Animal Care : जनावरांतील बाह्य परजिवींचे नियंत्रण

जनावरांच्या अंगावर आढळणाऱ्या बाह्य परजीवींचे वेळीच नियंत्रण करून विविध आजारास प्रतिबंध घालणे शक्य आहे.
Animal care
Animal careAgrowon

डॉ. विलास आहेर, डॉ. बाबासाहेब घुमरे

जनावरांच्या अंगावर आढळणाऱ्या बाह्य परजीवींचे (Paracide) वेळीच नियंत्रण करून विविध आजारास प्रतिबंध (Animal Disease) घालणे शक्य आहे. आजाराचा प्रसार करणाऱ्या कीटकांच्या प्रजातीमध्ये बाह्यपरजीवी म्हणजे गोचीड (Tick), पिसवा, रक्तशोषण करणाऱ्या माशा आणि त्यांचे इतर प्रकार.

Animal care
Animal Care : प्रतिजैविकाबाबत जागरूक रहा

गोचीड

मादी रक्त शोषण केल्यानंतर जनावराच्या शरीरावरून खाली पडते. त्यानंतर अंधाऱ्या जागा, गव्हाणीच्या खाली, भेगा, कपारीमध्ये अंडी घालतात.

गोठ्याची स्वच्छता करून कचऱ्यासहीत अंडी जमा करून गोठ्याबाहेर शेकोटी करून जाळावीत. फ्लेमगनच्या साह्याने गोठ्याचा पृष्ठभाग जाळून घ्यावा.

गोठा तसेच जनावरांच्या शरीरावर गोचिड नियंत्रणासाठी शिफारशीत वनस्पतिजन्य किंवा रासायनिक गोचिडनाशकाची फवारणी करावी.

Animal care
Animal Care : विषबाधेमुळे केळवदला अकरा शेळ्यांचा मृत्यू

पिसवा

पिसवा अंडी परिसरामध्ये, छतास लागलेल्या जाळी, जळमटांमध्ये घालतात.

गोठ्याचा परिसर स्वच्छ करून ४ टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी. मिठाचे द्रावण जनावराच्या शरीरावर फवारू नये.

पिसवांचा प्रादुर्भाव झाल्यास जनावरास गोठ्यापासून दूर अंतरावर नेऊन तेथे काही कालावधीसाठी बांधावे.

रक्त शोषण करणाऱ्या माशा (कीटकवर्गीय माश्‍या)

सर्वांत जास्त हिमॅटोबिया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमॉक्सिस, क्लूलिकॉइड्स आणि डास या सर्व प्रजातींच्या माश्‍या रक्त शोषण करतात. या माश्‍या लम्पी स्कीन आजाराचे विषाणू प्रसारित करतात.

Animal care
Animal Care : लाळ्या - खुरकूत रोगाची लक्षणे काय आहेत ?

अ) हिमॅटोबिया माशी

ही माशी जनावरास जास्त प्रमाणात चावते. टाकलेल्या ताज्या शेणावर अंडी घालते.

माशीच्या नियंत्रणासाठी शेणाची योग्य विल्हेवाट लावावी. शेणाचा खड्डा पॉलिथिन किंवा ताडपत्रीने आच्छादित करावा.

जनावरांच्या शरीरावर शिफारशीत वनस्पतिजन्य किंवा रासायनिक गोचिडनाशक द्रावणाची फवारणी करावी.

ब) टॅबॅनस माशी

माशी आकाराने मोठी असून प्रखर सूर्यप्रकाशामध्ये जनावरांचा चावा घेते. त्याजागी रक्त वाहते.

जनावरांना प्रखर सूर्यप्रकाशामध्ये (सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत) चरावयास सोडू नये. त्यांना गोठ्यातच ठेवावे.

क) स्टोमॉक्सिस

या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवर अंडी घालतात.

अंडी घालण्याचे ठिकाणे नष्ट करणे हा प्रभावी उपाय ठरतो.

