Orange : शेतकरी नियोजन पीक ः संत्रा

काजळी (जि. अमरावती) येथे मयूर देशमुख यांची वडिलोपार्जित ४५ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी सुमारे ३० एकरांवर संत्रा लागवड आहे.
Orange Farming
Orange FarmingAgrowon


शेतकरी ः मयूर प्रवीणराव देशमुख
गाव ः काजळी, ता. चांदूरबाजार, अमरावती
एकूण क्षेत्र ः ४५ एकर
संत्रा लागवड ः ३० एकर (४ हजार झाडे)

काजळी (जि. अमरावती) येथे मयूर देशमुख (Mayur Deshmukh) यांची वडिलोपार्जित ४५ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी सुमारे ३० एकरांवर संत्रा लागवड (Orange Cultivation) आहे. संत्रा बागेत सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही व्यवस्थापन पद्धतींचा मध्य साधत बागेचे व्यवस्थापन केले जाते. मात्र येत्या काळात संत्रा बागेत सेंद्रिय घटकांचा (Organic Farming) वापर अधिक करण्यावर भर देणार असल्याचे ते सांगतात.

Orange Farming
शेतकरी पीक नियोजन : संत्रा

संत्रा लागवड ः
बागेत तीस एकरांवर संत्र्याची ४ हजार झाडे आहेत. त्यापैकी १२०० झाडे झाडांची त्यांच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी लागवड केली आहे. तर मयूरराव यांनी १२ वर्षांपूर्वी १६०० झाडे आणि मागील २ वर्षांपूर्वी ६०० झाडांची लागवड केली आहे. संपूर्ण लागवड १६ बाय १६ फूट अंतरावर आहे. संपूर्ण लागवडीत अंबिया बहार धरण्यावर ते विशेष भर देतात. बागेतील झाडांना शेणखताचा मात्रा दरवर्षी दिली जाते. त्यामुळे फळांचा दर्जा राखण्यास मदत होत असल्याचे मयूरराव सांगतात.

Orange Farming
Cotton Cultivation : शेतकरी नियोजन पीक ः कपाशी

आंबिया बहराचे व्यवस्थापन ः
- तीस एकरांतील ४ हजार झाडांवर पूर्णपणे आंबिया बहर धरला जातो. त्यादृष्टीने सर्व बाबींचे योग्य नियोजन केले जाते.
- बाग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ताणावर सोडली जाते. हा ताण साधारण एक ते दीड महिना धरला जातो.
- ताण कालावधीत झाडावरील वाळलेल्या फांद्याची छाटणी केली जाते. छाटणीमुळे बऱ्याच झाडांना इजा होण्याची शक्यता असते. त्यासाठी छाटणीनंतर झाडांवर बोर्डो मिश्रणाची फवारणी केली जाते.
- त्यानंतर डीएपी ७५० ग्रॅम, पोटॅश अर्धा किलो, युरिया २५० ग्रॅम, उपलब्धतेनुसार निंबोळी ढेप २ किलो प्रति झाड प्रमाणे दिले जाते. संपूर्ण खत मात्रा ही झाडाच्या परिघात रिंग पद्धतीने दिली जाते. आगामी काळात सेंद्रिय खतांच्या वापरावर अधिक भर देणार आहे. जेणेकरून बागेतील जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
- डिसेंबरच्या शेवटी किंवा ताण दिल्यापासून साधारण ३० ते ४५ दिवसांनी पाटपाणी पद्धतीने पाणी देऊन बागेचा ताण तोडला जातो.
- नवीन आलेल्या फुटीची वाढ चांगली होण्यासाठी झिंकची फवारणी केली.
- ताण तोडल्यानंतर २१ दिवसांनी तणनियंत्रणासाठी शिफारशीत तणनाशकांचा वापर केला जातो.
- दर १५ ते २० दिवसांनी पाटपाणी पद्धतीने पाणी दिले जाते.
- ऑगस्ट महिन्यात झिंक, फेरस, कॅल्शिअम, मॅंगेनीज, जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पहिला डोस दिला.

Orange Farming
Paddy Farming : शेतकरी नियोजन पीक : भात

सिंचन व्यवस्थापन ः
संत्रा पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील मानले जाते. त्यानुसार सिंचनाच्या योग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो.
बागेत एका रांगेत १४ झाडे असून, त्यातील पहिल्या झाडापासून बाराव्या झाडापर्यंतच पाटपाणी दिले जाते. कारण त्यापुढील शेवटच्या दोन झाडांना आपोआपच ओलावा मिळतो. जेणेकरून अतिरिक्त पाणी मुळांच्या क्षेत्रात साचून राहणार नाही आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळला जाईल. नवीन लागवड केलेल्या २ एकरांतील ६०० झाडांमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. लागवड क्षेत्र अधिक असल्याने ठिबक संचाची देखभाल आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाटपाणी पद्धतीने सिंचनावर भर दिला असल्याचे मयूरराव सांगतात.

कीड-रोग व्यवस्थापन ः
- जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची संततधार कायम असते. या काळात झाडांवर लागलेल्या फळांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळगळ होण्याची धोका असतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर केला जातो.
- झाडांवर फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंचन
व्यवस्थापन विशेष भर दिला जातो. प्रादुर्भाव आढळून आल्यास शिफारशीत बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात.
- फळे फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यानंतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी केली.
- फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत सोयाबीनचे कुटार पसरवून त्यावर सल्फरची पावडर टाकून त्याचा धूर केला. या धुरामुळे फळमाशीवर प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत झाली.
--

आगामी नियोजन ः
- सध्या बाग फळ तोडणीच्या अवस्थेत आहेत. पुढील ८ ते १० दिवसांत मजुरांच्या मदतीने संत्रा फळ तोडणीची कामे सुरू होतील.
- तणनियंत्रणासाठी शिफारशीत तणनाशकांची फवारणी करणार आहे.
- जमिनीचा वाफसा पाहून एक सिंचन केले जाईल.
- झिंक, फेरस, कॅल्शिअम, मॅंगेनीज, जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा दुसरा डोस दिला जाईल.
- दरवर्षी एकरी साधारण १५-१६ टन संत्रा उत्पादन मिळते. त्यास प्रति टन साधारण २० हजार रुपये दर मिळतो. बंगलोर, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील व्यापारी बागेत येऊन जागेवर मालाची खरेदी करतात.
------------------
- मयूर देशमुख, ९७६५०२०७०५
(शब्दांकन ः विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com