Irrigation : कालवा लाभक्षेत्रात शेततळे आधारित सुक्ष्मसिंचन आवश्यक

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाअंतर्गत ‘कालवा लाभक्षेत्रामध्ये जलव्यवस्थापनाचे पर्याय’ या विषयावर डॉ. पांडा यांनी मार्गदर्शन केले.
Irrigation
IrrigationAgrowon

नगर ः भुवनेश्वर येथील शेततळे (Farm Pond) आधारित सुक्ष्म सिंचन (Micro Irrigation) प्रणाली पावसाळ्यानंतरच्या हंगामासाठी वरदान ठरलेली आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात (Crop Production) वाढ होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. त्यामुळे कालवा लाभक्षेत्रात शेततळे आधारित सुक्ष्म सिंचन प्रणाली काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन भुवनेश्वर येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर मॅनेजमेंट’चे (Indian Institute Of Water Management) प्रमुख संशोधक डॉ. आर. के. पांडा (Dr. R. K Panada) यांनी केले.

Irrigation
अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ४० टक्के साठा

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाअंतर्गत ‘कालवा लाभक्षेत्रामध्ये जलव्यवस्थापनाचे पर्याय’ या विषयावर डॉ. पांडा यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ होते. या वेळी कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार, आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, कास्ट प्रकल्पाचे प्रकल्प सह-समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. सुनील कदम, सचिन डिंगरे उपस्थित होते.

डॉ. पांडा म्हणाले, ‘‘ कालव्याच्या लाभक्षेत्रामधील विकासामुळे दुष्काळ टाळून आर्थिक विकासाला गती मिळू शकते. तसेच पावसावरील अवलंबित्व कमी करता येऊ शकते. आवश्यक धोरणे ही लाभक्षेत्रामधील वास्तविक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळी आखावी लागतील.’’

डॉ. मुकुंद शिंदे आभार मानले. डॉ. शुभांगी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक म्हणून इंजि. दत्तात्रेय पवार, इंजि. कल्पेश बोरसे, इंजि. अभिषेक दातीर यांनी काम पाहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com