रात्रीच्या वेळी विशेषतः तिन्हीसांजेच्या वेळी जनावरांना शक्य झाल्यास मच्छरदाणीने आच्छादित गोठ्यात ठेवावे.

माश्‍यांसाठी प्रतिबंधात्मक उपाय

गोठा व्यवस्थापन

गोठ्याची स्वच्छता केल्याने पिसवा, गोचीड व एकंदरीतच कीटकांवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

गोठा व खिडक्या शक्य झाल्यास मच्छरदाणीसारख्या जाळीने आच्छादित कराव्यात. विशेषतः रात्री काळजी घेतल्यास डास व इतर कीटक, क्लूलिकॉईड्स यांचा चावा कमी होतो.

गोठ्यावर वायुविजन करणारी यंत्रे बसवावीत. ही यंत्रे भिरभिऱ्या सारखी असून विद्युत पुरवठा विरहित चालतात. यामुळे गोठ्यातील प्रदूषित हवा वरती निघून जाते. सातत्याने शुद्ध हवेचा संचार गोठ्यामध्ये होतो. गोठ्यातील आर्द्रतेचे प्रमाण व ओलावा कमी होतो.

नाली व्यवस्थापन

गोठ्याच्या सभोवतालच्या नाल्या सतत वाहणाऱ्या आणि बंदिस्त, स्वच्छ असाव्यात.

नालीमध्ये गप्पी मासे सोडावेत. नालीची स्वच्छता ठेवावी.

परिसर स्वच्छता

गोठ्या सभोवतालच्या नाल्या, खाचखळगे, डबके इत्यादी नष्ट करावे. त्यावर झाडाच्या फांद्या टाकाव्यात.

गोठ्याच्या सभोवताली नारळाची करवंटी, फेकलेले टायर, फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या पडू देऊ नयेत. कारण यामध्ये पावसाचे पाणी साठते. त्यामध्ये डास वाढतात.

शेणाचे व्यवस्थापन

शेणाची योग्य विल्हेवाट लावावी. शेण खड्यामध्ये टाकावे.

उकीरड्यात शेण टाकल्यानंतर त्यावर पॉलिथिनसारख्या कापडाने किंवा ताडपत्रीने अच्छादित करावे.

कीटकांचे नियंत्रण

कीटक चावण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी गोठा आणि जनावरांच्या अंगावर वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी.

कीटकांची संख्या अमर्यादित झाल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक गोचिडनाशकांची फवारणी करावी. गोठ्यात रासायनिक गोचिडनाशकांची फवारणी करण्यापूर्वी जनावरांना भरपूर पाणी पाजावे.

जनावरांना उघड्या मैदानावर नेऊन त्यांच्या अंगावर शिफारशीत गोचीडनाशकांची फवारणी करावी. शरीरावरील पाणी सुकेपर्यंत थांबावे.

जनावरे चरावयाच्या कुरणावर गोचिडनाशकांची फवारणी करू नये. शरीरावरील फवारणीनंतर जनावराने त्याचे अंग चाटू नये म्हणून ते सुकेपर्यंत त्यांच्या तोंडास मुंगसे बांधावे.

गोचिडनाशकाच्या द्रावणासाठी वापरलेली भांडी, कीटकनाशकांचे डबे इतरत्र फेकू नयेत. कारण ते जनावरांनी चाटल्यास विषबाधा होऊ शकते. वापरलेली भांडी ही जनावरे पाणी पिण्याच्या ठिकाणी धुऊ नयेत.

जनावरांना विषबाधा होणार नाही याची सर्व काळजी घ्यावी.

गावातील सर्व पशुपालकांनी “माझा गोठा-स्वच्छ गोठा” ही मोहीम राबविल्यास विविध आजारांचा प्रसार वेगाने आटोक्यात ठेवू शकतो.

- डॉ. विलास आहेर, ८७८८६२७१३३ - डॉ. बाबासाहेब घुमरे, ९४२१९८४६८१

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com