जाणून घ्या हरितगृहाचे प्रकार

हरितगृहाचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी होतो.
Green House
Green HouseAgrowon

हरितगृहाचा (Green House) उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी होतो. उच्च प्रतीच्या फुलांच्या उत्पादनासाठी व उती संवर्धना द्वारे तयार केलेल्या रोपांची वाढ करणे व रोपवाटिका तयार करण्यासाठी हरितगृह उपयुक्त आहे.

Green House
हरितगृह : बारमाही उत्पन्नाचा आकर्षक पर्याय

हरितगृहाचे प्रकार

१) वातावरण नियंत्रित हरितगृह
या प्रकारच्या हरितगृहामध्ये तापमान व आर्द्रता विविध तंत्र वापरून नियंत्रित केली जाते.
फॉगर चा वापर पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे केला जातो. या प्रकारच्या हरितगृहासाठी वायुविजन पंखे, सेल्युलोजचे पडदे आवश्यक आहेत. फॅनपॅड व सूक्ष्म सिंचनासाठी विजेची गरज असते. तसेच पडद्यावर पाणी पडण्यासाठी विद्युत पंप आणि नळ जोडणी असणे आवश्यक आहे.

नैसर्गिक वायूविजन हरितगृह
या प्रकारचे हरितगृह नैसर्गिक वायूविजनावर आधारित असते. या आधारे पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे तापमान, आर्द्रता, कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण राखता येते.

यामध्ये कीटक व जिवाणूंचा प्रवेश टाळण्यासाठी प्लास्टिकची जाळी म्हणजेच इन्सेक्ट नेट वापरण्यात येते. हरितगृहाच्या वायूविजनसाठी ठेवलेली उंचीवरील झडप ही उत्तर किंवा पूर्व दिशेस उघडणारी असावी. म्हणजे हरितगृहाचे तापमान कमी राखण्यास मदत होते. वायुविजन म्हणजे हरितगृहातील गरम हवा बाहेर काढणे व हरितगृहातील तापमान, आर्द्रता, कार्बन वायू व पिकाभोवतालची खेळती हवा नियंत्रित ठेवणे होय. हरितगृहाच्या वायुविजनसाठी एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्र थंड हवा आत येण्यासाठी व आतील हवा बाहेर काढण्यासाठी उघडे ठेवण्याची सोय असावी.

हरितगृहातील तापमान नियंत्रणासाठी अतिसुक्ष्म फवारा संयंत्र, फाॅगींग सिस्टीम असणे आवश्यक आहे. पिकाच्या गरजेनुसार छताला ५० टक्के व बाजूला ३५ टक्के पांढऱ्या रंगाची युव्ही स्टॅबिलाइज्ड शेडनेट असावी.

Green House
हवामान बदलातही अधिक पीक उत्पादनासाठी रिफ्रॅक्टेबल रूफ पॉलीहाऊस

हरितगृहासाठी जागेची निवड

काळी, निचरा न होणारी जमीन असेल तर दोन इंच जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाफे करावेत. हरितगृहाभोवती दीड फूट बाय दीड फूट आकाराचा चर काढावा. जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल. भरपूर सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी हरितगृहास मिळू शकेल अशी जागा निवडावी. शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे. पानथळ जागा हरितगृहासाठी वापरू नये. मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा निवडू नये. पाणीपुरवठ्याच्या सुविधा जवळपास असणे आवश्यक आहे. पाण्याचा सामू ६ ते ७.५ या दरम्यान व क्षारतेचे प्रमाण जास्तीत जास्त ०.१ ते ०.५ मिली मोहोज प्रति सेंमी इतके असणे अपेक्षित आहे. विद्युत पुरवठ्याची सुविधा आवश्यक आहे.

हरितगृहाच्या दिशा ठरविताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात?

वाढणाऱ्या पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा वाहणाऱ्या वाऱ्यापासून हरितगृहास धोका नसावा या दोन्ही बाबींचा विचार करून हरितगृहाची दिशा दक्षिण उत्तर ठेवावी त्यामुळे वरील झडप (व्हेन्ट) पूर्व - उत्तर दिशेस येईल.

स्त्रोत ः (कृषिदर्शनी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com