शेतकरी नियोजन पीक ः केळी

निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा अतुल मधुकर पाटील प्रयत्न करतात.
Farmer Planning Crop: Banana
Farmer Planning Crop: BananaAgrowon

शेतकरी ः अतुल मधुकर पाटील
गाव ः केऱ्हाळे बुद्रुक, ता. रावेर, जि. जळगाव
एकूण क्षेत्र ः ५० एकर
केळीखालील क्षेत्र ः २१ एकर (३४ हजार केळी झाडे)

Farmer Planning Crop: Banana
Banana Orchard Management : अशी घ्या केळी बागेची काळजी

अतुल मधुकर पाटील यांची केऱ्हाळे बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ (ता. रावेर, जि. जळगाव) येथे भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात ५० एकर जमीन आहे. त्यापैकी साधारण २१ एकरांवर नवती केळीची जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन केले. त्यानुसार जून महिन्यात साडेपाच एकरावर साडेआठ हजार झाडे, जुलैमध्ये ६ एकरांवर ९ हजार झाडे, १९ ऑगस्ट रोजी ६ एकरावर साडेनऊ हजार आणि ५ सप्टेंबर रोजी ४ एकरांवर ७ हजार झाडांची लागवड केली आहे. संपूर्ण लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपे निवडली आहेत. लागवड साधारण ६ बाय ५ फूट आणि साडेपाच बाय ५ फूट अंतरावर गादी वाफ्यावर केली आहे. संपूर्ण लागवडीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा अतुल प्रयत्न करतात. केळी बागेच्या लागवडीसाठी जळगाव येथील अखिल भारतीय फळे (केळी) संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात.

Farmer Planning Crop: Banana
Banana Market : केळी दरांवर दबाव

व्यवस्थापनातील बाबी ः
- सध्या जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लागवड केलेली केळी रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. या लागवडीत बागेत वाफसा आल्यानंतर बैलाच्या साह्याने आंतरमशागत केली.
- बागेतील आणि बांधावरील वाढलेल्या तणामुळे झाडांवर कुकुंबर मोझॅक विषाणू आणि इतर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी मजुरांद्वारे बागेतील आणि बांधावरील तण काढून टाकले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिफारशीप्रमाणे फवारणी केली.
- मागील काही दिवसांत पावसात उघडीप होती. त्यामुळे वाढीच्या अवस्थेतील बागेस प्रतिदिन २ तास ठिबकद्वारे सिंचन केले.
- मागील आठवड्यात प्रति एक हजार झाडांना २४ः२४ः० हे खत ५० किलो आणि पोटॅश हे खत ३२ किलो प्रमाणे दिले.
- परिसरातील केळी बागांमध्ये कुकुंबर मोझॅक रोगाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे बागेचे निरीक्षण केल्यानंतर सुमारे ५० रोगग्रस्त झाडे आढळली. रोगग्रस्त झाडे काढून बागेबाहेर नेऊन नष्ट केली.
- काही झाडांवर कमी प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसत होता. अशा झाडांवर पॉलीथिन पिशव्या बांधून घेतल्या. जेणेकरून निरोगी झाडांवर रोगाचा प्रसार होऊ नाही.

Farmer Planning Crop: Banana
हवामान बदलामुळे केळी नाहीशी होणार का ?

नवीन लागवड ः
- लागवडीसाठी दीड फूट उंचीचे गादीवाफे तयार केले. गादीवाफ्यावर दोन रोपांमध्ये राखावयाच्या अंतरासाठी आखणी करून घेतली.
- प्रति एक हजार झाडांसाठी ४ पोती सिंगर सुपर फॉस्फेट गादीवाफ्यात टाकून घेतले. त्यानंतर मिनी ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने गादीवाफ्यावरील दाणेदार सुपर फॉस्फेटचे मिश्रण करून घेतले. पुन्हा गादीवाफे व्यवस्थित करून घेतले.
- गादीवाफ्यांवर ठिबकच्या नळ्या अंथरूण घेतल्या. दोन ड्रीपमध्ये सव्वा फूट अंतर राखले आहे. प्रतितास २ लिटर पाणी ड्रीपरद्वारे दिले.
- लागवडीपूर्वी रोपांवर बुरशीनाशके व कीटकनाशकांची फवारणी केल्या.
- ठिबकद्वारे गादीवाफे चांगले भिजवून घेतले. त्यानंतर साधारण मजुरांच्या मदतीने ५ सप्टेंबर रोजी रोपांची लागवड केली. लागवड साडेपाच बाय ५ फूट अंतरावर केली आहे.
- लागवडीनंतर त्वरित ठिबकद्वारे पाणी दिले. त्यानंतर प्रतिदिन ३ तास याप्रमाणे सिंचन केले.

पुढील १५ दिवसांतील नियोजन ः
- कुकुंबर मोझॅक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेणार आहे. रोगग्रस्त झाडे काढून त्याजागी नवीन रोपांची लागवड करणार आहे.
- पोंग्याची वाढ चांगली होण्यासाठी वेळापत्रकानुसार रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा ड्रीपद्वारे दिले जाईल.
- संपूर्ण लागवडीमध्ये उपलब्धतेनुसार चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत दिले जाईल.
- वाफसा स्थिती पाहून आंतरमशागत केली जाईल. पॉवर टिलरच्या साह्याने गादीवाफे माती लावून व्यवस्थित केले जातील.
- मजुरांच्या मदतीने आवश्यकतेनुसार तणनियंत्रण करणार आहे.
- पावसाचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार प्रतिदिन २ तास सिंचन केले जाईल.

- अतुल पाटील, ९८२२४५१६२१
(सायंकाळी सहा ते नऊ वेळेत संपर्क साधावा.)

(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)

Farmer Planning Crop: Banana
Banana : खानदेशात केळी दर व्यापाऱ्यांनी पाडले

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com