Farmers Planning शेतकरी नियोजन: हळद

हळद (Turmeric Cultivation) लागवडीसाठी प्रामुख्याने घरचे बेणे (Seeds) वापरण्यावर माझा अधिक भर असतो. माझा पीक फेरपालटीवर विशेष भर असतो. सिंचनासाठी विहीर आणि सामूहिक शेततळ्यातील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. हळद लागवडीत पूर्णपणे ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
Turmeric
TurmericAgrowon

माझी हिंगोली जिल्ह्यातील रिधोरा (ता. वसमत) येथील शिवारात मध्यम प्रकारची ८ एकर शेती आहे. त्यात प्रामुख्याने ५ एकरांवर संत्रा लागवड तर १ एकरावर तूर, मूग तर उर्वरित २ एकरांवर हळद लागवड आहे. मी मागील १० वर्षांपासून हळदीचे उत्पादन (Turmeric Production) घेत आहे. दरवर्षी साधारण २ एकरांवर हळदीच्या सेलम वाणाच्या लागवडीचे नियोजन असते.

सुरुवातीची काही वर्षे सरी पद्धतीने लागवड करत होतो. या पद्धतीद्वारे एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळायचे. सन २०१५ पासून गादी वाफा (बेड) पद्धतीने हळद लागवड करण्यास सुरुवात केली. गादी वाफा पद्धतीमुळे उत्पादनात मोठी भर मिळाली. एकरी सरासरी २५ ते २८ क्विंटल उत्पादन मिळत आहे. हळद लागवडीसाठी (Turmeric Cultivation) प्रामुख्याने घरचे बेणे (Seeds) वापरण्यावर माझा अधिक भर असतो. माझा पीक फेरपालटीवर विशेष भर असतो. सिंचनासाठी विहीर आणि सामूहिक शेततळ्यातील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. हळद लागवडीत पूर्णपणे ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

Turmeric
Tur Rate : यंदा तूर भाव खाणार का?

मागील महिन्यातील कामकाजः

या वर्षी ऊस लागवड केलेल्या क्षेत्रावर हळद लागवडीचे (Turmeric Cultivation) नियोजन केले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात ऊसतोडणीनंतर पाचट न जाळता शेतामध्ये कुजविण्याचे नियोजन केले. त्यानुसार परभणी कृषी विद्यापीठातून आणलेले पाचट कुजविणारे जिवाणू, युरिया आणि पाणी पाचटावर शिंपडून ते शेतामध्येच कुजवून घेतले.

पाचट जागेवरच कुजविण्यामुळे सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. साधारण १ मे रोजी ट्रॅक्टरच्या साह्याने शेताची नांगरणी करून घेतली. त्यानंतर रोटाव्हेटर मारून घेतला. मशागतीच्या कामांमुळे कीड-रोगांच्या अवस्था जमिनीवर येतात. त्या नष्ट होण्यासाठी जमीन उन्हामध्ये चांगली तापू दिली.

Turmeric
Cotton Seed : देशातील बाजारात कपाशीचे १५ टक्के अवैध बियाणे

२० मे रोजी सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो, म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये २० किलो प्रति एकर प्रमाणे मात्रा शेतामध्येच पसरून घेतली. रासायनिक खतांच्या मात्रा दिल्यानंतर ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे गादी वाफे तयार करून घेतले. दोन गादी वाफ्यामध्ये साधारण ४ फूट अंतर राखले आहे. वाफ्याची उंची १ फूट आणि रुंदी सव्वा फूट आहे.

गादीवाफे तयार झाल्यानंतर दोन ओळींमध्ये ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरूण वाफे ओले करून घेतले. लागवडीसाठी मागील वर्षीचे निरोगी बेणे वापरले जाते. त्यानुसार साधारण १२ जून रोजी सेलम जातीच्या बेण्याची झिगझॅग पद्धतीने लागवड केली. दोन ओळींत १२ इंच तर दोन रोपांत ६ इंच अंतर राखून लागवडी केली आहे. बेणे लागवडीनंतर दोन दिवसांनी मजुरांच्या मदतीने मातीची हलकी भर दिली.

आगामी नियोजनः

येत्या काळात जमिनीतील ओलावा आणि पावसाचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल. शेतामध्ये पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाईल. आंतरमशागतीद्वारे हळदीचे पीक तणमुक्त केले जाईल. गरजेनुसार मजुरांच्या मदतीने खुरपणी केली जाईल.

शेतकरीः बाळासाहेब भालेराव

गावः रिधोरा, ता. वसमत, जि.हिंगोली

एकूण क्षेत्रः ८ एकर

हळद क्षेत्रः २ एकर

- बाळासाहेब भालेरावः८७८८२०३११७

(शब्दांकनः माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com