शेतकरी नियोजन - शेवंती

संकेत यांच्याकडे प्रामुख्याने शेवंती हे फूल पीक असते. उर्वरित पिकामध्ये कांदा, टोमॅटो व अन्य भाजीपाला पिके घेतली जातात. बाजारपेठेच्या मागणी आणि गरजेनुसार शेवंतीच्या पारंपरिक वाणांना पर्याय म्हणून नवीन वाणांची लागवड ते करत आहेत.
शेतकरी नियोजन - शेवंती
Shevanti Agrowon

शेतकरीः संकेत दुराफे

गावः कुसूर (ता. जुन्नर, जि. पुणे)

एकूण शेतीः ७ एकर

शेवंती क्षेत्रः ५ एकर

संकेत यांच्याकडे प्रामुख्याने शेवंती हे फूल पीक असते. उर्वरित पिकामध्ये कांदा, टोमॅटो व अन्य भाजीपाला पिके घेतली जातात. बाजारपेठेच्या मागणी आणि गरजेनुसार शेवंतीच्या पारंपरिक वाणांना पर्याय म्हणून नवीन वाणांची लागवड ते करत आहेत.

...अशी आहे लागवड पद्धत

 • - गादीवाफे, मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनावर लागवड.

 • - वाफ्याचा आकार ६ फूट रुंद, दीड फूट उंच.

 • - एकरी १५ ते १६ हजार रोपांची लागवड.

 • - लागवडीनंतर तीन महिन्यांनी उत्पादन सुरू होऊन पुढे तीन महिन्यांपर्यंत सुरू राहते.

 • - रिकट घेतल्यास पुन्हा तीन महिन्यांनी उत्पादन सुरू होते.

लागवड तंत्र

 • - शेतीच्या मशागतीनंतर १० टन लेंडी खताबरोबर बेसल डोस (डीएपी आणि पोटॅश प्रत्येकी ५० किलो, दाणेदार कीडनाशक १० किलो) टाकून बेड केले जातात.

 • - बेडवर ठिबक सिंचनाच्या लॅटरल अंथरूण घेतल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरण्यात येतो.

 • - त्यावर रोपवाटिकेमध्ये साधारणपणे सव्वा महिने वाढवलेल्या रोपांची लागवड केली जाते.

 • - ३-४ दिवसांनी बुरशीनाशकांची व पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी ड्रेचिंग केले जाते.

 • - यानंतर ठिबकद्वारे पाणी दिले जाते.

 • - झाडांचे शेंडे खुडले जातात. त्यामुळे अधिक फुटवे फुटून अधिक फुले मिळतात.

 • - हवामानानुसार ८ ते १० दिवसांनी गरजेनुसार बुरशीनाशकांची फवारणी केली जाते.

 • - या दरम्यान विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते. यामध्ये १९-१९-१९, १२-६१-०, १३-४०-१३, ०-५२-३४ अशा खतांचा समावेश असतो.

 • - सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकरी २ किलो मात्रा दिली जाते.

उत्पादन आणि विक्री

तीन महिन्यांपर्यंत व्यवस्थापन केल्यानंतर कळ्या आल्यानंतर खते बदलली जातात. त्यात पोटॅश वाढवले जाते. नत्र, स्फुरद कमी केले जाते. साधारण एक दिवसाआड फुलांची काढणी केली जाते. एकरी सरासरी ५ टनांपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा संकेत यांचा अनुभव आहे. क्रेटद्वारे मुंबई येथील दादरच्या फुलबाजारात पाठवली जातात. गेल्या ५-६ वर्षांच्या अनुभवातून सरासरी ६० ते ८० रुपये दर मिळत असल्याचे संकेत सांगतात.

पर्पलचे पावसाळी नियोजन

सध्या पर्पल शेवंती फुलांची काढणी सुरू आहे. त्याला प्रति किलोला ६० रुपये दर मिळत आहे.नुकताच एक पाऊस झाल्याने सध्या पाणी देण्याचे नियोजन नाही. मात्र पाऊस लांबल्यास आठवड्याला ड्रीपद्वारे पाणी द्यावे लागेल. खतांमध्ये १४-३५-१४, पोटॅश यांची मात्रा दिली जात आहे.

संपर्कः संकेत दुराफे, ७७०९०८१७८५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com