Floriculture : शेतकरी नियोजन - फुलशेती

सद्यःस्थितीत प्रमोद टिळेकर यांच्याकडे ७० गुंठ्यांमध्ये पॉलिहाउस आहे. त्यात पूर्वी जरबेरा, कार्नेशन ही फूल पिके घेतली जात. मात्र फुलांच्या मार्केटमध्ये सोबतच फिलर म्हणून अन्यही काही पाने, फुले व दांडे विकले जात असल्याचे दिसून आले.
Floriculture
Floriculture Agrowon

सद्यःस्थितीत प्रमोद टिळेकर यांच्याकडे ७० गुंठ्यांमध्ये पॉलिहाउस (Polly House) आहे. त्यात पूर्वी जरबेरा, कार्नेशन ही फूल (Carnation Flower ) पिके घेतली जात. मात्र फुलांच्या मार्केटमध्ये (Flower Market) सोबतच फिलर म्हणून अन्यही काही पाने, फुले व दांडे विकले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे फुलांसोबतच जिप्सो फिलिया या फिलर्सचे उत्पादनाचा प्रयोग केला. त्यात यश मिळाल्यामुळे हळूहळू त्यात वाढ केली आहे. या वेगळ्या पिकाचा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत.

Floriculture
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

पुरंदर हा तालुका तुलनेने दुष्काळी असल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळेही बांधले आहे. पॉलिहाऊसवर पडणारे सर्व पावसाचे पाणी टाकीमध्ये साठवले जाते.

प्रमोद टिळेकर यांच्याकडे असलेल्या दोन क्षेत्रामध्ये ७० गुंठे पॉलिहाउस आहेत. त्यात तीस गुंठे जरबेरा, तीस गुंठे जिप्सो फिलियाचे उत्पादन घेतले जाते. त्या विषयी माहिती देताना टिळेकर सांगतात, ‘‘२०११ मध्ये आम्ही १० गुंठ्यामध्ये पॉलिहाउस उभारून कार्नेशनचे उत्पादन घेत होतो. मात्र पुढे क्षेत्र वाढवत आता जरबेरा आणि जिप्सी फिलिया यांचेही उत्पादन घेत आहोत. जिप्सो फिलिया ही प्रामुख्याने बुकेमध्ये फिलर म्हणून वापरले जातात. ब्यूटी पार्लर, लग्न समारंभात सजावटीसाठी वापर होत असल्यामुळे मागणी वाढत आहे.

Floriculture
कुटुंबाच्या एकत्रित श्रमांतून बहरली फुलशेती

-जून २०२० मध्ये जिप्सो फुलांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. लागवडीसाठी बंगळूरहून प्रति रोप ४० रुपये याप्रमाणे रोपे मागवली. १० गुंठ्यांत ४ हजार रोपाची लावली. मागील वर्षी २० गुंठे आणि चालू वर्षी दहा गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउसमध्ये त्याची लागवड वाढवली आहे. लागवडीनंतर १०० दिवसांनी ते फुलोऱ्यावर येते. त्याला पांढरी, छोटी व आकर्षक फुले येतात. एकाच वेळी काढणी सुरू होते. त्यामुळे कुटुंबातील लहानथोरांची मदत घेऊन काढणी, प्रतवारी आणि पॅकिंग ही कामे केली जातात. सुमारे एक महिने काढणीचा हंगाम चालतो.

अर्थशास्त्र पाहावेच लागते...

जिप्सी फिलियाच्या दहा दांड्याची एक गड्डी बांधली जाते. सध्या एका गड्डीला २०० ते २५० रुपयांपर्यंत दर मिळतो. गेल्या वर्षीपर्यंत पुण्यातील बाजारपेठेतच विक्री करत होतो. मात्र या वर्षी सर्व फुले हैदराबाद, बडोदा, अहमदाबाद आणि मुंबई या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवत आहे. चार महिन्याच्या एका हंगामात दोन लाख रुपयांचे उत्पादन मिळते. तर खते, कीडनाशके, मजूर, वाहतूक, पॅकिंग साहित्य असा ७० हजार रुपयांपर्यत खर्च वजा जाता एक ३० हजार रुपयांपर्यंत निव्वळ नफा हाती राहत असल्याचे प्रमोद टिळेकर सांगतात.

गेल्या काही दिवसांमध्ये विद्राव्य रासायनिक खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च आटोक्यात ठेवणे जिकिरीचे होऊन बसले आहे. रासायनिक खतांचे प्रमाण कमी करून त्याला पूरक म्हणून जैविक, सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. पिकाला दोन दिवसाआड ठिबकद्वारे खते देतो.

-----------------

गेल्या महिन्यात कोणती कामे केली :

- जरबेरा झाडांची कॅनोपी वाढलेली असल्यामुळे काही पाने कमी केली आहेत.

- जरबेराच्या पॉलिहाऊसमध्ये बेसल डोस म्हणून गांडूळखत, ह्युमिक ॲसिड दाणेदार, आणि सेंद्रिय खते दिली आहेत.

- बागेला पाण्याचा थोडा ताणही दिला होता.

- पंधरा वीस दिवसांनी गणेशोत्सवाच्या सणामध्ये फुलांची मागणी व दर वाढतो. हे लक्षात घेता आता खतांचे व्यवस्थापन केले आहे.

- जिप्सोची छाटणी करून घेतली आहे. पाण्याचा एक ताण देऊन बेसल डोस दिला आहे.

पुढील महिन्यात केली जाणारी कामे :

- श्रावण व पुढील काळात सणांचा कालावधी सुरू होतो. फुलांना चांगले दर मिळतात. त्यामुळे फुलांचा दर्जा, आकार चांगला राहील, याची काळजी घेतो.

-तसेच त्यावर रोग किडीचा प्रादुर्भाव होणारच नाही, यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेत आहे.

-----------------

प्रमोद टिळेकर, ९९२२९२७०६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com