Warehousing : राज्यस्तरावर स्वतंत्र गोदाम विभागाची स्थापना

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने राज्य स्तरावर स्वतंत्र गोदाम विभागाची स्थापना करून त्या आधारे सर्व समुदाय आधारित संस्थांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. त्यास या सर्व समुदाय आधारित संस्थांचा उत्तम प्रतिसाद असून, गोदामविषयक सर्व विषयांवर या संस्थांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत आहे.
Warehouse
WarehouseAgrowon

विविध प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सहकारी संस्था (Cooperative Organization), शेतकरी कंपनी व महिला बचत गटांचे फेडरेशन यांच्यामार्फत गोदाम उभारणी (Warehouse Establishment) करण्यात येत आहे. या सर्व संस्थांना गोदामविषयक व्यवसाय (Warehousing Business) पुढील काळात चांगले पैसे मिळवून देईल असे एकंदर परिस्थितीवरून दिसून येते. परंतु एकूणच हा विषय सूक्ष्मपणे बघितला तर खूप खोलवर जाऊन सर्व समुदाय आधारित संस्थानी अभ्यासपूर्वकच या व्यवसायात उतरणे आवश्यक आहे.

Warehouse
Warehousing : गोदाम व्यवसायासाठी शेतकरी कंपन्यांची क्षमता बांधणी

या विषयात कोठेही आपल्याला शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचे आढळणार नाही. परंतु तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय हाताळून अनुभवाच्या आधारे या विषयात उत्तम यश मिळविणे अवघड नाही. फक्त आपल्या मनाची तयारी व चिकाटी असणे आवश्यक आहे. यात पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यातील संस्थांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करणे सहज शक्य आहे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सुद्धा गोदाम व्यवसायाबाबत विविध स्तरावर मार्गदर्शन करीत असून, या पुढील काळात म्हणजेच साधारण पुढील ३ ते ५ वर्षात महामंडळामार्फत गोदाम व्यवसायात यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन आपणास गोदाम व्यवसायात स्थिरावलेले नक्कीच दिसतील.

त्यादृष्टीने महामंडळाने या संस्थांना विविध मार्गाने प्रयत्न करण्यास भाग पाडलेले आहे. याकरिता महामंडळ विविध स्तरावर प्रयत्न करीत असून महामंडळाने राज्य स्तरावर स्वतंत्र गोदाम विभागाची स्थापना करून त्या आधारे सर्व समुदाय आधारित संस्थांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. त्यास या सर्व समुदाय आधारित संस्थांचा उत्तम प्रतिसाद असून गोदाम विषयक सर्व विषयावर या संस्थांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत आहे.

Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापनाचे नियोजन

गोदाम पावती व्यवसायास सुरुवात

गोदाम पावती व्यवसाय सुरू करताना आपण प्रमाणित गोदाम उभारणी, गोदामाचे प्रमाणीकरण आणि गोदाम परवाना या विषयी तांत्रिक माहिती घेणे गरजेचे आहे. गोदाम पावती व्यवसाय सुरू करण्यासाठी खालील घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून, वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाच्या (WDRA) विविध प्रक्रियांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार तंत्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

सहकार विभागामार्फत गोदाम परवाना घेणे

वखार प्राधिकरणामार्फत गोदामाचे प्रमाणीकरण करणे

बँकेसोबत अर्थसाह्यासाठी करार करणे व अर्थमर्यादा निश्चित करणे,

संगणकीकृत प्लॅटफॉर्मची निवड करून गोदाम पावतीविषयक तरतूद करणे आहे.

Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम पावतीचे नियोजन

वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाने आपल्या परिवर्तन तथा भविष्यातील नियोजनानुसार प्राधिकरणाच्या नियमांच्या चौकटीत राहून, नोंदणीकृत गोदामांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक निगोशीबल गोदाम पावती बाबत समाजात स्वीकृती आणि त्याबाबतची मानसिकता निर्माण करण्यासाठी, खूप मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

गोदाम नियमन आणि गोदाम नोंदणी प्रक्रिया सोपी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्राधिकरण प्रयत्न करीत आहे. याकरिता सन २०१७-१८ पासून याबाबत प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याचे दृश्‍य स्वरूपातील परिणाम हळूहळू दिसण्यास सुरुवात होत आहे. गोदाम प्रमाणीकरण नोंदणी सोपी व गतिमान बनविण्याच्या अनुषंगाने नोंदणी नियम २०१० मध्ये दुरुस्ती करून २०१७ नुसार बदल करण्यात आले.

