Netharland Farmers : जगभरात शेतकऱ्यांची अवस्था बिकट का आहे ?

नेदरलॅण्डच्या संसदेत विचारलेल्या लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी देशातील पशूंची संख्या निम्म्यावर आणावी लागेल.
Netharland Farmers
Netharland FarmersAgrowon

सुनील तांबे

नेदरलॅण्डच्या संसदेत (Parliament Of Netharland) विचारलेल्या लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी देशातील पशूंची संख्या निम्म्यावर आणावी लागेल. शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्यासाठी सरकारने १०० कोटी युरोचा निधी उभारला आहे. मात्र काही हजार शेतकऱ्यांना शेतीचा म्हणजे पशुपालनाचा (Agriculture And Animal Husbandry Business) धंदा बंद करावा लागेल. आंदोलनाचा बीमोड करून नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शेतजमिनीच्या राष्ट्रीयीकरणाचा (Nationalization Of Farms) निर्णय सरकारला घ्यावा लागेल, अशी चर्चा त्या देशातील प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे.

कारखानदारीसाठी शेतजमीन संपादन करणं हाच नव्या धोरणाचा मूळ उद्देश आहे म्हणून शेतकऱ्यांना शेतीतून हद्दपार केलं जातंय, असा आरोप शेतकरी आंदोलकांनी अल जझिरा या वृत्तवाहिनीवरील चर्चेत केला.

एलटीओ या शेतकरी संघटनेचा नेता विट्स सोन्नेमाच्या मते, २०३० पर्यंत उत्सर्जनात ५० टक्के कपात करणं हा निर्णय शहाणपणाचा नाही. केवळ शेतीच नाही तर ग्रामीण भागाची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहार्यताच त्यामुळे संपुष्टात येईल.

Netharland Farmers
Indian Agriculture : गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी फुटले भाव

“आपण रोज जे अन्न खातो त्याचा संबंध शेतकऱ्याच्या जीवनाशी आहे, हेच बहुसंख्य शहरी लोकांना माहीत नाही,” या शब्दांत अलेक्स डाटेमा या शेतकऱ्याने आपली नाराजी द गार्डियन या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

या प्रश्‍नावर राजकारणही तापू लागलं आहे. बोअरबर्जरब्यूयिंग हा राजकीय पक्षाचा जनाधार ग्रामीण भागात आहे. या पक्षाचा नेता जान ब्रोक म्हणतो, ‘नायट्रोजन उत्सर्जनाबाबत शेतकऱ्यांनी सजग राहायलाच हवं; परंतु त्यासाठी केवळ शेतीला जबाबदार धरणं गैर आहे. प्रदूषणकारी उद्योगांवरही कारवाई करायला हवी.’’

या राजकीय पक्षाला मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये शेतकरी आंदोलनाचा प्रभाव दिसेल अशी भाकितं जनमत चाचण्या करू लागल्या आहेत. काही शेतकरी संघटना उघडपणे हिंसाचाराचं समर्थन करत आहेत, त्याबाबत नेदरलॅण्ड सरकारने चिंता व्यक्त केलीय. त्यामुळे देशात दहशतवादी संघटना सक्रिय होण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com