करडई काढणीसाठी कंबाईन हार्वेस्टर

करडई पिकाची काढणी योग्यवेळी करणे गरजेचे आहे. जातीनुसार करडई पीक १२० ते १४० दिवसात काढणीस तयार होते.
safflower crop
safflower cropAgrowon

करडई पिकाची काढणी (Harvesting of safflower crop) योग्यवेळी करणे गरजेचे आहे. जातीनुसार करडई पीक १२० ते १४० दिवसात काढणीस तयार होते. पाने व बोंडे पिवळी पडल्यानंतर काढणी करावी. करडई पिकाच्या (Safflower Crop) पाना-फुलावरील काटे पीक तयार होते, तेव्हा ते वळतात आणि टणक होतात.काढणी करताना हे काटे हाताला आणि पायाला टोचतात त्यामुळे वेदना होतात. म्हणून काढणी करण्यासाठी मजूर नाखूष असतात.

१) करडईची काढणी एकत्रित काढणी व मळणी यंत्राद्वारे (harvesting and threshing machine) (कंबाइन हार्वेस्टर) केली जाते. या यंत्रामुळे काढणी व मळणीचे काम सोपे होते. अगदी कमी वेळात काढणी होते. काढणी खर्चात देखील बचत होते.
२) करडईच्या झाडाचे बारीक तुकडे होऊन शेतात (Farmer) विखुरले जात असल्यामुळे जमिनीत मिसळून कुजल्यामुळे त्यापासून जमिनीस चांगले सेंद्रिय खत (Organic Fertilizer) मिळते.
३) यंत्राद्वारे काढणी केली असता स्वच्छ धान्य मिळते. बहुतेक वेळा शेतकरी (Farmer) शेतातून थेट बाजारात करडई विक्रीसाठी घेऊन जातात.

safflower crop
‘आत्मा’च्या संचालकांकडून तांबवात करडई पीक प्रात्यक्षिक पाहणी

काढणीची वेळ : (Harvest time:)
१) कोरडवाहू पीक १२० ते १३० दिवसात आणि बागायती पीक (Horticultural crop) १३० ते १४० दिवसात तयार होते. काढणी झाडावरील सर्व पाने, बोंडे पिवळी पडून वाळल्यानंतर तसेच झाडाच्या फांद्या व दाणे टणक झाल्यावर काढणी करावी.
२) पीक जास्त वाळले तर काढणी करताना बोंडे तडकून त्यातील दाणे गळतात, म्हणून काढणी वेळेवर करणे गरजेचे आहे. काढणी सकाळच्या वेळेस करावी. सकाळी तापमान (Temperature) कमी असते तसेच आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने करडईचे काटे नरम पडतात तसेच बोंडे तडकून बी गळण्याचे प्रमाण देखील कमी असते.
३) धारदार विळ्याने झाडाची कापणी (Tree Cut) जमिनीलगत करावी. कापलेल्या झाडांचे छोटे ढीग करावेत. ढीग करताना कापलेला बुडख्याचा भाग मध्यभागी आणि फांद्या, शेंडे बाहेरील बाजूस या पद्धतीने रचावेत. असे ढीग ७ ते ८ दिवस वाळू द्यावेत. त्यानंतर खळ्यात नेऊन किंवा ताडपत्रीवर बडवावेत. बडवण्यासाठी काठीचा वापर करावा किंवा मळणी यंत्राने मळणी करावी. मळणीनंतर उफणणी करून स्वच्छ करावी. नंतर चांगली वाळवावी. पोत्यात भरून साठवण करावी.

करडईचे महत्त्व : (Importance of safflower:)
१) तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलापेक्षा बरेच कमी असल्याने ह्रदय रोग्यांना तसेच रक्तदाब असणाऱ्यांसाठी हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
२) या तेलाच्या(Oil) वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची प्रमाण वाढत नाही. वैद्यक शास्त्रात औषधोपचार म्हणून करडईच्या (Safflower) पाकळ्यांचा उपयोग केला जातो. मानवी शरीरातील रक्ताभिसरण्याच्या कार्यक्षमतेवपर करडईच्या पाकळ्यांचा इष्ट परिणाम होतो. रक्त वाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा तसेच रक्तामध्ये प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढून रक्त वाहिन्यात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते.
३) हदयरोग्यांच्या इलाजात करडई पाकळीयुक्त औषधांच्या (Medicine) वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
४) मणक्याचे विकार, मानदुखी, पाठदुखी इत्यादींवर आयुर्वेदिक उपचारात करडई पाकळ्या इतर औषधासोबत वापरल्यास आराम मिळतो.
५) करडई पाकळ्यांचा दररोज काढा काढून पिल्यास वरील रोगापासून ब-याच प्रमाणात फायदा होतो.

डॉ. शहाजी शिंदे,
( लेखक निवृत्त करडई पैदासकार आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com