१ नोव्हेंबर २०१७ पासून गोदाम प्रमाणीकरण नोंदणी अधिक गतिमान करण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. दिनांक २६ सप्टेंबर २०१७ पासून इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावती प्रक्रिया सुद्धा प्राधिकरणाने सुरू केली. दोन साठवणूकदार संस्थांची सुद्धा नोंदणी करून इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावती प्रक्रियेबाबत तरतूद करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावती प्रक्रिया अभियान स्वरूपात यशस्वी करण्यासाठी प्राधिकरणाने खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे .

सुरक्षा रकमेवर नोटिफिकेशन देणे

गोदाम तपासणी प्रक्रियेचे संगणकीकरण करणे.

नोंदणीकृत गोदामांकरिता आणि नोंदणीकृत गोदामांमध्ये होणाऱ्या व्यवहारांवर संनियंत्रण करणाऱ्या किंवा लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेची निर्मिती करण्यात आली.

ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावतीवर संनियंत्रण ठेवणे

गोदामामार्फत होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर ऑनलाइन पद्धतीने संनियंत्रण करून इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावती प्रक्रियेतील बँक व कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज या घटकांद्वारे व्यवहारात पारदर्शकता व विश्वास निर्माण करणे.

केंद्र शासनामार्फत तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावती (e-NWR) सोबत जोडणे.

२३ फेब्रुवारी २०१७ रोजी सन २०१० च्या तुलनेत नवीन, सोपे व काही निर्णायक बदल प्राधिकरणाकडील गोदाम नोंदणी प्रक्रियेत करण्यात आले. यामध्ये नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सोपी व प्रक्रियेस लागणारा वेळ कमी करणे, हा महत्त्वाचा उद्देश त्यामागे होता. जुन्या व नवीन गोदामविषयक नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले असून ते खालील चौकटीमध्ये दर्शविण्यात आलेले आहेत.

गोदामविषयक कामकाज (विकास आणि नियमन) गोदाम नोंदणी नियम,२०१० गोदामविषयक कामकाज (विकास आणि नियमन) गोदाम नोंदणी नियम,२०१७

गोदाम नोंदणीपूर्वी प्रमाणीकरण हे प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थेमार्फत करणे आवश्यक होते. गोदाम नोंदणीपूर्वी प्रमाणीकरण हे प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थेमार्फत करणे आवश्यक नाही. गोदामाचे प्रमाणीकरण करण्यासाठी अर्ज वखार प्राधिकरणास सादर केल्यानंतर नोंदणीपूर्व पात्र अर्जदारांच्या गोदामाची प्रत्यक्ष तपासणी केली जाते.

एका अर्जात एकच गोदाम विषयक नोंदणीबाबत अर्ज सादर करणे गरजेचे आहे. एक अर्जात एकच अर्जदार एकापेक्षा जास्त गोदामांचे नोंदणीबाबत अर्ज करू शकतो.

नोंदणीचा कालावधी ३ वर्षांचा होता. नोंदणीचा कालावधी ५ वर्षांचा करण्यात आलेला आहे.

गोदाम क्षमतेपेक्षा नेटवर्थ महत्त्वाचे आहे. नेटवर्थ नुसार गोदाम क्षमतासुद्धा महत्त्वाची आहे.

नोंदणी फी एवढीच सुरक्षा ठेवही महत्त्वाची आहे. अधिक वास्तववादी आणि गतिमान सुरक्षा ठेव, निगोशिएबल वेअरहोउस रिसिप्ट जारी केलेल्या एकूण किमतीवर अवलंबून आहे.

अंमलबजावणीची वास्तववादी पद्धतीची तरतूद आणि तुमचा ठेवीदार जाणून घ्याची (KYD-know your depositor) प्रक्रिया उपलब्ध नाही. नवीन नियमानुसार अंमलबजावणीची वास्तववादी पद्धतीची तरतूद आणि तुमचा ठेवीदार जाणून घ्याची (KYD-know your depositor) प्रक्रियेची व्याख्या सोपी व सुटसुटीत केलेली आहे.

साठवणूकदारामार्फत (Repository) इलेक्ट्रॉनिक- निगोशिएबल वेअरहाउस रिसिप्ट हस्तांतर करता येत नाही. आता साठवणूकदारामार्फत (Repository) इलेक्ट्रॉनिक- निगोशिएबल वेअरहाउस रिसिप्ट हस्तांतर करता येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com