Rickets : बालपणातील आजार - मुडदूस

भारतात मुडदूस आजाराचे प्रमाण दोन लाख मुलांमागे एक असे आहे. भारतात एवढे कमी प्रमाण असण्याचे कारण आपल्याकडे मिळणारा मुबलक सूर्यप्रकाश हे आहे.
Child Rickets
Child RicketsAgrowon

लहान मुलांमधील एक महत्त्वाचा आजार म्हणजे मुडदूस (ज्याला रिकेट्स असेही म्हणतात). (Rickets) संपूर्ण जगामध्ये या आजाराचे रुग्ण आहेत. भारतात मुडदूस आजाराचे प्रमाण दोन लाख मुलांमागे एक असे आहे. भारतात एवढे कमी प्रमाण असण्याचे कारण आपल्याकडे मिळणारा मुबलक सूर्यप्रकाश हे आहे.

Child Rickets
Indian Media : वृत्तपत्रांचे बदलते जग

मुडदूस म्हणजे काय?

मुडदूस हा बालपणातील आजार आहे, ज्यामध्ये मुलाची हाडे खूप मऊ असतात, ज्यामुळे त्यांची हाडे अधिक सहजपणे वाकतात आणि तुटतात.

Child Rickets
Indian Marriage : लग्नातील बदलते मध्यस्थ

मुडदूस लक्षणे

पायाची हाडे वाकणे, पाठीचा कणा, कंबर आणि पाय दुखणे. ज्या मुलांना चालता येत नाही अशांमध्ये गुडघे रुंद होणे किंवा रांगत असलेल्या मुलांमध्ये मनगट रुंद झाल्याचे दिसून येते, हाडे दुखणे, बरगड्यांच्या टोकांना सूज येणे, ज्याला रॅचिटिक जपमाळ म्हणून ओळखले जाते. कारण बरगडीचे टोक त्वचेखाली जपमाळ मण्यासारखे दिसतात, संपूर्ण बरगड्या दिसून येतात, मुलांच्या नियमित वाढीला विलंब होतो, मणक्याला असामान्य वक्र आकार येतो, दातांमध्ये देखील समस्या निर्माण होतात दातांमध्ये पोकळी निर्माण होते, गंभीर प्रकरणांमध्ये जेथे कॅल्शिअमची पातळी खूप कमी झालेली दिसून येते.

मुडदूस कशामुळे होतो?

मुडदूस होण्याच्या कारणांमध्ये दोन कारणे महत्त्वाची आहेत. अपुरे पोषण आणि आनुवांशिकता ही ती कारणे आहेत.

अपुरे पोषण - पुरेसे व्हिटामिन डी न मिळाल्याने होते. शरीरामध्ये कॅल्शिअम शोषण्यासाठी आवश्यक असणारे घटक तयार होत नाहीत. त्यामुळे कॅल्शिअमचे शोषण होत नाही. अत्यंत कमी कॅल्शिअम असलेला आहार सेवन केल्यामुळेही अपुरे पोषण होते.

आनुवंशिक मुडदूस - मुलाचे शरीर व्हिटॅमिन डी शोषून घेत असते. परंतु यात अनेक आनुवंशिक रोग व्यत्यय आणतात. या प्रकारचे विकार दुर्मीळ आहेत.

मुडदूसचा धोका कोणाला?

नवजात आणि अर्भकांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. ज्यांचा अकाली जन्म झाला असेल, विशेषतः जे स्तन्यपान करत आहेत त्यांना मुडदूस होतो. जर स्तन्यपान करणाऱ्या पालकांना पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत नसेल अशा स्थितीमध्ये आजाराची शक्यता वाढते. ज्या मुलांना घराबाहेर पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. अशावेळी व्हिटॅमिन डी मिळण्यास अडचणी निर्माण होतात. ज्या मुलांची त्वचा गडद आहे (त्वचा गडद असताना आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी सूर्याची किरणे पुरेसे शोषून घेण्यास जास्त वेळ लागतो.).

मुडदूस निदान कसे केले जाते?

मुडदूसचे निदान करण्याचे अनेक मार्ग आहेत. मुलाच्या बालरोग तज्ज्ञांना शारीरिक तपासणी किंवा लक्षणांवर आधारित मुडदूस असल्याचा संशय असल्यास, ते खालीलपैकी एक किंवा अधिक चाचण्या करू शकतात. यावरून आजाराची निश्‍चिती करता येते.

एक्स-रे, रक्ताची तपासणी, लघवीची तपासणी, हाडांची बायोप्सी (फार क्वचितच केली जाते), आनुवंशिक चाचणी (आनुवंशिक रिकेट्ससाठी).

उपचार न केल्यास होणारी गुंतागुंत

शरीराची योग्य वाढ होण्यामध्ये अपयश येते. एक असामान्यपणे वक्र पाठीचा कणा निर्माण होतो, हाडांची विकृती निर्मिती होते, दंत दोष निर्माण होतात, आकडीयेणे यांसारखी लक्षणे निर्माण होतात.

उपचार

मुडदूस आजारामध्ये लवकर निदान झाल्यास आहारातील बदल, जीवनसत्त्व पूरक औषधे आणि अधिक सूर्यप्रकाश हा रोग बरा करण्यासाठी पुरेसे आहे. आजाराची स्थिती किती गंभीर आहे यावर अवलंबून आहे.

आहारात बदल ः यामध्ये सामान्यतः आहार किंवा पूरक आहारातून व्हिटॅमिन डीच्या उच्च डोसचा समावेश होतो. आजाराची तीव्रता आणि इतर घटकांवर प्रमाण अवलंबून असते.

सूर्यप्रकाश ः सूर्यप्रकाशाच्या संपर्कात शरीर नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी बनवू शकते, यासाठी मुलांना कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवावे.

शस्त्रक्रिया ः सहसा, मुलाची हाडे स्वतःच सरळ होतात. विशेषतः गंभीर प्रकरणांमध्ये, मुलांना ब्रेसेस घालावे लागतात. क्वचित प्रसंगी शस्त्रक्रियादेखील एक पर्याय आहे.

मुडदूस होऊ नये म्हणून...

दररोज सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहणे हे व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत प्रदान करते. दररोज कोवळ्या सूर्यप्रकाशात १० ते १५ मिनिटे पुरेशी असतात. मुडदूस टाळण्यासाठी मुलांना नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ द्यावेत - मासे, अंड्यातील पिवळा बलक, तृणधान्ये, भाकरी, दूध, (परंतु दुधापासून बनवलेले पदार्थ देऊ नाहीत, जसे की दही आणि चीज), संत्र्याचा रस यामधून व्हिटॅमिन डी शरीरास उपलब्ध होते.

मागील लेखाबाबत प्रश्‍नोत्तरे

प्रश्‍न ः रेबीज असणाऱ्या प्राण्याचे दूध किंवा मांस खाण्यात आले तर रेबीज होऊ शकतो का?

उत्तर ः नाही. आपण आहारात घेताना सर्व पदार्थ शिजवून / उकळवून घेत असतो, या प्रक्रियेमध्ये रेबीजचे विषाणू मृत होतात. कच्चे मांस किंवा दूध आहारात आल्याने रेबीज होण्याची शक्यता एक टक्का असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com