Crop Protection : कपाशी रोपावस्थेतील रोगांना अटकाव

पीकवाढीच्या काळात कापूस पिकावर विविध बुरशीजन्य, जिवाणूजन्य विषाणूजन्य व सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव होतो.
Corynespora fungal spots diseased cotton plant
Corynespora fungal spots diseased cotton plantAgrowon

पीकवाढीच्या काळात कापूस पिकावर (Cotton Crop) विविध बुरशीजन्य (Fungal), जिवाणूजन्य (Bacterial) विषाणूजन्य (Viral) व सूत्रकृमी (Nematodes) यांचा प्रादुर्भाव होतो. सध्याच्या हंगामात अति पावसामुळे तसेच उष्ण व दमट हवामानामुळे मूळकुज, मर व पानांवरील ठिपके आदी रोगांच्या संसर्गास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास रोगांचे नियंत्रण योग्य पद्धतीने व प्रभावीपणे होऊ शकते.अ तिवृष्टी व पाणथळ परिस्थितीमुळे कापूस पिकातील तात्कालिक रोग समस्या पुढीलप्रमाणे...

डॉ. शैलेश गावंडे

लक्षणे : जमिनीलगतची पाने पिवळे पडणे, रोपांची वाढ खुंटणे, रोपांचे देठ लालसर होणे, रोप अशक्त होऊन पानांवर रोगकारक करपा जिवाणू आणि बुरशीचे ठिपके आढळणे, पानांवरील करपा, मूळकुज रोगकारक बुरशींचा संसर्ग होणे.

Corynespora fungal spots diseased cotton plant
बीटी कपाशी समस्यांवर आधारित लागवड व्यवस्थापन

त्वरित करावयाच्या उपाययोजना :

शेतात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा.

प्रति एकरी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १५० ते २०० ग्रॅम भुकटी प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळावे, या द्रावणाचा ओळीने पिकावर आणि मुळांशी फवारणी पंपाच्या मदतीने वापर करावा.

किंवा प्रति एकरी १-२ किलो ट्रायकोडर्मा भुकटी प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून हे द्रावण पिकाच्या ओळीने फवारणी पंपाच्या मदतीने वापरावे.

किंवा पाच किलो ट्रायकोडर्मा भुकटी प्रति ५० किलो या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून पिकात ओळीने वापरावे.

प्रति एकरी १-२ किलो सुडोमोनास फ्लोरेसन्स भुकटी प्रति १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण पिकाच्या ओळीने फवारणी पंपाच्या मदतीने किंवा ठिबक सिंचनाद्वारे वापरावे.

रोपावस्थेत आढळणारे महत्त्वाचे रोग

१) मूळकुज रोग (बुरशीजन्य) : रायझोक्टोनिया सोलॅनी, रायझोक्टोनिया बटाटीकोला, मॅक्रोफोमिना फॅसिओलिना, स्क्लेरोशिअम रॉल्फसाई

२) मर रोग (बुरशीजन्य) ः फ्युजारिअम ऑक्सिस्पोरम

३) जिवाणूजन्य पानांवरील ठिपके ः करपा : झान्थोमोनास ऑक्सानोपोडीस पीवी. मालवॅसियारम

४) कोरायनेस्पोरा पानांवरील ठिपके ः कोरायनेस्पोरा कॅसिकोला, कोरायनेस्पोरा टोरुलासा

५) बोंड सड रोग ः भारतातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रामुख्याने शेतात साचलेले पाणी, पावसाळी हवामान व हवेतील उच्च सापेक्ष आर्द्रतेमुळे पोषक परिस्थिती निर्माण होऊन बोंड सड वाढण्यास चालना मिळते.

Corynespora fungal spots diseased cotton plant
Cotton : कापूस उत्पादकांसमोर आता किडींचे संकट

एकात्मिक रोग व्यवस्थापन नियंत्रण

जमिनीची खोल नांगरणी करून रोगग्रस्त पिकांचा काडीकचरा काढून नष्ट करावा.

शिफारस केलेल्या रोगप्रतिकारक, अधिक उत्पादनक्षम आणि संकरित वाणांची निवड व पीक फेरपालट महत्त्वाची आहे.

बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी व जिवाणूजन्य रोग व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रियेसाठी शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर आवश्‍यक आहे. अर्थात, तो अवधी आता टळून गेल्याने येथे त्यांची नावे दिलेली नाहीत. बियाण्यास प्रक्रिया करताना त्यांचा क्रम रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक व जिवाणूनाशक वा जैविक खते असा असावा.

पीकवाढीच्या अवस्थेत बुरशीजन्य बोंड सड आणि बुरशीजन्य ठिपके रोग आढळल्यास पुढीलपैकी बुरशीनाशक वापरावे. (प्रति लिटर पाणी)

कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम

मेटीराम ५५ टक्के अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन (५ टक्के डब्ल्यूजी) २ ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक)

क्रेसॉक्झीम मिथाईल (४४.३ टक्के एससी) १ मिलि

प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मिलि

प्रोपीनेब ७० डब्ल्यूपी २.५ ते ३ ग्रॅम

अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२% अधिक डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के) (संयुक्त)- १ मिलि

फ्लूक्झापायरॉक्साड १६७ ग्रॅ/लि.. अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन ३३३ ग्रॅ/लि.

एससी (संयुक्त) ०.६ ग्रॅम

जिवाणूजन्य करपा रोग व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आंतरिक बोंड सड रोग व्यवस्थापनासाठी फुलोरा, कळी आणि कोवळ्या बोंड अवस्थेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ते ३ ग्रॅम, त्यानंतर आवश्‍यकता पडल्यास दुसरी फवारणी (१५ ते २० दिवसांनंतर) प्रोपीकोनॅझोल (२५% ईसी) १ मिलि किंवा प्रोपीनेब (७० डब्ल्यूपी) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com