Food Processing : अन्न प्रक्रिया उद्योगाचा शेतकऱ्यांनी विचार करावा

‘‘पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे, शेतकऱ्यांनी विशेषतः तरुणांनी त्याचा विचार करावा,’’ असे आवाहन कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांनी केले.
Food Processing
Food ProcessingAgrowon

सोलापूर ः ‘‘पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या (PM Micro Food Processing Scheme) माध्यमातून जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला (Food Processing Industry) मोठी संधी आहे, शेतकऱ्यांनी विशेषतः तरुणांनी त्याचा विचार करावा,’’ असे आवाहन कृषी उपसंचालक राजकुमार मोरे (Rajkumar More) यांनी केले.

Food Processing
Food Poisoning : पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत २२ जणांना भगरीतून विषबाधा

कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत नुकतेच जिल्हास्तरीय क्षमता बांधणी व प्रशिक्षण घटकांतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

Food Processing
Food Grain Production : अन्नधान्य उत्पादनात ३.९१ टक्क्यांनी घट

मोरे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्‍घाटन झाले. याप्रसंगी राष्ट्रीय रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. बसवराज रायगोंड उपस्थित होते.

Food Processing
Food Crisis : जगावर अन्नटंचाईची टांगती तलवार

तांत्रिक सत्रांत विविध विषयांवर चर्चा

या निमित्ताने आयोजित तांत्रिक सत्रात दिनेश क्षीरसागर यांनी अन्नप्रक्रिया उद्योगाचे ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग यावर मार्गदर्शन केले. महेश लोंढे यांनी ज्वारी व भरडधान्ये प्रक्रिया, पोषणमुल्ये, उद्योजकता विकास व विपणन संधी या विषयावर,

कृषी विस्तार विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. विशाल वैरागर यांनी उद्योजकता विकास कौशल्ये याबाबत तसेच योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करणे व मूल्यांकन, वित्त व्यवस्थापन याबाबत स्टार कृषी विकास योजना, बँक ऑफ इंडिया, पंढरपूरचे प्रभारी अधिकारी श्यामराव टेळे, फळे समाधान खुपसे यांनी बेदाणा, फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रात्यक्षिक म्हणून प्रत्यक्ष उद्योगभेटही घडवण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com