शेतकरी नियोजन पीक : झेंडू

मी २०१६ पासून झेंडू लागवड करीत आहे. लागवडीसाठी मी स्वतः रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करणे पसंत करतो. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेण्यावर माझा विशेष भर असतो.
Marigold Crop
Marigold CropAgrowon

शेतकरी : राहुल पोपट पवार
गाव : खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे
एकूण क्षेत्र : १६ एकर (त्यापैकी १० एकर करार शेती)
झेंडू लागवड : २ एकर


माझी खुटबाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे स्वतःची ६ एकर आणि करार पद्धतीने १० एकर शेती (Farmer) आहे. माझ्या ६ एकरांमधील क्षेत्रात ४ एकरांवर ऊस आणि २ एकरांवर भाजीपाला पिकांची रोपवाटिका आहे. करार पद्धतीने घेतलेल्या १० एकरांमध्ये ऊस ५ एकर, झेंडू २ एकर, खरबूज २ एकर आणि फ्लॉवरची १ एकरावर लागवड आहे.
मी २०१६ पासून झेंडू लागवड करीत आहे. लागवडीसाठी मी स्वतः रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करणे पसंत करतो. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन (Production) घेण्यावर माझा विशेष भर असतो.

रोपांची निर्मिती (Plant formation)
- रोपनिर्मितीसाठी कलकत्ता या जातीच्या झेंडू बियाण्याची (Marigold seeds) निवड केली. रोपे( Plant) तयार करण्यासाठी प्लॅस्टिक ट्रे व कोकोपिटचा वापर केला.
- रोपे तयार करण्यासाठी सुमारे २० हजार बिया लागल्या. साधारण २५ दिवस योग्य व्यवस्थापन केल्यानंतर १६ हजार लागवडीयोग्य रोपे मिळाली.
- रोपे तयार केल्यानंतर १९:१९:१९, १३:४०:१३, कॅल्शिअम नायट्रेड, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि मॅग्नेशिअम सल्फेट या विद्राव्य खतांचा वापर केला.

Marigold Crop
झेंडू, जरबेरा, निशिगंधासाठी तयार केली बाजारपेठ

लागवड नियोजन (Planting planning)
- साधारण १ मार्चपासून रोपांच्या पुनर्लागवडीचे नियोजन केले.
- पुनर्लागवडीपूर्वी पूर्वमशागत करून जमीन तयार करून घेतली. त्यानंतर एकरी ४ ट्रॉली शेणखत (Manure) आणि १ ट्रॉली कोंबडी खत जमिनीमध्ये मिसळले.
- लागवड पूर्णपणे पट्टा पद्धतीने केली आहे. दोन पट्ट्यांमध्ये ६ फूट अंतर ठेवून ठिबकच्या लॅटरल आणि त्यावर मल्चिंग पेपर अंथरून घेतला. पट्ट्याच्या दोन्ही बाजूंना दीड फूट अंतरावर रोपांची लागवड केली.
- लागवड साधारण १ एप्रिल ते ५ एप्रिल या काळात केली. लागवडीसाठी सुमारे १६ हजार झेंडू रोपे लागली.
- लागवडीनंतर ५ व्या दिवशी ट्रायकोडर्मा आणि ह्यूमिक ॲसिडचे ड्रेचिंग केले.

पुढील १५ दिवसांचे नियोजन :
- वाढीच्या काळात झेंडू पिकावर (Marigold Crop) विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रतिबंधात्मक उपापयोजना म्हणून लागवडीनंतर ६ ते ७ दिवसांनी आणि १३ ते १४ दिवसांनी फवारणी घेतली जाईल.
- लागवडीनंतर १० दिवसांनी १९ः१९ः१९ आणि अमिनो ॲसिडचे ड्रेचिंग केले जाईल.
- लागवडीनंतर २० ते २५ दिवसांच्या आत कळी खुडणेचे नियोजन आहे. कळी खुडण्यामुळे जास्त फुटवे येऊन उत्पादन (Production) चांगले मिळते.
- दर्जेदार उत्पादनासाठी माझा एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर विशेष भर असतो.
- सध्या दिवसाआड ३ तास ठिबक (Drip) संच सुरू केला जातो. तापमानात वाढ होत असून, त्यानुसार ठिबकचा कालावधी कमी जास्त केला जाईल.
- कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण केले जाईल.

उत्पादन, विक्री : (Production, sales:)
- लागवडीनंतर साधारण ४५ दिवसांनी फुलांची तोडणी सुरू होते.
- दरवर्षी सरासरी १० तोड्यांमधून एकरी ८ ते १० टन झेंडू फुलांचे उत्पादन मिळते. त्यास सरासरी ३० ते ४० रुपये दर मिळतो.
- दरवर्षी व्यापारी शेतामध्ये (Farm) येऊन फुलांच्या गुणवत्ता पाहून जागेवरच फुलांची खरेदी करतात. मागील वर्षी कोरोनामुळे व्यापारी शेतामध्ये आले नाहीत. त्यामुळे विक्रीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या. त्यानंतर बाजारपेठेचा (Market) अंदाज घेऊन पुणे आणि मुंबई येथील दादर फुलमार्केटमध्ये झेंडू विक्रीसाठी पाठविला.

- राहुल पवार, ९९७५८०५२५२
(शब्दांकन : संदीप नवले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com