Agriculture Crisis : नेदरलॅण्डमधील शेतकरी सुपात तर युरोपातले जात्यात

अन्नपदार्थांच्या वितरणाची कोंडी केली. त्यामुळे भाज्या, फळे, दूध, चीज, लोणी, पाव, मांस सुपरमार्केट्समध्ये मिळेनासे झाले.
Agriculture Crisis
Agriculture CrisisAgrowon

जगातील श्रीमंत देशांच्या यादीत नेदरलॅण्डचा (Netherlands Country) क्रमांक खूपच वरचा आहे. तिथे २०१९ पासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनानं (Farmers Protest 2022) २०२२ च्या जून महिन्यात उग्र रुप धारण केलं. पोलिसांच्या वाहनांवर हल्ले करणारे शेतकरी, ट्रॅक्टरने हटवली जाणारी पोलिसांची वाहनं यांचे व्हिडिओ ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर प्रसारित झाले. ट्रॅक्टर्स रस्त्यावर आणून शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारी इमारतींवर शेणाचे फवारे मारले. अन्नपदार्थांच्या वितरणाची कोंडी केली. त्यामुळे भाज्या, फळे, दूध, चीज, लोणी, पाव, मांस सुपरमार्केट्समध्ये मिळेनासे झाले.

Agriculture Crisis
Crop Loan : भूविकास बॅंकेच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह

नेदरलॅण्डचं एकूण क्षेत्रफळ आहे ४१ हजार ५४३ चौरस किलोमीटर. आकाराने महाराष्ट्र नेदरलॅण्डपेक्षा सात पट मोठा आहे. नेदरलॅण्डचा भूगोल खूपच वेगळा आहे. तिथली एक तृतीयांश जमीन चक्क समुद्रसपाटीपेक्षा खाली आहे. त्यामुळे नद्या आणि समुद्रातून येणारं पाणी रोखण्याचं आणि जमिनीत घुसलेलं पाणी काढून टाकण्याचं तंत्रज्ञान व यंत्रणा तिथे मध्ययुगाच्या आधीपासून होत्या. पूर्वी घोडे आणि माणसं ही काम करायची; त्यानंतर पवन चक्क्यांचा वापर सरू झाला. आधुनिक काळात धरणं, बंधारे, स्लुईस गेट इत्यादी अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रश्‍न सोडवण्यात यश मिळालं आहे.

नेदरलॅण्डमध्ये वर्षाचे बारा महिने पाऊस पडतो त्यामुळे तिथे दोनच ऋतू- उन्हाळा आणि हिवाळा- आहेत. उन्हाळ्यात कमाल तापमान २३ डिग्री सेल्सियस, तर किमान तापमान १०.८ डिग्री सेल्सिअस. हिवाळ्यात कमाल तापमान ६ डिग्री सेल्सिअस, तर किमान तापमान १.६ डिग्री सेल्सिअस. त्यामुळे या देशात निम्मी शेतजमीन कुरणाखाली आहे. तर उरलेली फळं आणि भाज्यांच्या लागवडीखाली. फारच कमी जमीन तृणधान्यांच्या लागवडीखाली आहे.

नेदरलॅण्डचं दरडोई वार्षिक उत्पन्न ५७ हजार डॉलर्स आहे. एका शेतकऱ्याकडं सरासरी ४१ हेक्टर जमीन असते. हा देश आकाराने लहान आहे; परंतु शेतीमालाच्या निर्यातीत अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक नेदरलॅण्डचा आहे...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com