Coconut Farming : काळ्या डोक्याच्या अळीच्या नियंत्रणासाठी मित्रकीटक

नारळ हे बहुवार्षिक पीक असून, मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते. नारळ पिकाला भारतीयांच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. नारळाचा प्रत्येक भाग उपयोगी येत असल्यामुळे नारळाला ‘कल्पवृक्ष’ असे संबोधले जाते.
Coconut Farmimg
Coconut Farmimg Agrowon

नारळ (Coconut Farmimg ) हे बहुवार्षिक पीक असून, मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते. नारळ पिकाला भारतीयांच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. नारळाचा प्रत्येक भाग उपयोगी येत असल्यामुळे नारळाला ‘कल्पवृक्ष’ असे संबोधले जाते. जगभरात सुमारे ९५ उष्ण कटिबंधीय देशांमध्ये नारळाची लागवड केली जाते.

Coconut Farmimg
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

कोकणातील रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर,२०२२ मध्ये नारळ पिकावरील किडींचे सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू, मनोर, वाडा व वसई भागामध्ये नारळावर काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

सद्यःस्थितीमध्ये किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आला असला तरी वाढत्या तापमानानुसार येत्या काही महिन्यामध्ये तो तीव्र होऊ शकतो. त्यामुळे या किडीचे वेळीच व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांतील काही भागांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नारळावर काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.

Coconut Farmimg
Sugar Export : साखर कराराबरोबर पाठवणीलाही वेग

जीवनक्रम

मादी पानांच्या खालील बाजूस ५९ ते २५२ अंडी सरासरी १३७ पुंजक्याने घालते. साधारण ५ दिवसांनी अंड्यातून अळ्या बाहेर येतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पानाच्या खालील बाजूस राहून पाने खरवडून खातात. सरासरी ४२ दिवसांत अळीची पूर्ण वाढ होऊन ती कोषात जाते. कोषावस्था १२ दिवसांची असते. पूर्णावस्थेतील पतंग ५ ते ७ दिवस जिवंत राहतो. किडीचा संपूर्ण जीवनक्रम पूर्ण होण्यास दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो.

नुकसानीचा प्रकार

अळी पानांच्या खालील बाजूस पानांचे तुकडे, विष्ठा आणि रेशमी धागे यांच्या साहाय्याने तांबूस तपकिरी रंगाची जाळी विणून त्यात राहते. आणि पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पाने करपल्यासारखी दिसतात. त्यामुळे पानांमध्ये अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास नारळाच्या बागा करपल्यासारख्या दिसतात.

परिणामी, झावळ्यांचा शाकारण्यासाठी किंवा इतर कामांसाठी उपयोग करता येत नाही. किडीचा उपद्रव प्रामुख्याने माडाच्या खालील बाजूच्या जुन्या झावळ्यांवर अधिक प्रमाणात होतो. ही कीड वर्षभर माडावर आढळते. पावसाळ्यात कमी प्रादुर्भाव दिसतो. मात्र अति तापमान विशेषतः मार्च ते मे या काळात किडीच्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते. काही बागांमध्ये खत आणि सिंचन व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले जाते. अशा बागेतही किडीच्या उपद्रवामुळे झावळ्या करपलेल्या, अशक्त, सुकलेल्या आणि पिवळसर दिसतात.

कीड व्यवस्थापन

माडावरील नारळ व शहाळे यांचा वापर प्रामुख्याने खाण्यासाठी केला जातो. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे योग्य ठरत नाही. तसेच १० ते १८ फुटांपर्यंत उंच असलेल्या नारळ झाडांवर फवारणी करणे तितके सोपे नसते. त्यामुळे झाडाच्या खालील बाजूच्या प्रादुर्भावित २ ते ३ झावळ्या कापाव्यात. अशा फांद्या खड्ड्यामध्ये पुरून त्यांची विल्हेवाट लावावी. ड्रोनद्वारे फवारणी करताना अळीचे वास्तव्य असलेल्या पानांच्या खालील बाजूस फवारणी करता येत नाही.

Coconut Farmimg
Onion Rate : कांदा उत्पादकांचा पुन्हा भ्रमनिरास | ॲग्रोवन

त्यामुळे ड्रोनचा पर्याय ही या ठिकाणी उपयुक्त ठरत नाही.

या सर्व बाबी विचारात घेऊन भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातर्फे या किडीचे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी ‘गोनिओझस व ब्रॅकॉन’ हे परोपजीवी मित्रकीटक उत्पादित केले जात आहेत. हे कीटक काळ्या डोक्याच्या अळीला शोधून तिच्या शरिरात स्वतःची अंडी घालतात. आणि अंड्यातून निघालेल्या अळ्या काळ्या डोक्याच्या अळीच्या शरीरावर उपजीविका करतात. हे मित्र कीटक दर महिन्याला बागेत सोडल्यास काळ्या डोक्याच्या अळीचे जैविक पद्धतीने नियंत्रण शक्य आहे.

नियंत्रणासाठी परोपजीवी कीटक

गोनिओझस नेफॅंटिडीस हा मित्र कीटक २.५ ते ३.९ मिमी लांब, काळ्या रंगाचा असतो. हे कीटक उंच माडावर जाऊन काळ्या डोक्याच्या अळीला शोधून तिच्या शरीरावर अंडी घालतात. आणि आपली उपजीविका करतात. यासाठी प्रति माड २० गोनिओझस कीटक हेक्टरी ३५०० सोडावेत.

ब्रॅकॉन

हा मित्र कीटक वर्तुळाकार, १.३ ते २.७ मिमी लांब आणि तपकिरी रंगाचा असतो. कमी उंचीच्या झाडावर जाऊन काळ्या डोक्याच्या अळीच्या शरीरावर अंडी घालून उपजीविका करतात. प्रति माड ३० ब्रॅकॉन मित्र कीटक सोडावेत.

- डॉ. संतोष वानखेडे, ९७६५५४१३२२

(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,

भाट्ये, जि. रत्नागिरी)

किडीची ओळख

किडीची अळी फिक्कट करड्या रंगाची असून, डोके नावाप्रमाणेच काळे असते.

कोष तपकिरी रंगाचे, मध्यम आकाराचे असतात.

मादी पतंगाच्या पुढील पंखावर फिकट ठिपके आणि मिशा लांब असतात. नर पतंगाच्या पुढील पंखांच्या कडा पिसारी असतात.

अंडी लंबवर्तुळाकार असून, तपकिरी पांढऱ्या रंगाची असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com