शेतकरी नियोजन : पीक ः टोमॅटो

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. खांडगाव आणि परिसरातील गावे फ्लॉवर, टोमॅटो, कारली इत्यादी भाजीपाला पिकांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
शेतकरी नियोजन
शेतकरी नियोजनAgrowon

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भाजीपाला उत्पादन (Vegetable Production) मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. खांडगाव (Khandgaon) आणि परिसरातील गावे फ्लॉवर, टोमॅटो, कारली इत्यादी भाजीपाला पिकांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. खांडगाव येथील कपिल सुधाकर गुंजाळ हे तरुण शेतकरी. त्यांच्या कुटुंबाची ११ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. दरवर्षी त्यात टोमॅटो, फ्लॉवर, कारली आणि कोबी या पिकांची लागवड केली जाते. मागील १० ते १२ वर्षांपासून ते भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असून, टोमॅटो उत्पादनात त्यांचा विशेष हातखंडा आहे. सध्या त्यांच्याकडे ४ एकरांवर टोमॅटो लागवड आहे. सध्या तोडणीची कामे सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे.

शेतकरी नियोजन
Rain : पावसाचा बसतोय भाजीपाला पिकाला फटका

शेतकरी ः कपिल सुधाकर गुंजाळ

गाव ः खांडगाव, ता. संगमनेर, जि. नगर

एकूण शेती ः ११ एकर

टोमॅटो लागवड ः ४ एकरकीटकरोधक नेट’चा प्रयोग ः मागील २ वर्षांत अकोले, संगमनेर या भागांत टोमॅटो पिकावर कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कृषी विभागाद्वारे गेल्या वर्षी उन्हाळ्यात कपिल यांच्या १० गुंठ्यांवरील टोमॅटो लागवडीत कुकुंबर मोझॅक विषाणू बरोबरच इतर कीड- रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘इन्सेक्ट नेट प्रूफ’ (कीटकरोधक नेट) उभारणीचा प्रयोग केला. या प्रयोगाचे चांगले निष्कर्ष मिळाले आहेत. पिकावर कोणत्याही कीड-रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला नाही.

शेतकरी नियोजन
अतिवृष्टीमुळे भाजीपाला लागवडी रोगांच्या विळख्यात

टोमॅटो लागवड नियोजन ः

- यंदा ४ एकर क्षेत्रामध्ये बेडवर टोमॅटो लागवडीचे नियोजन केले.

- त्यानुसार नांगरणी, रोटाव्हेटर मारून शेत तयार करून घेतले. त्यानंतर शेणखत ५ ट्रॉली आणि १० ते १२ पोती कोंबडी खत प्रति एकर प्रमाणे शेतात पसरून घेतले.

- शेत तयार केल्यानंतर ५ फूट अंतराचे बेड तयार करून पॉलिमल्चिंग केले. त्यानंतर ठिबकच्या नळ्या टाकल्या.

- दोन रोपांत सव्वा फूट अंतर राखत टोमॅटो रोपांची लागवड केली. लागवडीसाठी खासगी रोपवाटिकेतून सुमारे २८ हजार रोपे आणली. एक रोप साधारण दीड रुपयाला मिळाले. लागवडीसाठी रोगप्रतिकारशक्ती, फळधारणा, उत्पादकता, टिकवणक्षमता आणि बाजार पेठेची मागणी या मुख्य बाबी विचारात वाणाची निवड केली.

- रोपांची पुनर्लागवड २५ मेच्या दरम्यान केली. लागवडीनंतर लगेच ठिबकद्वारे सिंचन केले.

- पावसाळी वातावरण असल्यामुळे सिंचनाची जास्त आवश्यकता भासली नाही. पावसाचा अंदाज आणि पिकाची वाढीची अवस्था विचारात घेऊन सिंचन केले.

शेतकरी नियोजन
Cotton Crop Protection : अतिवृष्टीनंतर कापूस पिकाची घ्या काळजी

खत व्यवस्थापन ः

- लागवडीपासून दर ३ दिवसांनी विद्राव्य खतांच्या मात्रा ठिबकद्वारे दिल्या. त्यामध्ये १३ः०ः४५, १२ः६१ः०, १९ः१९ः१९ या खतांच्या ठिबकद्वारे वापर केला.

- झाडांवर फळे लागल्यानंतर ती चांगली पोसण्यासाठी आवश्यकतेनुसार विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या.

- टोमॅटो तोडणी सुरू करण्याआधी फळांचा दर्जा चांगला राहण्यासाठी कॅल्शिअम नायट्रेट व बोरॉनची फवारणी घेतली. तोडणीस सुरुवात केल्यापासून रासायनिक खतांच्या मात्रा आणि फवारणी पूर्णपणे बंद केले.

शेतकरी नियोजन
Soybean Rate : वायदेबंदीमुळं सोयाबीन उत्पादकांना फटका?

कीड- रोगनियंत्रण ः आतापर्यंत टोमॅटो पिकावर फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून आला. पिकाचे वेळोवेळी निरीक्षण केले. प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या. नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या. तसेच किडींच्या नियंत्रणासाठी चिकट सापळे लावले आहेत.

काढणी ः - सध्या टोमॅटोची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, पुढील १५ दिवसांत ती पूर्ण होईल. दोन दिवसांच्या अंतराने तोडणी करत आहे. - आतापर्यंत साधारण २० तोडे झाले आहेत. प्रति तोडा साधारण १८० ते २०० क्रेट उत्पादन मिळाले. अद्यापही तोडणी सुरू आहे.

कपिल गुंजाळ, ८७९६६७८४५० (शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com