तुम्हाला अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे माहित आहेत का ?

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये वेळीच उपलब्ध न झाल्यास अंतर्गत शरीरक्रियांवर परिणाम होतो.
Nutrient Deficiency
Nutrient DeficiencyAgrowon

आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता (Nutrient Deficiency) असल्यास पिकांची सामान्य वाढ होत नाही. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये वेळीच उपलब्ध न झाल्यास अंतर्गत शरीरक्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे वाढीवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे (Nutrient Deficiency Symptoms) ओळखून पुढील उपाययोजना करण्‍याचा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने देण्‍यात आला आहे.

Nutrient Deficiency
गव्हातील अन्नद्रव्यांची कमतरता

नत्र

झाडाची खालची पाने पिवळी होतात. मुळाची व झाडाची वाढ थांबते. फुट व फळे कमी येतात.

उपाय ः १०० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून म्हणजे एक टक्के युरियाची फवारणी करावी.

स्फुरद

पाने हिरवी लांबट होऊन वाढ खुंटते. पानाची मागील बाजू जांभळट होते.

उपाय ः एक ते दोन टक्के डाय अमोनियम फॉस्फेट ची फवारणी करावी. (१०० ते २०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून)

Nutrient Deficiency
पिकातील नत्राचे अचूक प्रमाण कळणार विमानावरील सेन्सरद्वारे

पालाश

पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

उपाय ः एक टक्के सल्फेट ऑफ पोटॅश ची फवारणी करावी.( १०० ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी)

लोह

शेंड्याकडील पानांच्या शिरा मधील भाग पिवळा होतो. झाडाची वाढ खुंटते.

उपाय ः २५ किलो फेरस सल्फेट जमिनीतून शेणखता सोबत द्यावे किंवा ०.२ टक्के चिलेटेड लोहाची फवारणी करावी.

Nutrient Deficiency
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन

बोरॉन

झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. फळावर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात.

उपाय ः ५० ग्रॅम बोरिक पावडरची दहा लिटर पाण्यातून पानावर फवारणी करावी.

जस्त

पाने लहान होऊन शिरा मधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात.

उपाय ः हेक्टरी दहा ते वीस किलो झिंक सल्फेट जमिनीतून शेणखता सोबत द्यावे. किंवा ०.२ टक्के चिलेटेड झिंक पिकावर फवारावे.

मंगल

पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो संपूर्ण पान फिकट होऊन नंतर पान गळते.

उपाय ः हेक्टरी दहा ते पंचवीस किलो मॅंगेनीज सल्फेट जमिनीतून शेणखता सोबत द्यावे किंवा ०.२ टक्के चिलेटेड मंगल ची फवारणी करावी. (२० ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी)

मोलाब्द

पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो.

उपाय ः हेक्टरी पाव ते अर्धा किलो सोडियम मॉलिब्डेनम जमिनीतून द्यावे.

Nutrient Deficiency
कापूस पिकासाठी पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन

तांबे

झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते. झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो . खोडाची वाढ कमी होते. पाने लगेच गळतात.

उपाय ः मोरचूद ४० ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

गंधक

झाडांच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पांढरी पडतात.

उपाय

हेक्टरी २० ते ४० किलो गंधक जमिनीतून शेणखतासोबत द्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com