Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट रोपनिर्मिती तंत्र

कमीत कमी पाण्यात आणि खडकाळ, मुरमाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट चांगले येते. रोपाच्या माध्यमातून लागवड केली जाते. निरोगी रोपांच्या निर्मितीचे तंत्र राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने विकसित आणि प्रमाणित केले आहे.
Dragon Fruit Plant
Dragon Fruit PlantAgrowon

कमीत कमी पाण्यात आणि खडकाळ, मुरमाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) चांगले येते. रोपाच्या (Dragon Fruit Plant) माध्यमातून लागवड केली जाते. निरोगी रोपांच्या निर्मितीचे (Dragon Fruit Plant Production) तंत्र राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने विकसित आणि प्रमाणित केले आहे.

रोप निर्मितीसाठी कलमांची निवड ः

१) रोप निर्मितीसाठी एक वर्षापेक्षा जास्त जुनी झाडे निवडावीत. कटिंगची लांबी ३० सेंमी, रोग आणि किडीपासून मुक्त असावीत. एक वर्षाच्या जातिवंत रोपांपासून मे-जून आधी किंवा फळधारणेच्या हंगामानंतर म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ३० सेंमी लांबीचे कटींग घ्यावे.

२) कटिंगच्या तळाशी २ ते ३ सेंमी तिरकस कट घ्यावा. कटिंग केल्यानंतर येणारा स्त्राव सुकविण्यासाठी हे कटिंग दोन दिवस शेडमध्ये ठेवावी लागतात. त्यानंतर मातीजन्य रोग टाळण्यासाठी कटिंगवर बुरशीनाशकाची (कार्बेन्डाझिम ०.२ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) प्रक्रिया करावी.

Dragon Fruit Plant
Dragon Fruit: ड्रॅगन फ्रुटसाठी हरियाणात सव्वा लाखाचे अनुदान

३) पिशव्या भरण्यापूर्वी माती निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. मातीतील तणांचे तुकडे आणि मोठ्या आकाराचे दगड काढून टाकावेत. कटिंग लागवडीसाठी पॉलिथिन पिशवी (१० इंच ×६ इंच) निवडावी. पिशवीमध्ये खत, माती मिश्रण भरावे.(प्रमाण ः१ किलो शेणखत, ४ किलो माती, ५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट )

४) पिशवीत कटींगची लागवड करण्यापूर्वी त्याच्या बुडाचा १० ते १५ सेंमी भाग आयबीए द्रावणामध्ये (०.६ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी ) बुडवावा आणि १० मिनिटे कटिंग सावलीत वाळवावे. या प्रक्रियेमुळे २० ते ३० दिवसांच्या आत मुळांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. पॉलिथिन पिशव्यामधील खत,माती मिश्रणामध्ये कटिंग ३ ते ५ सेंमी खोलवर लावावे.कटिंग लावलेल्या पिशव्या ५० टक्के शेडनेटमध्ये ठेवाव्यात.

५) पिशवीमध्ये कटिंग लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आठवड्यातून दोन वेळेस एक लिटर पाणी द्यावे.१० ते १५ दिवसांच्या अंतराने पिशवीतील तणे काढून टाकावीत.

Dragon Fruit Plant
Dragon Fruit Cultivation : ड्रॅगन फ्रुटसाठी केंद्राचा पुढाकार

६) लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा ह्युमिक ॲसिड (०.०२ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) प्रति रोप द्यावे. तसेच १० दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा १९:१९:१९ (०.०२५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) आळवणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये आवश्यक असतील किंवा कमतरता दिसून येतील तेव्हा द्यावीत.

७) रोपवाटिका स्वच्छ ठेवावी. साधारणपणे ४५ ते ६० दिवसांत रोपे लावण्यासाठी तयार होतात.

संपर्क ः

डॉ. गोरक्ष वाकचौरे, ७३५०९१६९८५

(राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था,माळेगाव (खुर्द), बारामती,जि.पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com