Cotton Crop Management : शेतकरी पीक नियोजन : कपाशी

निंभारा, (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथील प्रयोगशील शेतकरी गणेश नानोटे यांची ५० एकर शेतकरी आहे. त्यापैकी १२ एकरांत कपाशी आणि उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन, केळी लागवड आहे. तसेच सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक पद्धतीने लागवड त्यांनी केली आहे.
Cotton
CottonAgrowon

शेतकरी ः गणेश श्‍यामराव नानोटे

गाव ः निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

कपाशी क्षेत्र ः १२ एकर

एकूण क्षेत्र ः ५० एकर

निंभारा, (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथील प्रयोगशील शेतकरी गणेश नानोटे यांची ५० एकर शेतकरी आहे. त्यापैकी १२ एकरांत कपाशी (Cotton Farming) आणि उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन (Soybean), केळी लागवड (Banana Cultivation) आहे. तसेच सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक पद्धतीने लागवड त्यांनी केली आहे. श्री. नानोटे मागील ३० वर्षांपासून कपाशी लागवड करीत आहेत. या वर्षी कपाशी लागवडीसाठी (Cotton Cultivation) खासगी कंपनीच्या ५ वाणांची निवड केली आहे. गणेश नानोटे हे कपाशी

Cotton
Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

पिकांमध्ये विविध प्रयोग सातत्याने करतात. वातावरण हवामान बदलातही कपाशी पिकाचे उत्पादन चांगल्याप्रकारे कसे घेता येईल, यासाठी ते प्रयत्न करत असतात. मात्र या वर्षी सततच्या पावसामुळे कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

Cotton
Cotton Market : कापूस बाजार अद्यापही दबावात का?

लागवड शिफारशीनुसार ३ जूनला सुरू करून ११ जूनपर्यंत संपविली होती. कपाशी लागवडीमध्ये निसर्गाच्या असमतोलपणामुळे अपेक्षित फळधारणा, पिकाची वाढ कमी दिसून येत आहे. दरवर्षी कापूस पिकाच्या नियोजनानुसार पीक १६० ते १६५ दिवसांकरिता शेतात ठेवले जाते. त्या अनुषंगाने सुरुवातीच्या ६० ते ६५ दिवसांपर्यंत रासायनिक खतांच्या मात्रा तीन समान हप्त्यात विभागून दिल्या आहेत.

कीड-रोग नियंत्रणासाठी १२० दिवसांपर्यंत फवारण्या आटपून घेतल्या आहेत. या पद्धतीने त्यांचे नियोजन असते. श्री. नानोटे फरदड घेण्याचे टाळतात. त्यामुळे जमिनीचा पोत कायम राहतो. तसेच कीड-रोगांच्या अवस्था खंडित होण्यास मदत होत असल्याचे ते सांगतात. कापूस वेचणीनंतर पीक शेतामध्येच यंत्राच्या साह्याने बारीक करून जागेवरच कुजविले जाते. जेणेकरून जमिनीतील सेंद्रिय कर्ब कायम राहून उत्पादनात सातत्य राखण्यास मदत होते. त्याच क्षेत्रामध्ये रब्बीमध्ये गहू, हरभरा, कांदा या पिकांची लागवड केली जाते.

सततच्या पावसाचा पिकावर परिणाम

या वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाचा असमतोपणा दिसून आला. कपाशी लागवडीनंतर सातत्याने पाऊस राहिल्यामुळे पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा खंड पडला. पुढे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरू आहे. त्यामुळे उत्पादनात १० ते २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे जमिनीलगतची काही बोंडे काळी पडली आहेत. ज्या बोंडाचे वजन आणि गुणवत्ता दर्जेदार असते, त्याच बोंडाचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

मागील कामकाज

सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्याने पिकास ताण पडण्याची शक्यता होती. त्यासाठी १३ः०ः४५ ची फवारणी केली.

पावसामुळे शेतात काही गवतवर्गीय वनस्पती दिसून येत आहेत. पावसामुळे मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण शक्य नाही. त्यामुळे तणनाशकांची फवारणी करून तणनियंत्रण करण्याचे नियोजन आहे.

रानडुकरांनी झाड मोडणे, बोंडाची नासधूस करणे अशा प्रकारे नुकसान करण्यास सुरुवात केली. त्यासाठी शेताच्या बाजूने चौफेर बांबू लावून त्यावर तार बांधून घेतल्या. या तारांना सौरऊर्जेवरील झटका मशिन बसविले त्यामुळे पिकाचे नुकसान रोखण्यास मदत झाली.

कीड-रोगनियंत्रण

कीड नियंत्रणासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करत होतो. या वर्षी प्रथमच गुलाबी बोंड अळीचे पतंग अपवादात्मक दिसून आले. सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अंडी आणि अळी नाशकांचा वापर केला. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पिकावर तितका दिसून आला नाही.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पांढरी माशी, तुडतुडे आणि फुलकिड्यांचा काही प्रमाणात प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला. शेतामध्ये एकरी ४ या प्रमाणे कामगंध व चिकट सापळे लावले होते. नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक कीटकानाशकांची फवारणी केली.

बैलचलित औताच्या साह्याने पिकाला मातीची भर दिली होती. त्यामुळे पावसात खंड पडूनही पिकास ताण बसला नाही. जमिनीमध्ये वाफसा कायम राहिला. तसेच सतत पाऊस असून देखील मर रोगाचा प्रादुर्भाव तितका दिसला नाही.

बोंड फुटण्यास सुरुवात झाल्यापासून उंदरांचा त्रास मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी बिळांजवळ विषारी आमिष ठेवले. त्यामुळे प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत झाली.

ओला कापूस सुकवण्याची कसरत

दसऱ्याच्या मुहूर्तावर परंपरेनुसार शेतात सीतादही (पूजा) केली. परंतु सततचा पाऊस, मजुरांची टंचाई इत्यादी कारणांमुळे कापूस वेचण्यास अडचणी आल्या. थोड्या प्रमाणात कापूस वेचला. तो उन्हात वाळत घातला. जेणेकरून अतिरिक्त ओलावा कमी होऊन कापूस अपेक्षित भाव मिळेपर्यंत साठवता येईल.

- गणेश नानोटे, ९५७९१५४००४

(शब्दांकन ः गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com