Farmers Planning: शेतकरी नियोजन पीकः शेवंती

दरवर्षी दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्री या काळातील फुलांची मागणी लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदा जानेवारी आणि मे महिन्यात शेवंतीची लागवड केली जाते.
Flower Farming
Flower FarmingAgrowon

दौंड तालुक्यातील यवत येथे संजय लाटकर यांची ८ एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस (Sugarcane), गहू (Wheat), हरभरा, बाजरी ही प्रमुख पिके तर शेवंती, गुलछडी या फुलपिकांची लागवड केली जाते. संजय मागील १० वर्षांपासून फुलशेती करतात. दरवर्षी दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्री या काळातील फुलांची मागणी लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदा जानेवारी आणि मे महिन्यात शेवंतीची लागवड केली जाते. लागवडीसाठी भाग्यश्री या पांढऱ्या फुलांच्या वाणाची निवड केली आहे. सिंचनासाठी त्यांच्याकडे विहीर आणि बोअर आहे. संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

लागवड नियोजन ः

- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांगरणी, काकरणी, रोटाव्हेटर मारून शेतीची मशागत केली.

- शेत तयार झाल्यानंतर शेणखत ३ ट्रॉली आणि डीएपी, पोटॅश, सुपर फॉस्फेट या रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या.

- दरवर्षी रोपांची लागवड ही गादीवाफ्यावर करण्याचे नियोजन असते. त्यानुसार ४ फूट रुंदीचे गादीवाफे तयार करून घेतले. गादीवाफ्यावर ठिबक संचाच्या नळ्या अंथरून घेतल्या.

- एक एकर लागवडीसाठी खासगी रोपवाटिकेत ८ हजार रोपांची आगामी मागणी केली होती. त्यानुसार प्रति रोप ३ रुपये १० पैसे दराने रोपांची खरेदी केली.

- साधारण १० मे च्या दरम्यान मजुरांच्या मदतीने दोन रोपांत सव्वा फुटांचे अंतर राखत झिगझॅग पद्धतीने लागवड केली.

- लागवडीनंतर लगेच ठिबक संचाद्वारे पाणी दिले.

- ठिबकद्वारे ८ ते १० दिवसांनी ०:५२:३४, १३:४०:४० या विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या.

- मजुरांच्या मदतीने आवश्यकतेनुसार खुरपणी करून शेत तणविरहित केले.

- अधिक उत्पादनासाठी उपलब्धतेनुसार शेणखत, निंबोळी, पोल्ट्री खत, जैविक खतांचा वापर केला जातो.

- बदलत्या हवामानामुळे रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दर ८ दिवसांनी बुरशीनाशकांचा वापर केला. तसेच आवश्यकतेनुसार दर आठ दिवसांनी फुलकिडे, मावा किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली.

आगामी नियोजन ः

- सध्या रोपांची लागवड होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

- सध्या पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरु झाले नसून साधारण २५ टक्के फुलांचे उत्पादन मिळत आहे. पुढील साधारण १५ ते २० दिवसांत पूर्ण क्षमतेने उत्पादन मिळेल.

- दर ८ दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातील.

- कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या ८ दिवसांच्या अंतराने घेतल्या जातील.

- आवश्यकतेनुसार तणनियंत्रणासाठी मजुरांच्या मदतीने खुरपणी केली जाईल.

उत्पादन, विक्री ः

- आतापर्यंत फुलांचे २ तोडे झाले असून, त्यातून १२० किलो फुलांचे उत्पादन मिळाले.

- साधारण अडीच ते ३ महिन्यांनी फुलांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होते. या कालावधीत सुमारे २५ ते ३० तोडे होतात.

- एका तोड्यात साधारण ५०० ते ६०० किलो फुलांचे उत्पादन मिळते.

- फुलांची विक्री पुणे येथे गुलटेकडी मार्केट तसेच मुंबई, हैदराबाद येथे विक्रीसाठी पाठवली जातात.

- साधारण ५० ते ६० किलोचे पॅकिंग करून फुलांची विक्री केली जाते.

- गणपती, दसरा, दिवाळी या काळात प्रतिकिलो फुलांस साधारणपणे १५० ते २०० रुपये दर मिळतो. इतर वेळी ७० ते ८० रुपये प्रति किलो या दराने विक्री होते.

- संजय लाटकर, ९४२१०५२१२३

(शब्दांकन ः संदीप नवले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com