Dairy Farming : शेतकरी नियोजन ः गाय, म्हैस पालन

बोरगाव (नाद्री) ता. मुदखेड, जि. नांदेड येथे सुरेश विश्‍वनाथ देगावकर यांची दोन एकर शेती आहे. शेतामध्ये ऊस, सोयाबीन या पिकांची लागवड केली जाते.
Dairy Farming
Dairy FarmingAgrowon

शेतकरी ः सुरेश विश्‍वनाथ देगावकर

गाव ः बोरगाव (नाद्री) ता. मुदखेड, जि. नांदेड.

एकूण शेती ः २ एकर

एकूण जनावरे ः ७ (गायी ४, म्हशी ३)

बोरगाव (नाद्री) ता. मुदखेड, जि. नांदेड येथे सुरेश विश्‍वनाथ देगावकर यांची दोन एकर शेती आहे. शेतामध्ये ऊस, सोयाबीन (Soybean Cultivation) या पिकांची लागवड केली जाते. शेतीला पूरक व्यवसाय करण्याच्या उद्देशाने सुरेश यांनी २००६ पासून दुग्ध व्यवसायास (Dairy Farming) सुरुवात केली. सुरुवातीला १ देशी गाय आणि २ म्हशी घेत व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज त्यांच्याकडे गोठ्यातच पैदास केलेल्या ४ देशी गायी (Indigenous Cow) आणि ३ म्हशी आहेत. जनावरांच्या संगोपनासाठी (Animal Rearing) २० बाय १५ फूट आकाराच्या शेडची उभारणी केली आहे.

प्रतिदिन गायी आणि म्हशींपासून साधारण ५६ लिटर दूध उत्पादन मिळते. फक्त दूध उत्पादनावरच अवलंबून न राहता दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीस देखील केली जाते.दुग्ध व्यवसायातून चांगले अर्थार्जन होत असल्याने मुलांचे शिक्षण आम्ही तीन भावंडांच्या ७ मुलांचे शिक्षण, घरखर्च निघत असल्याचे श्री. देगावकर सांगतात.

Dairy Farming
Indian Dairy Association: आयडीएच्या अध्यक्षपदी आर.एस. सोढी

व्यवस्थापनातील बाबी ः

- गायी आणि म्हशींचे संगोपन एकाच गोठ्यामध्ये केले जाते.

- योग्यरीत्या संगोपनासाठी हेड टू हेड प्रकारची गव्हाण बांधली आहे.

- दररोज सकाळी ६ वाजता गोठ्यातील कामांस सुरुवात होते. सुरुवातीला गोठ्यातील शेण काढून गोठा स्वच्छ केला जातो.

- त्यानंतर हाताने दूध काढून विक्रीसाठी नांदेड शहरात पाठविले जाते.

- गोठ्यातील गायी आणि म्हशींपासून दरवर्षी साधारण १० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. यापैकी ५ ट्रॉली शेणखत स्वतःच्या शेतामध्ये आणि उर्वरित शेणखताची प्रति ट्रॉली ३ हजार रुपये दराने विक्री केली जाते.

- येत्या काळात जनावरांच्या संख्येत वाढ करण्याचा विचार आहे. त्या अनुषंगाने नवीन शेडची उभारणी करणार असल्याचे सुरेशराव सांगतात.

Dairy Farming
Dairy Summit: भारतात सप्टेेंबरमध्ये जागतिक दुग्ध परिषद

चारा, पाणी व्यवस्थापन ः

- जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन चांगले राहण्यासाठी चारा आणि पाण्याचे योग्य नियोजन केले जाते.

- प्रतिदिन जनावरांना ५ किलो वाळलेला चारा आणि २० किलो हिरवा चारा दिला जातो. यासोबतच सरकी पेंड ५ किलो प्रमाणे दिली जाते.

- जनावरांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता होण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारली आहे.

- जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी १ एकर शेतजमीन विकत घेतली. त्यात विविध चारा पिकांची लागवड केली आहे.

- जनावरे बाहेर चरायला पाठवीत नाही. गोठ्यातच त्यांना पुरेशा प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता केली जाते. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

आरोग्य व्यवस्थापन ः

- जनावरांना पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वेळोवेळी लसीकरण केले जाते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

- जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी विविध साथ रोगांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते.

- आतापर्यंत केलेले लसीकरण

दुग्ध उत्पादन ः

- दूध संकलन केंद्राच्या तुलनेत थेट विक्रीतून दुधास चांगला दर मिळतो. त्यामुळे नांदेड शहरातील ग्राहकांना थेट विक्री केली जाते.

- गायींपासून ४० लिटर आणि म्हशींपासून १६ लिटर असे प्रतिदिन ५६ लिटर दूध उत्पादन मिळते.

- उत्पादित दुधाची नांदेड शहरात गायीचे दूध ७० रुपये तर म्हशीचे ६० रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते.

- तसेच दुधापासून पनीर, खवा, तूप आदी दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात.

- सुरेश देगावकर ७९७२२१०२८७, ९७६३६९६६७६

(शब्दांकन ः कृष्णा जोमेगावकर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com