केरळात मॉन्सूनचे वेळेआधीच आगमन शक्य

एकूणच महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहील. त्यामुळे हवामान ढगाळ राहील. बहुतांशी ठिकाणी आज आणि उद्या तसेच मंगळवार ते गुरुवार (ता.२४ ते २६) या कालावधीत पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल. या आठवड्यात आर्द्रतेत वाढ होऊन तापमान अधिक राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत फारशी वाढ होणार नाही.
केरळात मॉन्सूनचे वेळेआधीच आगमन शक्य
Mansoon Agrowon

महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १००४ हेप्टापास्कल, तर मंगळवारपासून गुरुवार (ता. २४ ते २६) पर्यंत १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. शुक्रवारी (ता.२७) पुन्हा हवेचे दाब १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. एकूणच महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहील. त्यामुळे हवामान ढगाळ राहील. बहुतांशी ठिकाणी आज आणि उद्या तसेच मंगळवार ते गुरुवार (ता.२४ ते २६) या कालावधीत पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल. या आठवड्यात आर्द्रतेत वाढ होऊन तापमान अधिक राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत फारशी वाढ होणार नाही.

कमाल तापमान कोकण विभागात ३३ ते ३६ अंश सेल्सिअस, उत्तर महाराष्ट्रात ४० ते ४२ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३९ ते ४३ अंश सेल्सिअस, पश्‍चिम विदर्भात ४३ अंश सेल्सिअस, मध्य आणि पूर्व विदर्भात ४४ अंश सेल्सिअस राहील. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३९ अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा मध्य व पश्‍चिम विदर्भात वायव्येकडून तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याची दिशा मॉन्सून आगमनास अनुकूल बनली आहे. केरळमध्ये मॉन्सून आगमनास पोषक वातावरण तयार झाले असून, वेळेपूर्वीच मॉन्सून येण्याची शक्यता आहे.

कोकण ः
कमाल तापमान पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ६५ टक्के राहील. पालघर व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १७ ते १८ किमी. इतका जास्त राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी ७ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ तर उर्वरित जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ५१ टक्के, तर धुळे, नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत ६६ ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात १७ ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २३ ते २८ कि.मी. आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा ः
कमाल तापमान उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, बीड जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस, तर परभणी व जालना जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस, तर औरंगाबाद जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २३ ते २७ किमी आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ४५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १६ टक्के इतकी कमी राहील. वारे ताशी २४ ते २६ किमी इतक्या अधिक वेगाने वाहतील. वाऱ्याची दिशा बुलडाणा जिल्ह्यात
नैर्ऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ ः
कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २८ ते ३० किमी आणि दिशा वायव्येकडून राहील.

पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर जिल्ह्यात २४ कि.मी., तर भंडारा जिल्ह्यात ताशी १० ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, नगर व पुणे जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यांत ८० ते ८८ टक्के, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ६१ ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ५२ टक्के राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला ः
- खरीप हंगामासाठी बियाणे, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते उपलब्ध करून ठेवावी.
- फळ बागांच्या लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे काढून ते माती आणि शेणखताने भरून घ्यावेत.
- पूर्वमशागत झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंबे करावेत.
- जनावरांचे खाद्य जसे भाताचा पेंडा, काड इत्यादी सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com